मोबाईल फोन सर्वांच्याच आयुष्यात महत्त्वाचा भाग झाला आहे. परंतु अनेकदा सतत येणाऱ्या कॉलमुळे फोन त्रासदायकही वाटतो.
अनेकदा मीटिंगमध्ये असतानाही फोन उचलणं शक्य होत नाही. कोणाचाही कॉल उचलायचा नसेल, तर युजर्स मोबाईलमध्ये Call Forwarding (कॉल फॉर्वडिंग) पर्याय निवडू शकतात.
एकदा फोन फॉरवर्ड केल्यानंतर असा नंबर निवडा जो सेवेत नाही. यामुळे सर्व नको असलेले कॉल्स फॉरवर्ड होऊन त्या नंबरवर पोहचतील, जो सेवेत नाही. अशाप्रकारे नको असलेल्या कॉल्सपासून सुटका करू शकता.