Home /News /videsh /

3 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 लाखांचा दंड; कोरोनाचे नियम मोडणाऱ्याला भलीमोठी शिक्षा

3 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 लाखांचा दंड; कोरोनाचे नियम मोडणाऱ्याला भलीमोठी शिक्षा

कोरोना नियमांचं उल्लंघन करणं या व्यक्तीला महागात पडलं आहे.

    हैद्राबाद, 18 जून : कोरोनाच्या नियमांचं (COVID-19 Rules) उल्लंघन केलं म्हणून बिहारमधील (Bihar) एका व्यक्तीवर बहरीन येथे (Bahrain) तब्बल 10 लाख रुपयांचा दंड आणि 3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हैद्राबाद (Hyderabad) येथे राहणाऱ्या या व्यक्तीने दावा केला आहे की, बिहारमधील एका भावाला बहरिन येथे 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आता भावाच्या सुटकेसाठी त्याने परराष्ट्र मंत्रालयाकडे (foreign Ministry) मदतीची मागणी केली आहे. हैदराबादमध्ये राहणारे बिहारचे रहिवासी असलेले हुसेन अहमद यांनी सांगितलं की, त्यांचा छोटा भाऊ मोहम्मद खालिद हा गेल्या आठ वर्षांपासून बहरीनमध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये त्यांनी बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील निवासस्थानी आपल्या कुटुंबाला भेट दिली होती. गावी आला, नंतर काही दिवसांनी निघून गेला. भाऊ होम क्वारंटाइन होता हुसैन अहमदचं म्हणणं आहे की, मोहम्मद खालिदला बहरीनमध्ये 18 मे रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर काही दिवस तो अंदालुस हॉटेलमध्ये होता. त्यानंतर तब्येत बिघडली म्हणून त्याला स्लमानिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रकृती सुधारल्यानंतर 31 मे रोजी त्याला रुग्णालयातून सोडण्यात आलं. त्यानंतर बहरीनच्या कडक कोरोना नियमावलीअंतर्गत हातात इलेक्ट्रॉनिक ट्रॅकर लावून तब्बल 17 दिवसांपर्यंत होम क्वारंटाइन राहण्यास सांगण्यात आलं होतं. तो आपल्या खोलीत क्वारंटाइन होता. हे ही वाचा-कुंभमेळ्यात हजारो खोट्या कोविड टेस्ट; एका घटनेमुळे समोर आली धक्कादायक माहिती हुसैन अहमद यांनी दावा केला आहे की, 7 जून रोजी खालिदला कोणी जेवण पोहोचवणारं मिळाला नाही, तर घरापासून काही अंतरावर तो जेवण घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी कोणीतरी त्याच्या हातात इलेक्टरॉनिक ट्रॅकर पाहिलं. आणि त्याचा व्हिडीओ करुन सोशल मीडियावर व्हायरल केला. हुसैन अहमद याने सांगितलं की, हा व्हिडीओ पोलिसांपर्यंत पोहोचला आणि त्याला अटक करण्यात आली. त्याचा कोविड रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र तरीही कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला 3 वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आणि 5000 बहरीन दिन्नार म्हणजे तब्बल 9 लाख 72 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. याबाबत कळताच भावाच्या कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली आहे. याप्रकरणात हैद्राबादचे हुसैन अहमद यांनी परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहून मदतीची अपेक्षा केली आहे. ट्विटर यूजर अमजद उल्लाह खानने पररष्ट्र मंत्री जयशंकर यांना टॅक करुन लिहिलं आहे की, या प्रकरणात मोहम्मदच्या सुटकेसाठी प्रयत्न करावा. त्याचवेळी बहरीनमधील भारतीय दूतावासाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या व्यक्तीच्या  ट्विटची दखल घेतली आणि मोहम्मद खालिदची माहितीही मागवली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona patient, Covid-19 positive

    पुढील बातम्या