नवी दिल्ली, 26 जुलै: अनेकांना फिरायची प्रचंड आवड असते. दरवर्षी नवीन ठिकाणं एक्सप्लोर करायची, ही तर अनेकांची बकेटलिस्ट असते. ज्यांना नवनवीन ठिकाणं फिरायला आवडतात, ते लाँग व्हेकेशन प्लॅन (Vacation) करतात. काही दिवस तिथेच थांबून तिथली संस्कृती (Culture) आणि बघण्यासारखी सर्व ठिकाणं फिरायची, असा त्यांचा हेतू असतो; पण असा प्लॅन करताना सर्वांत मोठी अडचण असते ती बजेटची. कारण व्हेकेशन ठराविक बजेटमध्ये नाही बसलं तर मग खर्च वाढतो. त्यातही तुम्ही सिझनमध्ये एखाद्या ठिकाणी फिरायला जात असाल, तर मग तिथली हॉटेल्स आणि बाकीचे दर खिशाला परवडणारे नसतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांबद्दल माहिती देणार आहोत, जिथे तुम्ही अगदी फ्रीमध्ये राहू शकता, तिथे तुम्हाला खाणं-पिणंही फ्री असतं. भारतात अनेक धर्मशाळा आणि आश्रमांमध्ये राहण्यासाठी एक रुपयाही द्यावा लागत नाही. या संदर्भात आज तकने वृत्त दिलंय. मणिकरण साहिब गुरुद्वारा (हिमाचल प्रदेश) यंदाचा तुमचा प्लॅन हिमाचल प्रदेशला भेट देण्याचा असेल तर तुम्ही मणिकरण साहिब गुरुद्वारामध्ये मोफत राहू शकता. इथे तुम्हाला मोफत पार्किंग आणि जेवणाची सुविधाही मिळते. मणिकरण साहिब गुरुद्वारा पार्वती नदीजवळ आहे. ईशा फाउंडेशन ईशा फाउंडेशन (Isha Foundation) कोईम्बतूरपासून 40 किमी अंतरावर आहे. हे आध्यात्मिक गुरू सद्गुरूंचे धार्मिक सेंटर आहे, जिथे आदियोगी शिवाची एक अतिशय सुंदर आणि विशाल मूर्ती आहे. हे सेंटर योग, पर्यावरण आणि सामाजिक कार्याच्या क्षेत्रात काम करते. तुम्ही इथे अगदी फ्रीमध्ये राहू शकता. Pune : खमंग कुरकुरीत डिस्को मिरची भजी बघूनच सुटेल तोंडाला पाणी, VIDEO आनंदाश्रम (केरळ) केरळच्या सुंदर, नयनरम्य टेकड्या आणि हिरवाईच्या मधोमध आनंदाश्रमात राहणं हा नक्कीच एक वेगळा अनुभव असू शकतो. या आश्रमात तुम्ही मोफत राहू शकता. आश्रमात तुम्हाला दिवसातून तीन वेळा कमी मसालेदार जेवण दिलं जातं. गोविंद घाट गुरुद्वारा (उत्तराखंड) हा गुरुद्वारा उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील अलकनंदा नदीजवळ आहे. पर्यटक, ट्रेकर्स आणि भाविक येथे मोफत राहू शकतात. गुरुद्वारातून तुम्हाला नयनरम्य पर्वतराजी पाहता येते. Nashik : छंद माझा वेगळा, दुसऱ्याची सकाळ गोड करण्यासाठी झटणारा अवलिया गीता भवन (हृषिकेश) पवित्र गंगा नदीच्या काठावर असलेल्या गीता भवनमध्ये (Geeta Bhavan) पर्यटक विनामूल्य राहू शकतात. सोबतच इथे जेवणही मोफत दिलं जातं. या आश्रमात जवळपास 1000 खोल्या असून, इथे जगभरातून लोक येतात आणि राहतात. आश्रमातर्फे सत्संग आणि योगासनाची सेशन्स घेतली जातात. तिबेटियन बौद्ध मठ सारनाथ उत्तर प्रदेशात असलेल्या या ऐतिहासिक मठात एका रात्रीच्या मुक्कामासाठी फक्त 50 रुपये भाडं द्यावं लागतं. या मठाची देखभाल लाधन चोरुटल मोनालम चेनमो ट्रस्ट करतं. या मठात भगवान बुद्धांचं रूप असलेल्या शाक्यमुनींची मूर्ती आहे. न्यिंगमापा मॉनेस्ट्री (हिमाचल प्रदेश) ही मॉनेस्ट्री रेवलसर शहरातील रेवलसर तलावाजवळ आहे. या सुंदर मॉनेस्ट्रीमध्ये राहण्यासाठी एका दिवसाचं भाडं फक्त 200 ते 300 रुपये आहे. त्याच्याजवळ एक स्थानिक मार्केट असून तिथून तुम्ही खरेदी करू शकता. भारतातील या प्रसिद्ध ठिकाणी तुम्ही अगदी कमी पैशांत तर काही ठिकाणी तुम्ही अगदी मोफत राहू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.