- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
गुलाबी थंडीत फिरायला जाण्याचा विचार करताय? बॅगेत ह्या गोष्टी घ्या नाहीतर ऐनवेळी होईल अडचण

हिवाळ्यात (Winter Travel) प्रवास करण्याची एक वेगळीच मजा असते. पण, तुम्ही काळजी घेतली नाही तर आजारी पडण्याचीही शक्यता जास्त आहे. त्यामुळे बॅग भरताना काही आवश्यक गोष्टी नक्की पॅक करा.
- News18 Lokmat
- Last Updated: Dec 27, 2021 07:35 PM IST
मुंबई, 27 डिसेंबर : हिवाळ्यातील (Winter) गुलाबी थंडीत प्रवास करण्याची एक वेगळीच मजा असते. पण, या मौजमजेसोबतच हिवाळ्यात प्रवास करणं थोडं कठीण देखील असतं. बदलत्या ऋतूमुळे प्रवास करताना आरोग्याची काळजी (Health Care) घेणे जास्त गरजेचे आहे जेणेकरून तुमचा प्रवास संस्मरणीय होईल. तुम्ही जिथे जाणार आहात तेथील हवामानानुसार कपडे आणि इतर आवश्यक वस्तू पॅक करा, जेणेकरून तुम्हाला तेथील हवामानाचा आनंद घेता येईल. अशा वातावरणात फिरायला जाताना तुमच्या बॅगेत काही गोष्टी असणे फार आवश्यक आहे. चला तर मग आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, हिवाळ्याच्या मोसमात कोणत्या गोष्टी लक्षात ठेवून पॅक करायला हव्यात जेणेकरून तुमचा प्रवास सुखकर होईल.
पर्यटकांचा वैयक्तिक अनुभव वाचणे महत्त्वाचे personal experience
सर्वात आधी तुम्ही ज्या ठिकाणी फिरायला जाणार आहात, तेथील हवामानासंदर्भात सर्व माहिती गोळा करा. बर्याच वेबसाइट्सवर तुम्हाला अशा स्थळासंदर्भात लोकांचे वैयक्तिक अनुभव (personal experience) वाचण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुम्हाला तुमची बॅग पॅक करणे खूप सोपे होईल. अशा अनुभवांमध्ये लोकांनी ज्या गोष्टी अशा ठिकाणी आवश्यक असल्याचे लिहले आहे, त्या पॅकिंग करताना चुकूनही विसरू नका.
जाड उबदार कपडे पॅक करणे टाळा Avoid packing thick warm clothes
बरेच लोकांना वाटतं की जाड कापड म्हणजे अधिक गरम. मात्र, तसं असेलच असं नाहीय. चांगल्या दर्जाचे उबदार कपडे पातळ असले तरी ते खूप गरम असतात. जर तुम्ही तुमची संपूर्ण पिशवी जाड उबदार कपड्यांनी भरली असेल, तर तुम्हाला इतर आवश्यक गोष्टींसाठी दुसरी बॅग घ्यावी लागेल, ज्यामुळे तुमचे सामान ओव्हरलोड (luggage overload) होईल. त्याऐवजी, स्लिम जॅकेट तुमच्या ट्रॅव्हल बॅगमध्ये पॅक करा.
कोणत्या ठिकाणी कोणते शूज घालायचे ते जाणून घ्या Shoes Choice
शूज असे असावेत की हवामानाचा त्यावर कोणताही परिणाम होणार नाही. प्रवासासाठी गडद रंगाचे शूज पॅक करा. डोंगराळ भागात चालण्यासाठी लेस शूज घालणे कधीही चांगले आहे. तर बर्फाळ भागात बॅगमध्ये उंच बूट आणि उबदार मोजे काळजीपूर्वक ठेवा.
आगाऊ हॉटेल बुकिंग करा Hotel Booking
थंडीच्या मोसमात हॉटेल शोधणे ही देखील मोठी समस्या आहे. अशा परिस्थितीत तुम्ही ज्या ठिकाणी फिरायला जाणार आहात तिथे पोहोचून हॉटेल शोधण्याची चूक करू नका. सहलीतील त्रास टाळण्यासाठी तुम्ही जिथे जात आहात त्या ठिकाणासाठी आगाऊ हॉटेल्स बुक करा. आपण कोणत्याही ट्रॅव्हल कंपनी किंवा कोणत्याही वेबसाइटची मदत देखील घेऊ शकता.
स्वर्गात जाण्याची शिडी कुठे आहे माहिती आहे का? शिडी काढण्याचा निर्णय का घेतला?
कपडे पॅक करताना या गोष्टी ठेवायला विसरू नका
कपडे पॅक करताना मफलर, उबदार टोपी, शाल जरूर पॅक करा. स्वेटर किंवा जॅकेट घातल्यानंतरही मान, कान यांना थंडी वाटते, त्यामुळे सहलीचा आनंद घेण्याऐवजी आजारी पडण्याची शक्यता जास्त आहे. हे टाळण्यासाठी कपडे पॅक करताना या सर्व गोष्टी बॅगेत ठेवा. जर तुमच्यासोबत लहान मुलेही असतील तर त्यांच्यासाठी अधिक उबदार कपडे बांधा. थर्मल पॅक केल्याची खात्री करा. थर्मल जितका गरम असेल तितका कपड्यांचा भार कमी होईल.
यासोबत तुम्ही लोकरीचे किंवा वॉटर प्रूफ हातमोजे देखील घेतले पाहिजेत. ते परिधान करून, तुम्ही फोन आणि कॅमेरा आरामात वापरू शकाल. डोंगराळ भागात फिरण्यासाठी पोलराइज्ड सनग्लासेस जरूर घ्या. सामान्य सनग्लासेसमध्ये बर्फावर पडणारा प्रकाश किरण देखील डोळ्यांसाठी हानिकारक असतो.
गुजरातमध्ये जाण्यापूर्वी तुम्हाला 'या' 5 गोष्टी माहित असणे आवश्यक!
सनस्क्रीन (Sunscreen) उन्हाळ्यात जितके महत्त्वाचे असते तितकेच हिवाळ्यातही असते. तसेच तुम्ही सर्दी, ताप आणि ऍलर्जीसाठी औषधे पॅक करणे आवश्यक आहे. प्रवास करताना डेबिट किंवा क्रेडिट कार्डवर अवलंबून राहू नका. रोख रक्कम सोबत ठेवण्याची सवय करा. छोट्या दुकानांमध्ये प्रवासादरम्यान कार्डद्वारे पैसे भरण्याची सोय नसेल तर तुमची अडचण होऊ शकते. सर्वात महत्वाचं सध्याची कोविड परिस्थिती पाहता सॅनिटाजर, मास्क या गोष्टी सर्वात आधी बॅगेत ठेवा.