प्रवाशांसाठी भारत ‘जगात भारी’; फ्रान्स, जर्मनी, जपानपेक्षाही ठरला सरस

प्रवाशांसाठी भारत ‘जगात भारी’; फ्रान्स, जर्मनी, जपानपेक्षाही ठरला सरस

प्रवास करण्यासाठी जगातील सर्वोत्तम देशांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यात भारतानं दहावा क्रमांक पटकावला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 जुलै: प्रवास करण्यासाठी (Travel) उत्तम असणाऱ्या जगभरातील देशांच्या (list of countries) यादीत भारतानं (India) दहावा क्रमांक (Tenth position) पटकावला आहे. वेेगवेगळ्या निकषांवर (Criteria) काढण्यात आलेल्या या यादीत जगातील 118 देशांमध्ये भारतानं दहावा नंबर पटकावला आहे. जगात पर्यटनासाठी उत्तम मानल्या गेलेल्या अनेक देशांना भारतानं या यादीत मागे सोडलं आहे. जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये जर ‘रोड ट्रिप’चं प्लॅनिंग करायचं असेल, तर कुठला देश सर्वार्थानं उत्तम ठरेल, या निकषावर ही यादी तयार करण्यात आली आहे. त्यात देशातील रस्ते, पर्यटन स्थळं, नैसर्गिक ठिकाणं, महागाई अशा अनेक बाबींचा विचार करण्यात आला होता.

पर्यटनासाठी भारत ठरला अनुकुल

अमेरिका, मेक्सिको, कॅनडा आणि मलेशिया या देशांनी प्रवासासाठी उत्कृष्ट असणाऱ्या देशांच्या यादीत अव्वल स्थानी स्थान पटकावलं आहे. भारत या यादीत दहाव्या स्थानी आहे. तर भारताच्या खाली फ्रान्स, जर्मनी, जपान, टर्की आणि स्पेन यासारख्या देशांचा नंबर लागला आहे. हे सर्व देश पर्यटनासाठी लोकप्रिय मानले जातात. मात्र त्यांना मागे टाकत भारताने या यादीत सरस कामगिरी केली आहे.

हे होते निकष

या यादीत मानांकनासाठी काही निकष ठऱवून देण्यात आले होते. देशातील आकर्षणाची ठिकाणं, एकूण प्रदेशाचे क्षेत्रफळ, देशात आढळणाऱ्या विविध प्रजाती, समुद्रकिनारे, जंगलं यासारखी नैसर्गिक ठिकाणं, डोंगर, पर्वत, वाळवंटं, वने यासारख्या विविध बाबींवर आधारित गुणांकन यासाठी करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणं देशातील पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर,  खाण्याचा आणि निवासाचा खर्चही त्यात पकडण्यात आला होता. या सर्व निकषांवर भारताने या यादीत दहावा क्रमांक पटकावला आहे.

हे वाचा- किम जोंगने केला कहर, 2017 नंतरचं सर्वात मोठं ‘डेअरिंग’

असे होते निकाल

या निकषांवर केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतात 40 युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट्स, 1900 प्रजाती, मुंबई आणि दिल्ली या जगातील टॉप 100 शहरांच्या यादीतील दोन शहरं आणि प्रवास करण्यासाठी सर्व मिळून दर आठवड्याला येणारा 13 हजार रुपये खर्च असे निष्कर्ष समोर आले.

Published by: desk news
First published: January 30, 2022, 5:55 PM IST

ताज्या बातम्या