नवी दिल्ली, 09 जून : मला मोठं झाल्यानंतर अंतराळवीर (astronauts) व्हायचंय, आकाशात झेप घेऊन अंतराळाची (space) सफर करायची आहे. आपल्यापैकी बहुतेकांनी हे स्वप्न लहानपणी पाहिलं आहे. अंतराळवीर होण्यासाठी खरंतर तसा खूप अभ्यास, मेहनत आणि समपर्णाची गरज आहे. त्यामुळे बालवयात पाहिलेलं अनेकांचं हे स्वप्न स्वप्नंच राहिलं आहे. नुकतंच स्पेस एक्सचं (space x) रॉकेट क्रू ड्रॅगन दोन अंतराळवीरांना घेऊन अंतराळात पोहोचलं. त्यानंतर आपलं हे लहानपणीचं स्वप्न पुन्हा जागं झालं आहे. आम्हालाही या अंतराळात जातं आलं असतं, तर असा विचार मनात आला. तुमचं अंतराळवीर होण्याचं स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण झालं नाही, तरी तुम्हीही अंतराळ स्थानकात जाऊ शकता. फक्त एका क्लिकवर तुम्ही आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात ( International Space Station - ISS) पोहोचू शकता. कसं त्यासाठी इथं क्लिक करा .
तुम्हाला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचवण्यासाची सोय गुगलने केली आहे. प्रत्यक्ष नाही मात्र व्हर्च्युअल तुम्ही या अंतराळ स्थानकात जाऊ शकता. गुगलन मॅप स्ट्रिच व्हूमार्फत अंतराळ स्थानकाची व्हर्च्युअल टूर शक्य आहे. तुम्ही या स्पेस स्टेशनमधील प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊ शकता. कर्सर हलवून तुम्ही 360 डिग्रीत फिरू शकता. एखाद्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याची माहितीही शेजारी मिळेल. हे वाचा -
मालकाने नदीत उडी मारून केली आत्महत्या; त्याच पुलावर मालकाची वाटत बसला कुत्रा
नासासह आणखी सहा एजन्सीने अंतराळ संशोधनासाठी आयएसएसची स्थापना केली. सध्या आयएसएस हा मानवनिर्मित सर्वात मोठा उपग्रह आहे. ताशी 17 हजार 500 किमी गतीने तो अंतराळात फिरत आहे. एकावेळी सहा जण यामध्ये आरामात राहू शकतात. संपादन - प्रिया लाड हे वाचा -
गर्दीतही ओळखणार कोरोना रुग्ण; IIT च्या माजी विद्यार्थ्यांनी तयार केलं खास उपकरण