पंजाब राज्याचं 'हार्ट' पाहिलंय का? चंदिगड, पठाणकोट, अमृतसर सोडा.. या शहराला एकदा भेट द्या

पंजाब राज्याचं 'हार्ट' पाहिलंय का? चंदिगड, पठाणकोट, अमृतसर सोडा.. या शहराला एकदा भेट द्या

लोकांच्या गजबजाटापासून तुम्हाला निवांत उच्च पर्यटनाचा आनंद घेत असाल तर पंजाब (Punjab best Places) राज्यातील भटिंडा (Bathinda) हे शहर तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. भटिंडा शहरातच का? असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल तर हा लेख वाचा.

  • Share this:

भटिंडा, 6 जानेवारी : चंदिगड, पठाणकोट किंवा अमृतसर ही शहरे साधारणपणे पंजाबमध्ये फिरण्यासाठी प्रसिद्ध आहे. या शहरांमध्ये पाहण्यासारखी अनेक ठिकाणे असल्याने येथे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. अशा परिस्थितीत पंजाबमधील भटिंडा (Bathinda) हे शहर गजबजाटापासून दूर असलेले असे शहर आहे जिथे एक नाही तर अनेक मनोरंजक ठिकाणे आहेत. पंजाबच्या (Punjab) मध्यभागी वसलेल्या या शहराला राज्याचे हृदय म्हणूनही ओळखले जाते. भटिंडा हे पंजाबमधील सर्वात जुन्या शहरांपैकी एक मानले जाते, ज्याचा स्वतःचा समृद्ध इतिहास आहे. चला मग येताय ना?

जेव्हा तुम्ही भटिंडाला भेट द्यायला याल तेव्हा तुम्हाला इथल्या पंजाबी संस्कृतीचे खरे मर्म पाहायला मिळेल. लस्सीच्या मोठ्या ग्लासपासून ते पंजाबचे प्रमुख भूषण मानल्या जाणाऱ्या प्रसिद्ध भांगडा नृत्यापर्यंत प्रत्येक गोष्ट पाहायला मिळेल जो पंजाबलचा अलंकार समजला जातो. जर तुम्ही पंजाबमध्ये फिरण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे शोधत असाल, तर तुम्ही तुमच्या सहलीसाठी यादीत भटिंडाचा समावेश सर्वात आधी करा. विश्वास ठेवा, जर तुम्ही भटिंडाच्या प्रमुख पर्यटन स्थळांना भेट द्यायला गेलात, तर इथे तुम्हाला राज्याचे खरे सौंदर्य नक्कीच पाहायला मिळेल.

किल्ला मुबारक Qilla Mubarak  

किल्ला मुबारक हा केवळ पंजाबमधीलच नव्हे तर भारतातील सर्वात जुन्या किल्ल्यांपैकी एक आहे. हा किल्ला इसवी सन 90 ते 110 च्या सुमारास बांधला गेला असे मानले जाते. प्राचीन काळी हा किल्ला तबर-ए-हिंद किंवा भारताचे प्रवेशद्वार म्हणूनही ओळखला जात असे. तुम्ही जर इतिहास प्रेमी असाल तर भटिंडामधील हे ठिकाण तुमच्यासाठी नक्कीच सर्वोत्तम ठरू शकते. आम्ही तुम्हाला सांगतो की या किल्ल्यावर दरवर्षी लाखो पर्यटक येतात. येथे तुम्ही सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत फिरायला जाऊ शकता. हा किल्ला सोमवारी बंद राहतो.

भटिंडा तलाव Bathinda Lake

भटिंडा या ऐतिहासिक किल्ल्याला भेट दिल्यानंतर आता तुम्हाला नैसर्गिक ठिकाणांना भेट द्यायला नक्कीच आवडेल. भटिंडा तलाव हे शहरातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक मानले जाते. येथे दररोज पर्यटकांची वर्दळ असते. सायंकाळी तलावाच्या काठावर पर्यटकांची मोठी गर्दी होते. या तलावाच्या सभोवतालची हिरवळ आकर्षणात भर घालते. या तलावात नौकाविहाराची सुविधाही आहे, ज्यामुळे काश्मीरमधील शिकारासारख्या बोटींचा अनुभव येईल.

