जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / पाकिस्तानात भयानक स्थिती; मोफत पिठासाठी जीव गमवायलाही तयार? 11 जणांचा मृत्यू

पाकिस्तानात भयानक स्थिती; मोफत पिठासाठी जीव गमवायलाही तयार? 11 जणांचा मृत्यू

पाकिस्तानात भयानक स्थिती; मोफत पिठासाठी जीव गमवायलाही तयार? 11 जणांचा मृत्यू

शेजारील देशातील कराचीमध्ये मोफत पिठासाठी झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला. स्थानिक वृत्तानुसार, मृत आणि जखमी मोफत राशन घेण्यासाठी नौरस चौरंगीजवळ जमले होते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

इस्लामाबाद 01 एप्रिल : पाकिस्तानची वाईट आर्थिक परिस्थिती आता लोकांचा जीव घेत आहे. मूलभूत अन्नपदार्थांच्या वाढत्या किमतींशी झगडत असलेल्या कुटुंबांना मदत करण्यासाठी सरकार-समर्थित योजनेचा एक भाग म्हणून मोफत पीठ वाटप केलं जातं. अशाच एका ठिकाणी अकरा लोकांचा मृत्यू झाला आहे. शेजारील देशातील कराचीमध्ये मोफत पिठासाठी झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला. स्थानिक वृत्तानुसार, मृत आणि जखमी मोफत राशन घेण्यासाठी नौरस चौरंगीजवळ जमले होते. Black Hawk Crash : सरावादरम्यान 2 हेलिकॉप्टरची टक्कर, 9 जणांचा मृत्यू दुसरीकडे, वृत्तसंस्था रॉयटर्सने सांगितलं की, गेल्या आठवड्यात इतर ठिकाणीही पिठासाठी झालेल्या चेंगराचेंगरीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यात लोक पीठ घेऊन चाललेल्या गाड्यांमधून पोती लुटताना दिसत आहेत. देशातील महागाईने जनतेचं कंबरडं मोडलं आहे. तसंच यंदाच्या पुराने लोकांच्या अडचणी वाढविण्याचं काम केलं आहे. वृत्तसंस्थेने अहवाल दिला आहे, की मूलभूत वस्तूंच्या किंमती आणखी वाढल्या आहेत, पिठाच्या किमती मागील वर्षाच्या तुलनेत 45% पेक्षा जास्त वाढल्या आहेत. पाकिस्तान सरकारने गेल्या आठवड्यात सुरू झालेल्या पवित्र इस्लामिक रमजान महिन्यात गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचण्यासाठी पीठ वाटप कार्यक्रम सुरू केला आहे. प्रांतीय माहिती मंत्री आमिर मीर यांनी रॉयटर्सला सांगितलं की पूर्व पंजाबमधील वितरण साइटवर दोन महिलांसह चार लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमधील दोघांची प्रकृती आधीच खराब होती.

News18लोकमत
News18लोकमत

प्रांतीय अन्न प्राधिकरणाने शेअर केलेल्या नोंदीनुसार, गेल्या आठवड्यात उत्तर खैबर पख्तुनख्वा प्रांतातील वितरण केंद्रात झालेल्या चेंगराचेंगरीत आणखी एकाचा मृत्यू झाला. नोंदीनुसार, ट्रक आणि वितरण केंद्रांमधून पिठाच्या हजारो गोण्या लुटल्या गेल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात