पाटणा, 17 सप्टेंबर : दोन वर्षाच्या कोरोना संसर्गामुळे प्रत्येकाला घराब बसावं लागलं होतं. आता सर्व निर्बंध हटवण्यात आल्याने लोक मोठ्या संख्येने पर्यटनाला बाहेर पडत आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे अनेकांना आर्थिक फटका बसला. परिणामी इच्छा असूनही अनेकांना आपल्या मनाला मुरड घालावी लागत आहे. तुम्ही देखील यापैकीच असाल तर तुमच्यासाठी रेल्वे आहे ना. जर तुम्ही नोव्हेंबर महिन्यात राजस्थानला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. वास्तविक, IRCTC एक अतिशय आलिशान आणि परवडणारे हवाई टूर पॅकेज देत आहे. या पॅकेजद्वारे तुम्हाला जयपूर, पुष्कर, उदयपूर, जोधपूर आणि जैसलमेरला भेट देण्याची संधी मिळेल. हे पॅकेज पाटणा येथून सुरू होणार आहे. आयआरसीटीसीने ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आयआरसीटीसीने ट्विटरच्या माध्यमातून या हवाई टूर पॅकेजची माहिती दिली आहे. या पॅकेजअंतर्गत तुम्हाला एकूण 7 रात्री आणि 8 दिवस प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. आयआरसीटीसी शिमला टूर पॅकेजमध्ये तुम्हाला नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाची सुविधा मिळेल. यासोबतच रात्रीच्या मुक्कामासाठी हॉटेलची सुविधाही मिळेल. पॅकेजचे प्रारंभिक भाडे 34,810 रुपये आहे. आयआरसीटीसीच्या www.irctctourism.com या वेबसाइटला भेट देऊन प्रवासी या हवाई टूर पॅकेजसाठी बुकिंग करू शकतात.
From the Pink city to the City of Lakes, explore Rajasthan with IRCTC's Air tour package starting from ₹34810/- onwards. For details, visit https://t.co/YpV8dzMpE8 @AmritMahotsav #AzadiKiRail
— IRCTC (@IRCTCofficial) September 14, 2022
टूर पॅकेज तपशील पॅकेजचे नाव- Jewels of Rajasthan Ex Patna (EHR111) डेस्टिनेशन कव्हर- जयपूर, पुष्कर, उदयपूर, जोधपूर आणि जैसलमेर टूर कालावधी - 8 दिवस / 7 रात्री जेवण योजना - नाश्ता आणि रात्रीचे जेवण प्रवास मोड - फ्लाइट प्रस्थान तारीख - नोव्हेंबर 30, 2022 सुटण्याची वेळ- हावडा स्टेशन 21:55 PM
पॅकेजची सुरुवातीची किंमत 34,810 रुपये पॅकेजच्या किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, आराम वर्गातील ट्रिपल ऑक्यूपेन्सीवर प्रतिव्यक्ती खर्च 34,810 रुपये आहे. डबल ऑक्यूपेन्सीवर प्रतिव्यक्ती खर्च 35,830 रुपये आहे. त्याच वेळी, सिंगल ऑक्यूपेन्सीवर प्रतिव्यक्ती खर्च 47,310 रुपये आहे. 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलासाठी एका बेडसह 31,100 रुपये शुल्क आकारले जाते. याशिवाय 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी बेडशिवाय 28,620 रुपये, तर 2 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी बेडशिवाय 15,150 रुपये मोजावे लागतील.