मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /World Photography Day 2021: 20 हजारहून कमी किमतीत जबरदस्त कॅमेरा असणारे स्मार्टफोन

World Photography Day 2021: 20 हजारहून कमी किमतीत जबरदस्त कॅमेरा असणारे स्मार्टफोन

फोनसाठी अनेक पर्याय असल्याने खरेदी करताना गोंधळून जायला होतं. म्हणूनच निवड करायला सोपं जाण्याच्या उद्देशाने, उत्तम कॅमेरा क्वालिटी (Best Camera Quality) असलेल्या वीस हजार रुपयांच्या आत किंमत असलेल्या काही स्मार्टफोनबाबत जाणून घ्या.

फोनसाठी अनेक पर्याय असल्याने खरेदी करताना गोंधळून जायला होतं. म्हणूनच निवड करायला सोपं जाण्याच्या उद्देशाने, उत्तम कॅमेरा क्वालिटी (Best Camera Quality) असलेल्या वीस हजार रुपयांच्या आत किंमत असलेल्या काही स्मार्टफोनबाबत जाणून घ्या.

फोनसाठी अनेक पर्याय असल्याने खरेदी करताना गोंधळून जायला होतं. म्हणूनच निवड करायला सोपं जाण्याच्या उद्देशाने, उत्तम कॅमेरा क्वालिटी (Best Camera Quality) असलेल्या वीस हजार रुपयांच्या आत किंमत असलेल्या काही स्मार्टफोनबाबत जाणून घ्या.

पुढे वाचा ...

    नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : आज जागतिक छायाचित्रण दिन अर्थात वर्ल्ड फोटोग्राफी डे (World Photography Day) आहे. सध्याच्या काळात उत्तम कॅमेरा क्वालिटीसाठी स्मार्टफोन महागडाच असण्याची गरज भासत नाही. जवळपास 20 हजार रुपयांच्या आसपास किंवा त्यापेक्षा कमी किंमत असलेल्या स्मार्टफोन्समध्ये चांगल्या स्पेसिफिकेशन्ससोबत चांगल्या दर्जाचा कॅमेराही असतो. त्याच्या मदतीने युजर्सला 4K व्हिडीओही शूट करता येतात. तसंच, अत्यंत उत्तम क्वालिटीचे फोटोही काढता येतात. नाइट मोडमध्येही चांगले फोटो काढणं या फोनने शक्य होतं. असं असलं तरी उपलब्ध असलेल्या अँड्रॉइड फोन्समधून (Android Phone) उत्तम कॅमेरा फोन (Best Camera Phone) निवडणं ही तितकीशी सोपी गोष्ट नाही. अनेक पर्याय असल्याने खरेदी करताना गोंधळून जायला होतं. म्हणूनच निवड करायला सोपं जाण्याच्या उद्देशाने, उत्तम कॅमेरा क्वालिटी (Best Camera Quality) असलेल्या वीस हजार रुपयांच्या आत किंमत असलेल्या काही स्मार्टफोनबाबत जाणून घ्या.

    शाओमी रेडमी नोट 10 प्रो मॅक्स (Xiaomi Redmi Note 10 Pro Max) -

    हा स्मार्टफोन 20 हजार रुपयांपर्यंतच्या रेंजमधला सर्वोत्तम कॅमेरा फोन आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा 108 मेगापिक्सलचा आहे. फोनचा कॅमेरा किती उत्तम दर्जाचा आहे, हे आकड्यावर ठरत नसतं. तरीही एकंदरीत कलर अॅक्युरसी, टोनल अॅक्युरसी, फोटोचे डिटेल्स, पोर्ट्रेट मोडची फ्लेक्झिबिलिटी, नाइट मोड डिटेल्स या सगळ्या बाबी पाहता हा फोन उत्तम आहे. या फोनला सुपर निफ्टी 5 मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा असून, त्याला 2x मॅग्निफिकेशनही आहे. 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेराही उत्तम काम करतो. या फोनचा 2 मेगा पिक्सलचा तिसरा कॅमेरा म्हणजेच डेप्थ सेन्सरदेखील चांगलं काम करतो.

    पोको एक्स थ्री प्रो (Poco X3 Pro) -

    हादेखील 20 हजार रुपयांच्या आतल्या फोन्समधला चांगला कॅमेरा फोन आहे. या फोनच्या मागच्या बाजूला 48 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा, 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगा पिक्सेलचा डेप्थ कॅमेरा असा चार कॅमेरा सेटअप आहे. पोर्ट्रेट मोडदेखील चांगला आहे. फोटो काढल्यानंतर त्यात काही भाग ब्लर असेल, तर त्याचं रिटचिंग करण्याची सोयही फोनमध्ये आहे. त्यामुळे फोटो काढून झाल्यानंतरही तुम्हाला त्यात हव्या तशा सुधारणा करणं शक्य होतं. एकंदरीत पाहता Poco X3 Pro हा चांगला कॅमेरा फोन आहे. मात्र डायनॅमिक रेंज, शॅडोजमधलं डिटेलिंग, फायनर आस्पेक्ट्स आदींचा विचार करता हा उत्तम फोन ठरत नाही.

    तुम्हाला माहित आहे का RAM आणि ROM मधील फरक? जाणून घ्या सविस्तर

    रिअलमी नार्झो 30 प्रो (Realme Narzo 30 Pro) -

    या फोनला चांगला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. 48 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा, 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा असे तीन कॅमेरे या फोनला आहेत. या फोनमधून दिवसाच्या प्रकाशात किंवा कोणत्याही प्रकाशात चांगल्या दर्जाचे फोटो काढता येतात. सर्व रंगांचं बॅलन्सिंग चांगल्या प्रकारे केलं जातं. तुम्हाला सॅच्युरेटेड कलर लेव्हल अधिक असलेली आवडत असेल, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स मोडद्वारे ते करता येतं. चांगल्या दर्जाचे पोर्ट्रेट शॉट्सही या कॅमेऱ्यामधून घेता येतात. कोणत्याही सर्वसाधारण फोन कॅमेरापेक्षा या फोनचा कॅमेरा चांगला आहे. मात्र कमी प्रकाशातल्या शूटिंगचा दर्जा तितकासा चांगला नाही. पण तशी गरज फारशी पडणार नसेल तर हा फोन चांगला आहे.

    Internet म्हणजे आहे तरी काय? जाणून घ्या हे नेमकं कसं काम करतं

    आयक्यू झेड थ्री (iQoo Z3) -

    हा 20 हजार रुपयांपर्यंतच्या रेंजमधल्या चांगल्या फोन्सपैकी एक आहे. 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड आणि 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा असे तीन कॅमेरे या फोनला आहेत. चांगल्या प्रकाशात फोटोग्राफी करताना फोटोची कलर अॅक्युरसी, सॅच्युरेशन लेव्हल्स, जनरल डिटेल्स यांबाबतीत हा फोन सर्वसाधारण कॅमेरा फोनपेक्षा उत्तम आहे. त्यासाठी या फोनमध्ये उत्तम प्रोसेसर देण्यात आला आहे. त्यामुळे 20 हजार रुपयांच्या आतल्या फोन्सपैकी हा चांगला कॅमेरा फोन आहे.

    First published:

    Tags: Photography, Tech news