- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- IPL 2023
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
भारतातही आहेत न्यूड बीचेस; जाणून घ्या कोणती आहे 'ही' ठिकाणं

भारतीय समाजात न्यूड किंवा पूर्ण कपडे न घालता सार्वजनिक ठिकाणी फिरणं चुकीचं समजलं जातं. ते भारतात बेकायदाही आहे; मात्र भारतातही काही न्यूड बीचेस आहेत, तिथे पर्यटक कपडे न घालताही वावरतात.
- Trending Desk
- Last Updated: Jan 6, 2023 08:35 PM IST
मुंबई, 06 जानेवारी : भारत विविधतेनं नटलेला देश आहे. इथं सगळ्या प्रकारची पर्यटनस्थळं आहेत. तीर्थक्षेत्रं, धार्मिक स्थळं, घनदाट जंगलं, पर्वतरांगा, समुद्रकिनारे, हिमालयातली पर्यटनस्थळं, मंदिरं, ऐतिहासिक लेणी इतकं वैविध्य भारतात आहे. यातली बहुतांश ठिकाणं कौटुंबिक सहलीसाठी उत्तम आहेत; मात्र काही ठिकाणं अशीही आहेत, की जिथे कुटुंबीयांसोबत जाता येऊ शकत नाही. भारतीय समाजात न्यूड किंवा पूर्ण कपडे न घालता सार्वजनिक ठिकाणी फिरणं चुकीचं समजलं जातं. ते भारतात बेकायदाही आहे; मात्र भारतातही काही न्यूड बीचेस आहेत, तिथे पर्यटक कपडे न घालताही वावरतात. 'टीव्ही 9 हिंदी'नं त्याबाबतचं वृत्त दिलं आहे.
समुद्रकिनारे इतर पर्यटनस्थळांसारखे नसतात. तिथलं सौंदर्य व तिथे येणारे पर्यटक वेगळे असतात. परदेशात अनेक ठिकाणी समुद्रकिनारे आहेत. तिथे पर्यटक विविध पोषाखांमध्ये वावरतात. तसंच परदेशांतल्या अनेक बीचेसवर स्त्री-पुरुष पर्यटक अत्यल्प कपड्यांत किंवा कपडे न घालताही वावरू शकतात. भारतातही काही समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटक आखूड कपड्यांमध्ये वावरतात. काही समुद्रकिनारे तर न्यूड बीच म्हणूनच ओळखले जातात. म्हणजेच तिथे पर्यटक कपडे न घालता वावरतात. केरळमधला मरारी बीच हा त्याच पद्धतीचा बीच आहे. खरं तर केरळमध्ये सगळेच समुद्रकिनारे नितांतसुंदर आहेत. निसर्गसौंदर्यानं नटलेले आहेत. अनेक पर्यटक तिथे सहलीसाठी येतात; मात्र मरारी बीचबद्दल ही बाब माहिती असायला हवी.
हेही वाचा - `हा` लहानसा जीव पृथ्वीला घेऊन जातोय विनाशाकडे; शास्त्रज्ञांचा दावा
लक्षद्वीप बेटांवर असलेला अगत्ती बीच हाही न्यूड बीच म्हणून ओळखला जातो. टॉपलेस बीच अशीही त्याची ओळख आहे. सोनेरी वाळू आणि निसर्गरम्य परिसर यामुळे या बीचचं सौंदर्य पाहायला अनेक जण येतात; मात्र या बीचवर कपडे न घालता फिरण्यास परवानगी आहे. त्यामुळे त्या बीचवर सरसकट सर्वांना जायला मनाई आहे.
असाच आणखी एक बीच गोव्यामध्ये आहे. खरं तर गोवा हे राज्य खास सागरी किनाऱ्यांसाठीच ओळखलं जातं. सेलिब्रेशनसाठी गोवा हेच अनेकांच्या पसंतीचं ठिकाण असतं. बीचवरच्या पार्टीसाठी गोव्याची निवड अनेक जण करतात. अनेक परदेशी नागरिक गोव्यात पर्यटनासाठी येतात. गोव्यात एक न्यूड बीचही आहे, त्याचं नाव ओझरान बीच. या समुद्रकिनाऱ्यावरही पर्यटक कमीतकमी कपड्यांमध्ये वावरतात. कपड्यांशिवायही तिथे वावरण्यास परवानगी आहे; मात्र फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास तिथे मनाई आहे.
कर्नाटकातल्या ओम बीचचीही न्यूड बीच अशी ओळख आहे. या बीचची आणखी एक ओळख आहे. तिथे गरम पाण्याचे 2 झरे आहेत. त्या समुद्रकिनाऱ्याच्या आकारावरून त्याचं नाव ओम बीच असं पडलं. या बीचवरही पर्यटक मोकळेपणानं सनबाथचा आनंद घेऊ शकतात.
गोवा, केरळ, कर्नाटक या राज्यांमध्ये अनेक समुद्रकिनारे आहेत. तिथे पर्यटनासाठी जायचा विचार असेल, तर या न्यूड बीचेसबाबत माहिती घेणं गरजेचं आहे.