मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /मेटाव्हर्सचा व्हर्च्युअल रिॲलिटी प्लॅटफॉर्मच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह, महिला बीटा टेस्टरचा झाला छळ

मेटाव्हर्सचा व्हर्च्युअल रिॲलिटी प्लॅटफॉर्मच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह, महिला बीटा टेस्टरचा झाला छळ

woman complains that meta

woman complains that meta

फेसबुकच्या व्हर्च्युअल रिॲलिटी प्लॅटफॉर्मवर (Virtual reality platform) आपला छळ झाल्याचा आरोप एका महिला बीटा टेस्टरनं (Female beta tester) केला आहे.

  नवी दिल्ली, 21 डिसेंबर: महिलांशी गैरवर्तन होत असल्याच्या घटना सतत आपल्या कानावर पडत असतात. सार्वजनिक ठिकाणी, कार्यालयांपासून तर अगदी स्वत:च्या घरातदेखील महिला सुरक्षित नसल्याचं वेळोवेळी सिद्ध झालं आहे. इतकचं काय तर, अश्लील भाषा किंवा मीडिया फाईल्स वापरून ऑनलाईन पद्धतीनंसुद्धा महिलांचा छळ (Harassment) केला जातो. त्यामध्ये आता मेटाव्हर्सचाही (Metaverse) समावेश होण्याची शक्यता आहे. मेटानं (Meta) काही दिवसांपूर्वी 'होरायझन वर्ल्ड' (Horizon World) प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. फेसबुकच्या या व्हर्च्युअल रिॲलिटी प्लॅटफॉर्मवर (Virtual reality platform) आपला छळ झाल्याचा आरोप एका महिला बीटा टेस्टरनं (Female beta tester) केला आहे. आपला छळ होत असताना इतर लोकांनी त्याला पाठिंबा दिल्याचंही या महिला बीटा टेस्टरनं म्हटलं आहे. आज तकनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

  मेटाव्हर्स (Metaverse) ही एक अशी संकल्पना आहे, जिला इंटरनेटचं भविष्य मानलं जात आहे. त्यामुळे सध्या जगातील मोठ्या टेक कंपन्या मेटाव्हर्समध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करत आहेत. मेटाव्हर्स भविष्यात महत्त्वाचं ठरण्याची शक्यता पाहून फेसबुकचा मालक मार्क झुकरबर्गनं (Mark Zuckerberg) नुकतंच आपल्या कंपनीचं नाव बदलून 'मेटा' केलं आहे. त्यानंतर 9 डिसेंबर 2021 रोजी मेटानं 'होरायझन वर्ल्ड' पब्लिकसाठी लॉन्च केलं आहे. त्या अगोदर त्याचं बीटा टेस्टिंग सुरू होतं. या टेस्टिंगमध्ये पीडित महिलादेखील होती. 26 नोव्हेंबरला या महिलेशी एका व्यक्तीनं व्हर्च्युअली वाईट वर्तणूक केली. 1 डिसेंबरला या महिलेनं फेसबूक पोस्ट करून या घटनेबाबत माहिती जाहीर केली. एका महिला टेस्टरनं ‘व्हर्च्युअल हॅरॅसमेंट’चा आरोप केल्यानं मेटाचा हा व्हर्च्युअल रिअॅलिटी प्लॅटफॉर्म संकटात आला आहे. इंटरनेटवर लैंगिक छळ होणं ही गोष्ट काही नवीन नाही. अनेक महिलांना त्याचा सामना करावा लागतो. मात्र, जेव्हा हीच घटना व्हर्च्युअल रिअॅलिटीमध्ये घडते, तेव्हा ती अतिशय भयानक वाटते, अशी प्रतिक्रिया पीडित बीटा टेस्टरनं 'द व्हर्ज'ला दिली आहे.

  आपली हॅरॅसमेंट झाल्याची तक्रार या महिला बीटा टेस्टरनं केल्यानंतर मेटानं या प्रकरणाची अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. 'ही अतिशय लज्जास्पद बाब आहे. महिला बीटा टेस्टरनं तक्रार करून खरा तो फीडबॅक दिला, ही गोष्ट आमच्यासाठी चांगली ठरणार आहे. यामुळे आता आम्ही सेफ झोन ब्लॉकिंग टूल तयार करण्याचा विचार करत आहोत,' अशी माहिती मेटा होरायझनचे व्हाईस प्रेसिडेंट विवेक शर्मा (Vivek Sharma) यांनी द व्हर्जला दिली आहे.

  होरायझन वर्ल्ड हा फेसबुकचा व्हर्च्युअल रिॲलिटी प्लॅटफॉर्म आहे. फेसबुकच्या मते हा प्लॅटफॉर्म मेटाव्हर्समध्ये प्रवेश करण्याची पहिली स्टेप आहे. सध्या यूएस आणि कॅनडामध्ये तो लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. वयाची 18 वर्षे पूर्ण केलेले लोक त्या ठिकाणी जाऊ शकतात. या प्लॅटफॉर्मच्या मदतीनं युजर्स आपलं व्हर्च्युअल रूप तयार करून एकमेकांसोबत वावरू शकतात आणि गेमिंगदेखील (Gaming) करू शकतात. सध्या तर मेटाव्हर्समध्ये कॉन्सर्ट्सदेखील होत आहेत. मेटाच्या व्हर्च्युअल स्पेसमध्ये आपण एकमेकांना भेटून शेकहँड सारख्या क्रिया करू शकतो. त्यामुळे या ठिकाणी हॅरॅसमेंट होण्याच्या गोष्टीमध्ये तथ्य आहे.

  First published:
  top videos

   Tags: Facebook