रायपूर 06 नोव्हेंबर : भगवान श्रीरामांचे
(Lord Rama) जन्मस्थान असलेल्या उत्तर प्रदेशातील
(Uttar Pradesh) अयोध्येत
(Ayodhya) साजऱ्या होत असलेल्या भव्य दीपोत्सवाची देशभरात चर्चा होत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, भगवान रामाची आई कौशल्या
(Mata Kaushalya) यांचे जन्मस्थान असलेल्या गावामध्येही यंदा भव्य दीपोत्सव झाला आहे. भगवान रामाचं आजोळ छत्तीसगडची
(Chhattisgarh) राजधानी रायपूर
(Raipur) येथील चंदखुरी
(Chandkhuri) येथे आहे असं मानलं जातं. चंदखुरी येथील माता कौशल्या मंदिरात
( Mata Kaushalya Temple) छत्तीसगड राज्याच्या इतिहासात प्रथमच दिवाळीचा भव्य उत्सव आयोजित करण्यात आला आहे. दीपोत्सवांतर्गत गुरुवारी सायंकाळी माता कौशल्येचं मंदिर दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघालं. मंदिरात एकाचवेळी 51 हजार दिवे प्रज्वलित करण्यात आले. हे दिवे लावण्यासाठी सुमारे 1800 लिटर तेलाचा वापर करण्यात आला.
चंदखुरी येथील माता कौशल्या मंदिराचे मुख्य पुजारी पंडित रमेश कुमार चौबे म्हणाले, 'आतापर्यंत अशा पद्धतीने दीपोत्सवाचे आयोजन मंदिरात पाहिले नव्हते. या मंदिरात एकेकाळी लोक हे फक्त वर्षातून दोनदाच येत होते. एकदा मंदिराच्या रंगकामासाठी आणि दुसऱ्यांदा चैत्र नवरात्रीच्या वेळी घरात यज्ञ करताना माता कौशल्याच्या नावाने पेटवण्यात आलेली ज्योत मंदिरात ठेवण्यासाठी. या मंदिराशेजारी काटेरी झुडपे असायची. 1990 मध्ये चैत्र नवरात्रीपासून गावातील 12 जणांनी मंदिरात 12 ज्योत लावण्यास सुरुवात केली. त्यावेळी मंदिराच्या आजूबाजूला पाणी भरलेले होते, त्यामुळे आम्ही पोहत मंदिरात पोहोचायचो. यानंतर भाविकांची या मंदिरात गर्दी वाढू लागली. पुढे बांबूच्या होडीतून लोक येथे येऊ लागले.'
कमालीचा योगायोग! दिवाळीच्या रात्री होणार ‘दैवी’ आतषबाजी
प्रथमच भव्य दीपोत्सव
पंडित रमेश पुढे म्हणाले, 'रामललाच्या माता कौशल्या यांच्या मंदिरातही सरकार अशा प्रकारे चांगले काम करेल, याची कल्पना आम्ही किंवा गावातील कोणत्याही व्यक्तीने केली नव्हती. त्रेता युगनंतर द्वापार युगामध्ये अशा पद्धतीने दीपोत्सवाचे आयोजन करण्याचा प्रसंग आला असावा. पण मला नाही वाटत कलियुगात भगवान रामाच्या आजोळात असा दीपोत्सव साजरा झाला असेल. हा कार्यक्रम भगवान रामाच्या आजोळाला तीर्थक्षेत्र बनवण्यासाठी उपयुक्त ठरेल.' तर, चांदखुरी येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक रामकुमार साहू यांनी सांगितले, 'चंदखुरी हे साक्षात भगवान रामाचे आजोळ आहे, असे या दिवाळीला खऱ्या अर्थाने वाटत आहे. दीपावलीचा सण हा अशा पद्धतीने साजरा करणे म्हणजे श्रीरामावरील श्रद्धा आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या पुढाकाराने हे केले जात आहे.'
आता बाजारात आले इलेक्ट्रॉनिक फटाके, पाहा आहेत तरी कसे हे Electronic Firecrackers
स्वयंसेवकांचे उत्कृष्ट नियोजन
मंदिरामध्ये दिवे प्रज्ज्वलित करण्यासाठी सायंकाळी पाच वाजल्यापासून 6000 स्वयंसेवक नियोजन करीत होते, असे मंदिर व्यवस्थापनाने सांगितले. दिव्यांमध्ये टाकण्यासाठी सुमारे 1800 लिटर तेलाची व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळी पाच वाजल्यापासून दिव्यांची सजावट व दीप प्रज्ज्वलन करण्यास सुरुवात करण्यात आली. स्वयंसेवकाच्या एका गटाने दिव्यांची सजावट केली, दुसऱ्या गटाने त्यात वात ठेवण्याचे काम केले. तिसर्या गटाने दिव्यांमध्ये तेल ओतले व ते पेटवण्याचे काम सुरू झाले. नियोजनामुळे प्रथमच होणाऱ्या या कार्यक्रमात कोणतीही अडचण दिसून आली नाही. हा उपक्रम यशस्वीतेसाठी राजीव मितान क्लबच्या तरुणांनी सक्रिय सहभाग घेतला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.