रोझ गार्डन Rose Garden

सुप्रसिद्ध किल्ला आणि सुंदर तलावानंतर फुलांच्या शहरात म्हणजेच रोज गार्डनला जा. 4 हजार स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळात पसरलेली ही बाग त्याच्या विविध प्रजातींच्या गुलाबांसाठी संपूर्ण पंजाबमध्ये प्रसिद्ध आहे. भटिंडातील हे असे ठिकाण आहे जिथे तुम्ही कुटुंब, मित्र किंवा जोडीदारासोबत कधीही भेटायला जाऊ शकता. या बागेच्या विलोभनीय सौंदर्यात तुम्ही नक्कीच हरवून जाल. या बागेत मुलांसाठी काही रोमांचक राइड्स देखील आहेत.

दमदमा साहिब गुरुद्वारा

किल्ला, तलाव, उद्यान पाहिल्यानंतर कोणत्याही पवित्र आणि धार्मिक स्थळाला भेट द्यायलाच हवी. दमदमा साहिब गुरुद्वाराचे दिव्य आभा आणि शांत वातावरण पर्यटकांना खूप आकर्षित करते. तख्त श्री दमदमा साहिब गुरुद्वारा हे शीख धर्माच्या 5 व्या तख्तांपैकी एक आहे. या ठिकाणाविषयी अशी आख्यायिका आहे की या ठिकाणी शिखांचे दहावे गुरु गोविंद सिंह यांनी शीख धर्मग्रंथ तयार केले होते, त्यामुळे येथे नेहमीच शीख धर्माच्या अनुयायांची गर्दी असते.

चेतक पार्क भटिंडा

चेतक पार्क हे भटिंडाच्या प्रमुख पर्यटन स्थळांपैकी आणखी एक आवडते ठिकाण आहे, जे पर्यटन स्थळ तसेच भटिंडाचे पिकनिक स्पॉट म्हणून प्रसिद्ध आहे. हिरवळ आणि सुंदर फुलांनी सुशोभित केलेले, चेतक पार्क भटिंडा कॅन्टोन्मेंटमधील चेतक तलावाजवळ स्थित आहे, जे येथे भेट देणार्‍या पर्यटकांना वॉटर बोटिंग आणि पक्षी निरीक्षण यासारखे अनेक रोमांचक गोष्टी देते. एकंदरीत हे एक मजेदार उद्यान आहे, जे कुटुंब किंवा मित्रांसह भेट देण्यासाठी भटिंडामधील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे.

भटिंडाला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ Best time to visit Bathinda

तुम्ही भटिंडाला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ शोधत असाल, तर आम्ही तुम्हाला ऑक्टोबर ते मार्च या थंडीच्या काळात भटिंडाला भेट देण्याचा सल्ला देऊ. कारण यावेळी भटिंडाचे हवामान अतिशय आल्हाददायक असते आणि येथील झाडेही हिरवीगार असतात. सामान्यतः भटिंडातील उन्हाळा अत्यंत उष्ण असतो ज्या दरम्यान भटिंडाचे तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे जाते. त्यामुळे ऑक्टोबर आणि मार्चचा काळ भटिंडाला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो.

भटिंडाला कसे पोहचला? How to Reach Bhatinda

तुम्ही भटिंडाला भेट देण्यासाठी फ्लाइट निवडणार असाल तर हे लक्षात घ्या की भटिंडासाठी थेट फ्लाइट कनेक्टिव्हिटी नाही. भटिंडासाठी सर्वात जवळचे विमानतळ चंदीगड येथे आहे, जे भटिंडापासून सुमारे 146 किलोमीटर अंतरावर आहे. हे विमानतळ भारतातील प्रमुख शहरांशी हवाई मार्गाने जोडलेले आहे आणि येथे दररोज विविध उड्डाणे देखील चालतात.

स्वस्तात परेशात फिरायला जायचं असेल तर 'या' देशाला भेट द्या!

भटिंडालाला रेल्वेने कसे जाल? How to Reach Bhatinda by Train

भटिंडा हे देशातील सर्वात मोठे रेल्वे जंक्शन आहे, जे राज्यातील आणि देशातील प्रमुख शहरांशी अनेक एक्सप्रेस आणि सुपर फास्ट ट्रेनने जोडलेले आहे, त्यामुळे तुम्ही देशाच्या कोणत्याही भागातून रेल्वेने भटिंडा येथे सहज पोहोचू शकता.

रोज ट्रीप How to Reach Bhatinda by Raod

भटिंडा हे राज्यातील सर्वात विकसित शहरांपैकी एक आहे, ज्यामुळे हे शहर रस्त्याने राज्यातील सर्व प्रमुख शहरांशी जोडलेले आहे, आणि त्यामुळे देशाच्या कोणत्याही भागातून भटिंडा येथे जाणे सोपे आहे.

Published by: Rahul Punde
First published: January 6, 2022, 2:52 PM IST

ताज्या बातम्या