Home /News /videsh /

पुन्हा हादरलं काबुल! एअरपोर्टजवळ रॉकेट हल्ला, दोघांचा मृत्यू, तीन जखमी

पुन्हा हादरलं काबुल! एअरपोर्टजवळ रॉकेट हल्ला, दोघांचा मृत्यू, तीन जखमी

अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबुलमधील (Kabul) विमानतळाच्या (Airport) परिसरात झालेल्या रॉकेट हल्ल्यात (Rocket attack) आतापर्यंत दोघांचा मृत्यू (2 died) झाला आहे.

    काबुल, 29 ऑगस्ट : अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबुलमधील (Kabul) विमानतळाच्या (Airport) परिसरात झालेल्या रॉकेट हल्ल्यात (Rocket attack) आतापर्यंत दोघांचा मृत्यू (2 died) झाला आहे. या हल्ल्यात तीनजण गंभीर (3 injured) जखमी झाल्याची माहिती असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अफगाणिस्तानमध्ये अडकून पडलेल्या परदेशी नागरिकांचं रेस्क्यु ऑपरेशन सुरु असताना झालेल्या या हल्ल्यामुळे काबुलमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. एअरपोर्टजवळील घरावर आदळलं रॉकेट काबुलमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नॉर्थ गेटजवळ एका घरावर हे रॉकेट आढळलं. या घटनेचा व्हिडिओदेखील रेकॉर्ड झाला असून हे रॉकेट थेट घरात घुसल्याचं त्यातून दिसतं. या घरात असणाऱ्या दोघांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे, तर आजूबाजूला असणारे तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. अमेरिकेच्या इशाऱ्यानंतरही हल्ला काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात झालेल्या आत्मघातकी हल्ल्यानंतर अमेरिकेने हल्लेखोरांना इशारा दिला होता. हल्लेखोरांना धडा शिकवण्याचा इशारा अमेरिकेनं देऊन काही तास उलटायच्या आत हल्लेखोरांनी हा दुसरा हल्ला केला आहे. गर्दीच्या भागात हे रॉकेट डागण्याची मूळ योजना असावी, मात्र ते घरावर कोसळल्याचं सांगितलंजात आहे. गर्दीच्या ठिकाणी ते कोसळलं असतं, तर अधिक जीवितहानी होण्याची शक्यता होती. अमेरिकेने दिला होता इशारा काबुल विमानतळावर आणखी एक हल्ला होऊ शकतो, असा इशारा अमेरिकेने रविवारी सकाळीच दिला होता. त्यातही विशेषतः उत्तरेकडील गेटच्या परिसरात अधिक लक्ष ठेवण्याच्या  सूचना केल्या होत्या. सध्या झालेला रॉकेट हल्ला हा याच परिसरात झाला आहे. हे वाचा - म एकीशी आणि संसाराचा बेत दुसरीशी, BF च्या घरासमोरच प्रेयसीनं घेतल पेटवून देश सोडण्याची लगबग अफगाणिस्तानमध्ये अडकून पडलेले परदेशी नागरिक काहीही करून देशातून बाहेर पडण्याच्या गडबडीत आहेत. 31 ऑगस्ट रोजी अमेरिका आपलं सैन्य पूर्णपणे माघारी बोलावणार आहे. त्यानंतर काबुल विमानतळ हे तालिबानच्या ताब्यात जाणार आहे. त्यामुळे त्यापूर्वीच देश सोडण्याची घाई तिथे अडकलेल्या परदेशी नागरिकांना आहे. याचाच फायदा  घेऊन परदेशी नागरिकांना लक्ष्य करण्याच्या प्रयत्न दहशतवाद्यांकडून केला जात असल्याचं चित्र आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Afghanistan, Bomb Blast, Kabul, Taliban

    पुढील बातम्या