- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
Varanasi | बनारसला जायचे असेल तर 'या' दिवसातच भेट द्या, जाणून घ्या कारण

बनारस, वाराणसी, काशी.. काहीही म्हणा पण या शहराला आयुष्यात एकदा तरी भेट द्यावी असे हे शहर आहे. गेल्या काही दिवसांपासून बनारस चर्चेत आहे. बनारसला (Varanasi) जाण्याचा तुमचा खूप दिवसांपासूनचं प्लॅनिंग असेल तर कोणत्या दिवसांत जायला हवं याची माहिती इथं वाचा.
- News18 Lokmat
- Last Updated: Jan 11, 2022 04:48 PM IST
मुंबई, 11 जानेवारी : गेल्या काही दिवसांपासून वाराणसी (Varanasi) म्हणजे काशी (Kashi) चर्चेत आहे. श्री काशी विश्वनाथ मंदिर परिसरात ड्युटी करणारे आता जूट घालून ड्युटी करणार आहेत. वाढती थंडी पाहता रविवारी मंदिर परिसरात कर्तव्य बजावणाऱ्यांना चपलांचे वाटप करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या सूचनेवरून मंदिरात हा उपक्रम घेण्यात आला. सीआरपीएफ (CRPF) जवान, पोलीस, अर्चक, सेवक आणि सफाई कर्मचारी थंडीत अनवाणी ड्युटी करतात हे पंतप्रधानांना समजल्यानंतर त्यांना हा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी यांनी भव्य अशा काशी धामचे लोकार्पण केलं होतं. तुम्ही अनेक दिवसांपासून काशीला जाण्याचा विचार करत असाल. मात्र, काही कारणांमुळे तुम्हाला हे शहर जवळून पाहता आले नसेल, तर यंदाच्या वर्षी बनारसला नक्की भेट द्या. जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक असलेले काशी, बनारस, ज्याला वाराणसी देखील म्हणतात. या शहराला वेगळ्या परिचयाची गरज नाही.
बनारस शहराचा उल्लेख तुम्ही अनेक बॉलिवूड हिट चित्रपट आणि गाण्यांमध्ये ऐकला असेल. इथल्या वाकड्या तिकड्या गल्ल्या, गंगेचा घाट आणि आरती, चहा-चाट-पकोडे हे सगळे किस्से तुमच्यापर्यंत पोहोचलेच असतील. बनारस पानची स्तुती तर तुम्ही ऐकली असेलच. चला या शहराबद्दल आणखी जाणून घेऊ.
बनारस हे हिंदू धर्मात पवित्र स्थान मानले जाते. मृत्यूनंतर लोक प्रियजनांच्या अंत्यसंस्कारासाठी येथे येतात. एकीकडे आयुष्याचा शेवटचा प्रवास आणि दुसरीकडे आयुष्याचा उत्साह, ही बनारसची खासियत आहे. वास्तविक ऑक्टोबर, सप्टेंबर, डिसेंबर या तीन महिन्यांत बनारसला भेट देण्याची एक वेगळीच मजा असते आणि हे तीन महिने चुकले तर पुन्हा एकदा पुढच्या वर्षभरासाठी आपला कार्यक्रम पुढे ढकलावा लागतो.
या दिवसांत बनारस खास का दिसतो?
बनारसमध्ये दुर्गापूजेपासून दसरा आणि दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. या दिवसांत येथील दृश्य खूपच वेगळे पाहायला मिळते. गंगा घाटावर लोकांची विशेष गर्दी असते. बनारसला गेलात तर आसी घाटाला नक्की भेट द्या. निरुत्साही माणसातही या घाटावर आल्यावर उत्साह निर्माण होतो. गंगा घाटावरचं वातावरण पाहून कोणीही भान हरपून याl मिसळून जाईल. दररोज सकाळी आणि संध्याकाळी गंगा आरती होते. रात्रीपर्यंत लोकांची गर्दी असते.
तुम्ही दशाश्वमेध घाटाला देखील भेट देऊ शकता, याला शिवभक्तांचे निवासस्थान देखील म्हणतात. तसे, बनारसमध्ये घाटांची कमतरता नाही. तुम्ही क्रूझद्वारे देखील बनारस घाटाला भेट देऊ शकता.
देशातील सर्वात सुंदर sunrise आणि sunset इथं पाहायला मिळतात!
या खास टिप्सने तुमचा प्रवास सुखकर करा
तुम्ही बनारसला जाणार असाल तर इथे पोहोचून सारनाथ, गयाला जा. लखनौ आणि अयोध्या या नवाबांच्या शहरांना देखील भेट देऊ शकता.
बनारसचं गुलकंद पान खायला विसरू नका
'खाई के पान बनारस वाला, खुल जाए बंद अकाल का ताला' या गाण्याचे बोल बनारसच्या पानाची खासियत सांगण्यासाठी पुरेसे आहेत. बनारसचे नाव जिभेवर येताच ‘बनारसी पान’चे चित्र सर्वप्रथम डोळ्यासमोर येते. परदेशी पर्यटकही याचा आस्वाद घेताना दिसतात. 'गुलकंद वाला पान' ही प्रत्येकाची पहिली पसंती आहे. इथे तुम्ही गुलकंद पान कोणत्याही कोपऱ्यातून खाऊ शकता.
इथे लस्सी प्यायला विसरू नका
बनारसी लस्सी हाही इथला मुख्य पदार्थ आहे. बनारसची 'पहिलवान लस्सी' खूप प्रसिद्ध आहे. जे परदेशी भारतात भेटायला येतात ते नक्कीच याचं सेवन करतात. बनारसच्या चौकात एक जागा आहे, या भागातील कचोरी गल्लीत ‘ब्लू लस्सी’ नावाचे दुकान आहे. येथे तुम्हाला सफरचंद, केळी, डाळिंब, आंबा आणि रबडी यासह प्रत्येक चवीची लस्सी मिळेल.
इथे पुरी-सब्जी आणि जिलेबी खायला विसरू नका.
गरमागरम जिलेबीसोबत भोपळ्याची पुरी-भाजी ही बनारसची ओळख आहे. लंकास्थित असलेलं दुकान' पुरी-भाजीसाठी प्रसिद्ध आहे. त्याचा आस्वाद घेण्यासाठी लोक सकाळपासूनच दुकानात गर्दी करतात.