मराठी बातम्या /बातम्या /explainer /

गुरु गोविंद सिंग, ज्यांनी शिख धर्मातील सर्वात मोठी परंपरा थांबवली! माहीत नसलेल्या गोष्टी जाणून घ्या

गुरु गोविंद सिंग, ज्यांनी शिख धर्मातील सर्वात मोठी परंपरा थांबवली! माहीत नसलेल्या गोष्टी जाणून घ्या

Birthday Guru Govind Singh : गुरु गोविंद सिंग यांची जयंती प्रकाश पर्व म्हणून साजरी केली जाते. त्यांचा जन्म 22 डिसेंबर 1666 रोजी झाला. त्यांनी शीख धर्मासाठी अनेक महत्त्वाच्या गोष्टी केल्या. खालसा पंथाची स्थापना केली. त्यांनीच गुरु ग्रंथ साहिब यांना शिखांचे गुरू घोषित करून गुरु परंपरा थांबवली.

Birthday Guru Govind Singh : गुरु गोविंद सिंग यांची जयंती प्रकाश पर्व म्हणून साजरी केली जाते. त्यांचा जन्म 22 डिसेंबर 1666 रोजी झाला. त्यांनी शीख धर्मासाठी अनेक महत्त्वाच्या गोष्टी केल्या. खालसा पंथाची स्थापना केली. त्यांनीच गुरु ग्रंथ साहिब यांना शिखांचे गुरू घोषित करून गुरु परंपरा थांबवली.

Birthday Guru Govind Singh : गुरु गोविंद सिंग यांची जयंती प्रकाश पर्व म्हणून साजरी केली जाते. त्यांचा जन्म 22 डिसेंबर 1666 रोजी झाला. त्यांनी शीख धर्मासाठी अनेक महत्त्वाच्या गोष्टी केल्या. खालसा पंथाची स्थापना केली. त्यांनीच गुरु ग्रंथ साहिब यांना शिखांचे गुरू घोषित करून गुरु परंपरा थांबवली.

