ऑल न्यू पॅनिगेल बाइकला नवीन 17-लीटर ब्रश्ड अॅल्युमिनियम इंधन टाकी, फ्लॅटर सीट आणि नवीन अपहोल्स्ट्री दिली गेली आहे. ज्यामुळे तिचा लुक आणखी उत्तम झाला आहेच, शिवाय तीऑ रायडिंगसाठीही चांगली बनली आहे. ही सुपरबाईक लवकरच भारतात लॉन्च केली जाऊ शकते. (फोटो क्रेडिट्स: Ducati)
या बाइकमध्ये नवीन 998 cc Desmosedici Stradale R इंजिन वापरण्यात आलं आहे. ही सुपरबाईक 6 स्पीड गिअरबॉक्सनं सुसज्ज आहे. हे इंजिन 16,500 rpm वर 218 hp ची पॉवर जनरेट करू शकते. मात्र मागील मॉडेलच्या तुलनेत त्याची कार्यक्षमता थोडी कमी झाली आहे. (फोटो क्रेडिट्स: Ducati)
डुकाटीला इंजिनसाठी विशेष ऑईल वापरावं लागले. ते शेलद्वारे डुकाटी कोर्सच्या सहकार्यानं विकसित केलं आहे. नवीन परफॉर्मन्स ऑयल मेकॅनिकल फ्रिक्शनात 10% घट आणि 3.5 hp च्या कमाल शक्तीमध्ये आणखी वाढ करण्याची हमी देतं. रेसिंग एक्झॉस्ट आणि नवीन ऑईलमुळं बाईकची शक्ती 240.5 hp पर्यंत पोहोचू शकते. (फोटो क्रेडिट्स: Ducati)
या बाईकमध्ये फुल, हाय, मिडीयम आणि लो मोड असे चार राइडिंग मोड उपलब्ध आहेत. लो मोडमध्ये पॉवर 160 hp पर्यंत मर्यादित आहे, कारण खराब रस्त्यावर मोटरसायकल चालवणं अधिक आरामदायी वाटावं. फुल आणि लो राइडिंग मोड नवीन आहेत तर हाय आणि मिडियम कॉन्फिगरेशन सुधारित केलं आहे. नवीन इंजिन ब्रेक कंट्रोल सॉफ्टवेअर आणि नवीन क्विक-शिफ्टर सिस्टम आहे. (फोटो क्रेडिट्स: Ducati)
नवीन बाईकच्या सस्पेंशन सेटअपमध्येही बदल करण्यात आले आहेत. आता फ्रंटला Ohlins NPX25/30 प्रेशराइज्ड फोर्क्स आणि पाठीमागच्या बाजूला Ohlins TTX36 शॉक ऑब्जर्स देण्यात आले आहेत. लॉन्चनंतर तिची किंमत 53 लाख रुपये असू शकते. (फोटो क्रेडिट्स: Ducati)