मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

काय सांगता... फक्त 26 वर्षांची तरुणी बनली देशाची हवामान मंत्री; वाचा सविस्तर

काय सांगता... फक्त 26 वर्षांची तरुणी बनली देशाची हवामान मंत्री; वाचा सविस्तर

रोमिनाचा जन्म स्टॉकहोमच्या उपनगरात इराणी वंशाच्या कुटुंबात झाला.

रोमिनाचा जन्म स्टॉकहोमच्या उपनगरात इराणी वंशाच्या कुटुंबात झाला.

रोमिनाचा जन्म स्टॉकहोमच्या उपनगरात इराणी वंशाच्या कुटुंबात झाला.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर : स्वीडनच्या नवीन सरकारने मंगळवारी एका 26 वर्षीय तरुणीला हवामान मंत्री म्हणून नियुक्त केले. रोमिना पौरमोख्तारी, असे या 26 वर्षीय तरुणीचे नाव आहे. त्या देशातील पहिल्या सर्वात तरुण हवामान मंत्री आहेत. एवढ्या लहान वयात त्यांना महत्त्वाच्या मंत्रिपदाची जबाबदारी कशी सोपवण्यात आली ते जाणून घेऊया.

26 वर्षीय रोमिना पौरमोख्तारी आतापर्यंत लिबरल पार्टीच्या युवा शाखेच्या प्रमुख होत्या. त्या त्यांच्या हवामान बदलाच्या कामासाठी ओळखली जात नव्हती. पण असे असूनही त्यांना कमी वयात एक महत्त्वाचे मंत्रालय देण्यात आले आहे.

स्वीडनचे नवनिर्वाचित पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांनी रोमिना यांना कॅबिनेट सदस्य म्हणून नामनिर्देशित केले. तीन पक्षांच्या युतीच्या मदतीने क्रिस्टरसन देशाचे नवे पंतप्रधान बनले आहेत.

या तीन पक्षांपैकी एका पक्षात स्वीडन डेमोक्रॅट्स या अतिउजव्या पक्षाचा समावेश आहे, ज्याला त्यांचा पाठिंबा मिळाला आहे. न्यूज एजन्सी एएफपीच्या वृत्तानुसार, रोमिनाचा जन्म स्टॉकहोमच्या उपनगरात इराणी वंशाच्या कुटुंबात झाला. रोमिना यांना हवामान आणि पर्यावरण विभागाकडून वारसा मिळाला आहे. तरुण वयात हे मंत्रिपद भूषवणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला ठरल्या आहेत.

हेही वाचा - ब्रिटनमध्ये पुन्हा सत्तासंघर्ष; खुर्ची सोडण्यासाठी ट्रस यांच्यावर दबाव; हे आहेत PM प्रबळ दावेदार

नवीन स्वीडिश सरकारने एका तरुणीला हवामान बदल मंत्री बनवल्यापासून ग्रेटाचे नावही चर्चेत आहे. कारण प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यादेखील देशातील सर्वात तरुण हवामान कार्यकर्त्या आहेत. त्यांनी लाखो तरुणांसह एक व्यापक जागतिक चळवळ सुरू केली आणि हवामान बदलाच्या विषयावर काम केले.

First published:

Tags: International, Sweden