पुढे वाचा ...
    मुंबई, 22 डिसेंबर : शिखांचे गुरु गोविंद सिंग यांनी 1699 साली खालसा पंथाची स्थापना केली. शीखांच्या इतिहासातील ही सर्वात महत्त्वाची घटना मानली जाते. गुरु गोविंद सिंग यांनीच गुरु ग्रंथ साहिब यांना शिखांचे गुरू घोषित करून गुरु परंपरा संपुष्टात आणली. आज गुरु गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त जाणून घ्या त्यांच्याबद्दल सर्व काही. गुरु गोविंद सिंग यांचा जन्म पटना साहिब येथे झाला. त्यांचे बालपणीचे नाव गोविंद राय होते. पटना येथे गुरू गोविंद सिंग यांचा जन्म झाला ते ठिकाण आता पटना साहिब म्हणून ओळखले जाते. त्यांचे वडील गुरु तेग बहादूर यांच्या निधनानंतर, ते 11 नोव्हेंबर 1675 रोजी गुरु झाले, जेव्हा ते केवळ 9 वर्षांचे होते. त्यांच्या वडिलांचा मृत्यू सामान्य नव्हता तर औरंगजेबाची धर्मांतराची मोहीम रोखताना त्यांची हत्या करण्यात आली होती. औरंगजेबाकडून वडिलांची हत्या औरंगजेब तेव्हा हिंदूंचे जबरदस्तीने धर्मांतर करत होता. पीडित लोकं तक्रार घेऊन गुरू तेग बहादूर यांच्यापर्यंत पोहोचले. या गोष्टीला विरोध करताच दिल्ली येथील चांदनी चौक येथे गुरु तेग बहादूर यांचा शिरच्छेद करण्यात आला. त्यानंतर लगेचच त्यांचा मुलगा गुरु गोविंद सिंग यांनी जबाबदारी घेतली. तेव्हापासून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोकांची सेवा करण्यात आणि सत्याच्या मार्गावर चालण्यात व्यतीत केलं. गुरुपद्धतीचा शेवट गुरू गोविंद सिंग यांनी गुरुपद्धती रद्द करत गुरु ग्रंथ साहिबला सर्वोच्च घोषित केलं, त्यानंतर गुरु ग्रंथ साहिबची पूजा झाली आणि गुरुपद्धतीचा संपुष्टात आली. शीख समाजात ही मोठी घटना मानली जाते. यासोबतच गोविंद सिंग यांनी खालसा वाणी “वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतह” ही घोषणा दिली. गुरू गोबिंग सिंग यांनी खालसा पंथाच्या रक्षणासाठी मुघल आणि त्यांच्या मित्रपक्षांशी अनेक वेळा युद्ध केलं. खालसा पंथाने एका नव्या युगाची सुरुवात गुरू गोविंद सिंग जी यांच्या नेतृत्वाने शीख समाजाच्या इतिहासात अनेक नवीन गोष्टी आल्या, त्यापैकी एक खालसा पंथाची स्थापना मानली जाते. खालसा पंथाची स्थापना गुरु गोविंद सिंग यांनी 1699 मध्ये आनंदपूर साहिब येथे बैसाखीच्या दिवशी केली होती. या दिवशी त्यांनी पाच प्रिय व्यक्तींना अमृत देऊन खालसा बनवलं. नंतर त्यांनी स्वतः त्याच पाच व्यक्तींच्या हातून अमृत प्याले. त्या 5 गोष्टी, ज्या त्याची देणगी आहेत त्यांनी खालसांना पाच तत्त्वे दिली, ज्यांना 5 क कार म्हणतात. पंच क कार म्हणजे 'क' शब्दापासून सुरू होणाऱ्या त्या 5 गोष्टी, ज्या सर्व खालसा शीखांनी गुरू गोविंद सिंग यांच्या तत्त्वांनुसार परिधान केल्या पाहिजेत. गुरु गोविंद सिंग यांनी शिखांसाठी पाच गोष्टी अनिवार्य केल्या होत्या - 'केश', 'कडा', 'कृपाण', 'कंघा' आणि 'कच्छ'. त्यांच्याशिवाय खालसा पोशाख पूर्ण मानला जात नाही Birthday Ramanujan : कुलदेवी स्वप्नात येऊन गणित सोडवते, असे रामानुजन म्हणायचे, काय आहे यामागचं कारण? अनेक भाषांचे जाणकार आणि उत्तम लेखक वयाच्या 9 व्या वर्षी जगातील सर्वात शक्तिशाली समुदायांपैकी एकाची कमान घेणारे गुरु गोविंद सिंग हे केवळ नायक नव्हते तर ते एक भाषा तज्ञ आणि चांगले लेखक देखील होते. त्यांना संस्कृत, फारसी, पंजाबी आणि अरबी भाषांचे ज्ञान होते. त्यांनी अनेक ग्रंथ रचले, जे आजही शीख समाजात उत्साहाने वाचले जातात. दरबारात लेखक आणि कवींची उपस्थिती बिचित्र नाटक हे त्यांचे आत्मचरित्र मानले जाते, वास्तविक त्यात आत्मचरित्रापेक्षा त्यावेळची परिस्थिती आणि अडचणींवर मात करण्याच्या मार्गांचा उल्लेख आहे. त्यांना विद्वानांची मोठी समज होती आणि असे म्हणतात की त्यांच्या दरबारात नेहमी लेखक आणि कवी यांची उपस्थिती असायची. यामुळेच गुरु गोविंद सिंग यांना संत शिपाई असेही संबोधले जाते. देवळांऐवजी शाळेत जायला सांगणारे बाबा! काय होतं जगण्याचं सोपं गणित? विश्वासघाताने हत्या धर्माच्या रक्षणासाठी गुरु गोविंद सिंग यांनी एक एक करून आपल्या संपूर्ण कुटुंबाचं बलिदान दिलं होतं. यानंतर त्यांना 'सर्बंसदानी' (सर्वज्ञ दाता) असेही संबोधले जाऊ लागले. याशिवाय लोक त्यांना कलगीधर, दशमेश, बजनवाले अशा अनेक नावांनी हाक मारत. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर घाबरलेल्या नवाब वजीत खानने गुरू गोविंद सिंग यांना कपटाने मारले. ही 7 ऑक्टोबर 1708 ची घटना असल्याचे समजते. गुरू गोविंदसिंग गेल्यानंतरही त्यांचा शब्द खालसा पंथ आणि पंच ककार या रूपाने शीख धर्मीयांमध्ये सर्वोच्च मानला जातो.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Guru purnima, Religion

    पुढील बातम्या