- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- देश
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
गुजरातमध्ये जाण्यापूर्वी तुम्हाला 'या' 5 गोष्टी माहित असणे आवश्यक!

गुजरातला (Gujrat) रंगीबेरंगी शहरही म्हटलं जातं. इथली संस्कृती लोकांमध्ये पदोपदी पहायला मिळते. गुजरातमध्ये अशी अनेक ठिकाणं आहेत, जी तुम्ही नक्की पहायला पाहिजेत.
- News18 Lokmat
- Last Updated: Dec 27, 2021 09:35 PM IST
अहमदाबाद, 23 डिसेंबर : गुजरातमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्यासाठी काही दिवस नक्कीच येथे घालवता येतील. इथल्या ठिकाणांपासून ते खाद्यपदार्थांपर्यंत अशा हजारो गोष्टी आहेत, ज्यामुळे दरवर्षी लाखो पर्यटक गुजरातला भेट देत असतात. गुजरातमधील लोकांमध्ये या राज्याची संस्कृती तुम्हाला पदोपदी पहायला मिळेल. येथील लोकांना रंगीबेरंगी कपडे घालायला आवडतात. विशेषतः महिलांमध्ये सुंदर दागिन्याची आवड आवड. येथे बहुतेक लोक गुजराती बोलतात. मात्र, हिंदी, उर्दू, सिंधी आणि इंग्रजी बोलणारेही लोकं तुम्हाला भेटतील. त्यामुळेच की काय गुजरातला 'पश्चिमचे रत्न' देखील म्हटले जाते. येथे तुम्हाला नवीन आणि जुन्या परंपरांचे उत्कृष्ट संयोजन पहायला मिळते.
राज्याचे नाव 'गुज्जरत्ता' या शब्दावरून पडले, ज्याचा अर्थ गुज्जरांची जमीन आहे. अशा इतर अनेक गोष्टी आहेत ज्या गुजरातमध्ये काही दिवस घालवण्यापूर्वी जाणून घेतल्या पाहिजेत.
गुजरातमध्ये पूर्वी कोणाची सत्ता होती?
गुजरातमधील लोथल, धोलाविरा, रंगपूर यांसारखे पुरातत्व शोध सिंधू संस्कृतीच्या काळातील आहेत. तेव्हापासून ब्रिटीश येईपर्यंत या राज्यावर मौर्य, खिलजी आणि इतर मुस्लिम शासक आणि मराठे यांसारख्या अनेक शक्तिशाली राज्यांचे राज्य होते. आता जेव्हा तुम्ही गुजरातमध्ये काही दिवस घालवायला जाल तेव्हा तुम्हाला ही ठिकाणं पाहायला मिळतील. इथल्या इमारतींमध्ये मौर्य, खिलजी आणि इतर मुस्लिम राज्यकर्त्यांची तसेच मराठ्यांची झलक का दिसते हे समजेल.
येथे भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ
गुजरातमधील हवामान वर्षभर सामान्य असते. वास्तविक कच्छसारखे राज्याचे काही भाग उष्ण आणि कोरडे आहेत. परिणामी इथं भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा सर्वोत्तम काळ आहे. यावेळी तुम्हाला आल्हाददायक वातावरणात गुजरात अनुभवण्याचा आनंद घेता येईल.
Hampi vitthal mandir | हंपी येथील विठ्ठल मंदिराविषयी या 2 आख्यायिका माहिती आहे?
इथं पाहण्यासारखी शहरं कोणती?
गुजरातमध्ये सुंदर शहरांची कमतरता नाही, अहमदाबाद, गांधीनगर, वडोदरा, पोरबंदर, जामनगर, पावागढ, चंपानेर, आनंद, भावनगर, मांडवी, पाटण, राजकोट, सुरत ही सर्व सुंदर शहरे येथे आहेत. मात्र, विशेष शहरांमध्ये अहमदाबाद, गांधीनगर, वडोदरा, पोरबंदर आणि जामनगर यांचा समावेश करा.
या वस्तू खरेदी करण्यास विसरू नका
जेव्हा तुम्ही गुजरातमध्ये फिरायला जाता तेव्हा येथे काही सुंदर आणि खास गोष्टी विकत घेतल्याशिवाय तुमचा गुजरात प्रवास अपूर्ण आहे. काही पर्यटक खास खरेदी करण्यासाठीच गुजरातमध्ये फिरायला येतात.
गुरु गोविंद सिंग, ज्यांनी शिख धर्मातील सर्वात मोठी परंपरा थांबवली!
येथील हस्तकलेच्या वस्तू जगभरात प्रसिद्ध आहेत. गुजरातमधील सर्वात प्रसिद्ध हस्तकला वस्त्राशी संबंधित आहेत. येथील भरतकामाला शतकानुशतके जुना इतिहास आहे. गुजरातमध्ये खरेदी करताना काही खास गोष्टी ज्या तुम्ही पाहू शकता ते म्हणजे पटोला सिल्क साड्या, भरतकाम, रजाई, घागरा चोली, पाळणा कापड, कापडी खेळणी, भरतकाम केलेले शूज, लोखंडी फर्निचर आणि खास घराच्या सजावटीसाठी अनेक रंगांचे सुंदर मिश्रण असलेल्या वस्तू. तुम्ही अहमदाबादमध्ये सीजी रोड, आश्रम रोड आणि रिलीफ रोडवर खरेदी करू शकता. पण एकही वस्तू खरेदी केल्याशिवाय तुम्ही गुजरातला अलविदा म्हणू नये.
ही ठिकाणं मिस करू नका
गुजरातमध्ये अशा ठिकाणांची कमी नाही जी एकदा पाहिल्यानंतर पुन्हा पुन्हा पहावीशी वाटतात. यात द्वारकानाथ मंदिर, सोमनाथ मंदिर, तख्तेश्वर मंदिर, अक्षरधाम मंदिर, कालिका मंदिर, नारायण मंदिर, जामा मशीद, राज बाबरी मशीद, राणी रुपमती मशीद ही ठिकाणे तुम्ही तुमच्या प्रवासाच्या यादीत समाविष्ट केली पाहिजेत. धार्मिक स्थळांव्यतिरिक्त, तुम्ही गीर फॉरेस्ट नॅशनल पार्क, मरीन नॅशनल पार्क, कच्छ वाळवंट वन्यजीव अभयारण्य, जंगली गाढव अभयारण्य, नील सरोवर पक्षी अभयारण्य आणि कच्छ बस्टर्ड सेंच्युरी सारखी ठिकाणे देखील समाविष्ट करू शकता. लास्ट बट नॉट द लिस्ट.. सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पहायला विसरू नका.