नवी दिल्ली,31 जानेवारी: जगातील प्रमुख स्मार्टफोन (Smartphone) निर्मिती कंपन्यांमध्ये शाओमीचा (Xiaomi) समावेश होतो. भारतामध्येसुद्धा शाओमीचे लाखो युजर्स (Users) आहेत. आपल्या युजर्सना सर्व्हिस (service) आणि सपोर्ट रिक्वायरमेंट्स (support requirements) पुरवण्यासाठी शाओमीनं एक वन-स्टॉप अॅप लाँच करण्याची घोषणा केली आहे. शाओमी इंडिया कंपनी शाओमी सर्व्हिस प्लस (Xiaomi Service Plus) हे अॅप लाँच करणार आहे. या अॅपच्या मदतीनं युजर्सला, डिव्हाइस रिपेअर, डिरेक्ट चॅट सपोर्ट, प्राईज कोटेशन आणि इतर सेवा मिळणार आहेत, असं कंपनीनं सांगितलं आहे. सध्या सुरू असलेल्या कोविड-19 (COVID-19) महामारीच्या काळात लोकांना घरातच राहण्यास सांगितलं जात आहे. लॉकडाऊनमुळं अनेकदा लोकांची गैससोयदेखील झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये शाओमी युजर्ससाठी हे अॅप अत्यंत उपयुक्त ठरू शकतं. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर (Google Play) उपलब्ध असून, भविष्यात लाँच होणाऱ्या शाओमी फोनवर ते प्री-लोड (pre-load) केलं जाईल. शाओमीचे युजर नसलेल्या ग्राहकांनासुद्धा या अॅपच्या मदतीनं टीव्ही, टीडब्ल्यूएस इअरबड्स सारख्या उपकरणांची वॉरंटी तपासता येणार आहे.
Facebook चं नवं जबरदस्त feature, Screenshots घेतल्यास मिळणार alert
शाओमीनं एका प्रेस नोटमध्ये स्पष्ट केलं आहे की, शाओमी सर्व्हिस प्लस हे अॅप खास ब्रँडसाठी तयार केलं गेलं आहे. जेणेकरून युजर्सनं प्रॉडक्ट (product) खरेदी केल्यानंतरही त्यांच्याशी कंपनीची रिलेशनशीप चांगली राहिली. अॅपमध्ये युजर्ससाठी डेमो बुक (demo Book) उपलब्ध असेल. त्याचा वापर करून युजर्सना आपलं शाओमी डिव्हाइस इन्स्टॉल करता येईल. आउटरीच सर्व्हिसेसाठी (outreach services) जवळचं सर्व्हिस सेंटर शोधण्यासाठीदेखील या अॅपचा वापर केला जाऊ शकतो. या अॅपच्या मदतीनं युजर्स स्पेअर पार्टच्या किमती आणि खरेदी केलेल्या उपकरणांची वॉरंटी पाहू शकतात. हे अॅप युजर्सला त्यांच्या सर्व्हिस रिक्वेस्टचं स्टेटससुद्धा सांगू शकणार आहे.
शाओमी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (chief operating officer) मुरलीकृष्णन बी (Muralikrishnan B) यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ‘प्रत्येक कस्टमरच्या तक्रारींचं त्वरित निवारण करण्यासाठी आणि त्यांना सेवा पुरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शाओमी सर्व्हिस प्लस अॅप लाँच करण्यामागे आमचा हाच हेतू आहे. घरबसल्या सर्व्हिस मिळवण्याची वाढती गरज लक्षात घेऊन, हे अॅप तयार करण्यात आलं आहे. आता आमचा प्रत्येक कस्टमर एका क्लिकवर सर्व्हिस मिळवेल, अशी आम्हाला आशा आहे, असं मुरलीकृष्णन बी म्हणाले.
Budget expectations: बाइक किंवा स्कूटर खरेदीचा विचार आहे? स्वस्त होऊ शकतात वाहन दर
शाओमी सर्व्हिस अॅप हे शाओमीच्या ‘Getapps’ या अॅप स्टोअरवर देखील उपलब्ध असेल. युजर्स तेथून ते डाऊनलोड करू शकतात. शाओमी इंडियाच्या देशभरातील सुमारे दोन हजार सर्व्हिस सेंटरचा (service centres) सपोर्ट या अॅपच्या माध्यमातून मिळवता येऊ शकतो. हे अॅप गुगल प्लेवर उपलब्ध असणार असल्याचं कंपनीनं सांगितलं असलं तरी अद्याप त्याठिकाणी ते उपलब्ध झालेलं नाही.