मुंबई, 04 जानेवारी : वाढतं शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि प्रदूषणासह विविध कारणांमुळे ग्लोबल वॉर्मिंग अर्थात जागतिक तापमानवाढ होत आहे. जागतिक तापमानवाढीमुळे अनेक समस्या निर्माण होत आहे. जागतिक तापमानवाढीमुळे जगाला सातत्याने आपत्तींचा सामना करावा लागत आहे. शास्त्रज्ञ जागतिक तापमानवाढ आणि त्याच्या दुष्परिणामांवर संशोधन करत आहेत. या संदर्भात नुकत्याच झालेल्या एका संशोधनात एक चिंता वाढवणारा निष्कर्ष समोर आला आहे. वाळवी हा छोटासा कीटक पृथ्वीला विनाशाकडे घेऊन जात असल्याचं या संशोधनादरम्यान दिसून आलं आहे. `झी न्यूज हिंदी`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीचं तापमान वाढतं आणि ते पृथ्वीला विनाशाकडे नेत आहे. जागतिक तापमानवाढ आणि त्यामुळे निर्माण होत असलेल्या समस्यांवर शास्त्रज्ञ सातत्याने संशोधन करत आहेत. या संशोधनादरम्यान शास्त्रज्ञांनी एका छोट्या जीवाविषयी मोठा दावा केला आहे. छोट्या वाळवीमुळे पृथ्वी विनाशाकडे जात असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. हा दावा ऐकल्यानंतर कदाचित तुम्हाला विचित्र वाटेल आणि एका वाळवीमुळे जग कसं संकटात येऊ शकतं असा प्रश्न तुम्हाला पडेल; पण जागतिक तापमानवाढीला काही अंशी तुमच्या घरातलं फर्निचर खराब करणारी वाळवीही कारणीभूत आहे. हा एक छोटासा जीव असल्याने तुम्हाला कदाचित तो सर्वसामान्य वाटेल; पण शास्त्रज्ञांनी वाळवीविषयी केलेला दावा धक्कादायक आहे.
हेही वाचा - Monk Fruit For Diabetes : साखरेपेक्षाही गोड, मधुमेहाच्या रुग्णांसाठी उत्तम आहे हे फळ! वाचा फायदे
वाळवी झाडांचा कमकुवत किंवा खराब भाग वेगानं खायला लागते. या प्रक्रियेत वातावरणात मिथेन आणि कार्बन डाय ऑक्साइडसारखे धोकादायक वायू उत्सर्जित होतात. पृथ्वीच्या वातावरणात मिथेन आणि कार्बन डाय ऑक्साइडसारख्या वायूंचं प्रमाण वाढलं, तर ते धोकादायक ठरू शकतं. वाळवी झाडांचा कमकुवत किंवा खराब भाग खात असल्याने वातावरणात हे वायू वेगानं उत्सर्जित होत आहेत. या वायूंच्या उत्सर्जनामुळे पृथ्वीचं तापमान वेगानं वाढत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे वाळवीची संख्या वेगानं वाढणं आणि त्यांनी वेगानं लाकूड खाणं या प्रक्रियेचा संबंध उष्ण वातावरणाशी संबंधित आहे.
एका नव्या संशोधनानुसार, ज्या ठिकाणी उष्ण हवामान असतं, तिथे वाळवी लवकर लाकूड खाते. याशिवाय त्यांची संख्याही वेगाने वाढू लागते. याउलट हिवाळ्यात किंवा थंड हवामानात वाळवी संथपणे लाकूड खाते. अशा पद्धतीचं संशोधन यापूर्वीही झालं असून त्याचे निष्कर्षही स्पष्ट आहेत; मात्र या पार्श्वभूमीवर शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे, की छोटासा दिसणारा हा जीव जगभरात वेगानं पसरतो. त्यामुळे पृथ्वीवर आपत्ती येण्याचा धोका वाढतो. महाविनाश होण्यात वाळवी महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Science