नवी दिल्ली, 25 सप्टेंबर : देशात लाखो लोक रोज रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे प्रवास सर्वात स्वस्त आणि सुरक्षित मानला जातो. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना सुविधा देण्यासाठी भारतीय रेल्वे वेळोवेळी अनेक बदल करत असते. तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण, आता रेल्वेत झोपण्याचे नियम बदलणार आहे. नियम जाणून घेतल्यास होणार नाही त्रास भारतीय रेल्वेमध्ये दररोज कोट्यावधीहून अधिक प्रवासी प्रवास करतात. मात्र, यातील बहुतेक प्रवाशांना रेल्वे प्रवासाशी संबंधित आवश्यक नियम आणि नियमांची माहिती नसते, ज्यामुळे त्यांना कधीकधी समस्यांना सामोरे जावे लागते. रेल्वे प्रवासाशी संबंधित हे नियम तुम्ही पाळले तर वाटेत येणाऱ्या अनेक त्रासांपासून तुमची सुटका होईल. रेल्वेच्या नव्या नियमांनुसार, आता तुमच्या कंपार्टमेंट किंवा डब्यातील कोणत्याही प्रवाशाला मोबाईलवर मोठ्या आवाजात बोलता येणार नाही किंवा मोठ्या आवाजात गाणी ऐकता येणार नाहीत, जेणेकरून प्रवाशांच्या झोपेचा त्रास होऊ नये आणि त्यांना शांतपणे झोपता येईल. वाचा - सणासुदीला घरी जायचं असेल तर आता रेल्वे बुकींगचं टेंशन सोडा! IRCTC चं हे फिचर वापरा नियम काय आहेत? रेल्वेच्या नियमांनुसार रात्री 10 वाजल्यानंतर तुमच्या डब्यात किंवा कोचमध्ये जर कोणी मोबाईलवर मोठ्याने बोलत असेल किंवा मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी ऐकत असेल तर संबंधित व्यक्तीवर कारवाई होऊ शकते. हा नियम लागू केल्यानंतर तुम्ही ट्रेनमध्ये कोणत्याही अडचणीशिवाय शांतपणे झोपू शकता. प्रवासादरम्यान कोणी आवाज करत असल्यास. अशा स्थितीत तुम्ही याबाबत रेल्वे कर्मचाऱ्यांकडे तक्रार करू शकता. संबंधित व्यक्तीवर तातडीने कारवाई केली जाईल. असे करा तिकीट बुक रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या देशात सर्वाधिक आहेत. परिणामी रेल्वेचं बुकींग किमान महिनाभर आधीच करावे लागते. त्यानंतरही अनेकांना कन्फर्म तिकीट मिळत नाही. काही वेळा जास्त वेटिंगमुळेही तिकीट कन्फर्म होत नाही. यामध्ये लोकांकडे तत्काळ तिकीट बुकिंगचा पर्याय आहे. भारतीय रेल्वे प्रवाशांना तत्काळ तिकीट बुकिंग करण्याचा पर्याय देते. पण, जास्त मागणीमुळे, तत्काळ तिकीट बुक करणे खूप कठीण काम आहे. पण, आता तुम्ही IRCTC द्वारे तत्काळ तिकीट सहजपणे बुक करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.