मराठी बातम्या /बातम्या /विदेश /2 वर्षांचं बाळ रोज ओढायचं 40 सिगरेट, आता ओळखणंही झालंय कठीण

2 वर्षांचं बाळ रोज ओढायचं 40 सिगरेट, आता ओळखणंही झालंय कठीण

एका बाळाला चक्क सिगरेट ओढण्याचं व्यसन लागलं होतं. हे व्यसन इतकं वाढलं की बाळ दिवसाला 40 सिगरेट ओढू लागलं.

एका बाळाला चक्क सिगरेट ओढण्याचं व्यसन लागलं होतं. हे व्यसन इतकं वाढलं की बाळ दिवसाला 40 सिगरेट ओढू लागलं.

एका बाळाला चक्क सिगरेट ओढण्याचं व्यसन लागलं होतं. हे व्यसन इतकं वाढलं की बाळ दिवसाला 40 सिगरेट ओढू लागलं.

जकार्ता, 25 डिसेंबर: वयाच्या दुसऱ्या वर्षी (Age of 2) सिगरेट पिण्याची (Cigarette) सवय लागलेल्या बाळाची सिगरेटची सवय (Addiction) सोडवण्यात अखेर प्रशासनाला (Administration) यश आलं आहे. सिगरेट ओढण्याचं व्यसन अनेकांना असतं. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर हे व्यसन लागतं आणि एकदा लागलं की ते सुटणं फारच अवघड होऊन बसतं. सिगरेट ओढणं आरोग्यासाठी हानीकारक असल्याचं त्याच्या पाकिटांवर छापलेलं असतं. वेगवेगळ्या जाहीराती आणि इतर माध्यमातूनही त्याविषय़ी जनजागृती केली जाते. मात्र तरीही सिगरेटचं व्यसन सुटता सुटत नाही.

बाळाला लागली सवय

इंडोनेशियात राहणाऱ्या एका बाळाला सिगरेट पिण्याची सवय इतक्या कमी वयात लागली की ती कशी सोडवावी, असा प्रश्न त्याच्या पालकांसह सर्वांनाच पडला होता. बाळाच्या वडिलांनी तो अठरा महिन्यांचा असताना त्याला सहज म्हणून सिगरेट दिली होती. त्यानं ती ओढली आणि त्यानंतर तो सतत सिगरेट मागू लागला. आणखी काही वेळा त्याला सिगरेट दिल्यानंतर मग त्याला त्याचं व्यसनच जडलं. हे व्यसन इतकं गंभीर बनलं की दोन वर्षांचा मुलगा दररोज 40 सिगरेट ओढू लागला होता.

बाळाचं व्यसन आता सुटलं असून त्याची प्रकृती ठणठणीत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

घरच्यांपुढे आव्हान

मुलाच्या आईवडिलांनी त्याचं हे व्यसन सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्याची सिगरेट बंद केल्यानंतर त्याला अचानक खेळण्यांचं व्यसन जडलं होतं. तो सतत वेगवेगळ्या खेळण्यांची मागणी करत असे. ही मागणी मान्य झाली नाही की तो आक्रमक होई आणि आपलं डोकं आपटून घेऊ लागे. त्याला शांत करण्यासाठी पुन्हा त्याला सिगरेट द्यावी लागे. वेगवेगळे प्रयत्न करूनही बाळाची सिगरेट कशी सोडवावी, असा प्रश्न त्यांना पडला होता.

हे वाचा - अटल बिहारी वाजपेयींच्या पुतळ्याच्या अनावरणाला राज्य सरकारने परवानगी नाकारली?

सरकारने केले प्रयत्न

इंडोनेशियात इतकं छोटं बाळ सिगरेट ओढू लागल्याचे व्हिडिओ जगभर व्हायरल होऊ लागल्यानंतर सरकारने या बाळाच्या व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न सुरू केले. व्यावसायिक व्यसनमुक्ती तज्ज्ञांची मदत घेतल्यानंतर अखेर या प्रयत्नांना यश आलं आणि मुलाचं व्यसन सुटलं. आता त्याची तब्येत ठिक असून त्याचं वजनही नियंत्रणात असल्याचं सांगण्यात आलं आहे.

First published:
top videos

    Tags: Cigarette, Small baby