जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Solar Electric Car: आता चालता चालता चार्ज होईल इलेक्ट्रिक कार, जगातील पहिली सोलर EV लाँच

Solar Electric Car: आता चालता चालता चार्ज होईल इलेक्ट्रिक कार, जगातील पहिली सोलर EV लाँच

आता चालता चालता चार्ज होईल इलेक्ट्रिक कार, जगातील पहिली सोलर EV लाँच

आता चालता चालता चार्ज होईल इलेक्ट्रिक कार, जगातील पहिली सोलर EV लाँच

Solar Electric Car: जगातील पहिली सोलर-इलेक्ट्रिक कारचं लाँच झाली आहे, अनेक महिने चार्ज न करता चालणार आहे. ही कार एकदा चार्ज केल्यावर 700 किमीची रेंज देते. आजा आम्ही तुम्‍हाला कारच्‍या किंमतीपासून फिचर्सपर्यंतची संपूर्ण माहिती देत आहोत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 18 ऑक्टोबर: अलीकडच्या काळात भारतासह जगभरात इलेक्ट्रिक कारच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळं भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. परंतु तरीही इलेक्ट्रिक कारच्या रेंजच्या बाबतीत अजूनही लोकांच्या मनात शंका आहेत. नियमित आणि जास्त अंतरावर प्रवास करणारे अनेक लोक इच्छा असतानाही इलेक्ट्रिक कार खरेदी करत नाहीत. एकीकडे जगात इलेक्ट्रिक कारची क्रेझ वाढत असताना हे वास्तवही आहे. त्यामुळं जगातील अनेक कंपन्या इलेक्ट्रिक कारशी संबंधित नवनवीन तंत्रज्ञान शोधून काढण्यात गुंतल्या आहेत. त्याचबरोबर काही कंपन्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या कारवरही काम करत असून या क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत. मात्र सौरऊर्जेवर चालणारी वाहनं अद्याप विक्रीसाठी उपलब्ध नसून ती बाजारात पोहोचण्यास वेळ लागणार आहे. आता नेदरलँडमधील एका कंपनीनं सोलर कार सादर केली आहे. ही जगातील पहिली सोलर कार आहे जिला LightYear 0 असं नाव देण्यात आलं आहे. विशेष बाब म्हणजे ही कार सोलर इलेक्ट्रिक पॉवरट्रेननं सुसज्ज आहे, जी एका चार्जवर सुमारे 700 किमीची रेंज देण्यास सक्षम आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला कारच्‍या किंमतीपासून ते आतापर्यंत समोर आलेल्‍या फिचर्सपर्यंतची संपूर्ण माहिती देणार ​​आहोत. हेही वाचा:  स्पोर्ट्स बाईक प्रेमींसाठी खुशखबर, दिवाळीआधी नवीन सुपरबाईकचा ‘धुमधडाका’, पाहा किंमत आणि फीचर्स कंपनीनं सध्या हे वाहन UAE मध्ये सादर केलं आहे. कंपनीनं आपल्या वेबसाइटवर या कारची किंमत 250,000 युरो म्हणजेच जवळपास 2 कोटी रुपये ठेवली आहे. UAE मधील इच्छुक खरेदीदार कंपनीच्या वेबसाइटवरून ही कार बुक करू शकतात. इतर ग्राहकांसाठी ही कार पुढील वर्षी विक्रीसाठी उपलब्ध होईल.

News18लोकमत
News18लोकमत

 160 किमी ताशी टॉप स्पीड- रिपोर्ट्सनुसार ही कार Tesla Model S पेक्षा दुप्पट कार्यक्षम आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे Lightyear 0 कार उन्हाळ्याच्या हंगामात अनेक महिने चार्ज न करता वापरली जाऊ शकते. तिचं टॉप स्पीड 160 किमी प्रतितास आहे आणि ही सोलर इलेक्ट्रिक कार केवळ 10 सेकंदात शून्य ते 100 किमी प्रतितास वेग घेण्यास सक्षम आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात