मुंबई, 5 सप्टेंबर : मोबाईल, लॅपटॉप यांसारख्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचं चार्जिंग (Charging electronic gadgets) करणं ही एक डोकेदुखीच असते. कितीही चांगल्या क्षमतेचा मोबाईल घेतला, तरी त्याला कधी ना कधी चार्जिंग करावंच लागतं. नेमकं कामाच्या वेळी चार्जिंग संपल्याचा अनुभव तर आपल्या सर्वांनाच आला असेल. चार्जिंग करताना तो मोबाईल किंवा गॅजेट एका ठिकाणी ठेऊन द्यावं लागतं. त्यासाठी चार्जिंगच्या केबल्स (Charging without cables) सांभाळणे हा आणखी एक त्रास. अगदी वायरलेस चार्जिंगचा (Wireless charging) स्मार्टफोन तुमच्याकडे असला, तरी त्याचा बेस कुठे ना कुठे कनेक्ट करुन ठेवावाच लागतो. पण जर तुमचा फोन थेट हवेतूनच (Charge gadgets from air) चार्ज झाला तर? विचार करा, कसलाही ॲडप्टर नाही, चार्जिंग केबल नाही, प्लग, यूएसबी काहीच नाही; आणि तरीही तुमचं गॅजेट (Charge your gadgets without plug) चार्ज होतंय. अगदी तुमच्या बेडवर असलेला मोबाईल आपोआप चार्ज होतोय, किंवा मग टेबलवर ठेवलेल्या लॅपटॉपचंही असंच चार्जिंग होत आहे. खरं नाही वाटत ना? ऐकताना जरी ही भुताटकी किंवा अजब गोष्ट वाटत असली, तरी ही जपानच्या संशोधकांची कमाल आहे. एका वेबसाईटवर (news.umich.edu) प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, जपानच्या संशोधकांनी एक चार्जिंग रुम (Japan scientists make Charging room) तयार केली आहे. या रुममध्ये हवेतूनच सर्व गॅजेट चार्ज होतात, तेही कोणत्याही केबल वा प्लगशिवाय! टोकियो युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी ही 10 बाय 10 फूटांची रूम (Charging room) तयार केली आहे. ही रूम 50 वॅटपर्यंतची ऊर्जा देते. याची चाचणीही पूर्ण झाल्याचं सांगितलं जात आहे. याच्या चाचणीसाठी ॲल्युमिनियम टेस्ट रूम (Japan Charging room) तयार करण्यात आली होती. पॉवर लॅम्प, मोबाईल फोन अशा इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सना रुममध्ये विविध ठिकाणी (Charge gadget wireless) ठेऊन चार्ज करण्यात आलं. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही एक अत्यंत नवीन टेक्नॉलॉजी आहे. यामध्ये इलेक्ट्रिक फील्डशिवाय मॅग्नेटिक फील्ड (Magnetic field) तयार केलं जाऊ शकतं. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, इलेक्ट्रिक फील्डमध्ये (Dangers of electric field) आपल्याला विजेचा झटका लागण्याचा जो धोका असतो, तो टाळला जातो. म्हणजेच, या रुममध्ये असलेल्या मॅग्नेटिक फील्डमधून जात असलेला करंट आपल्याला वा अन्य प्राण्यांना इजा पोहोचवू शकत नाही. सध्या सगळे वापरत असलेल्या वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजीमध्ये मॅग्नेट आणि कॉईल्सचा (Coils in wireless chargers) वापर केला जातो. या मोबाईल्समध्ये असलेल्या कॉईल्समुळे हृदयविकाराच्या रुग्णांच्या हृदयात लावण्यात आलेला पेसमेकर (Pacemaker) बंद होऊ शकतो. यामुळे या रुग्णांचा मृत्यूही होण्याची भीती असते. जपानच्या संशोधकांनी तयार केलेल्या या चार्जिंग रुममध्ये मात्र असं होण्याची भीती नसल्याचं मत संशोधक अलेन्सन सॅम्पल यांनी व्यक्त केलं आहे. चार्जिंग रुममध्ये लो फ्रीक्वेन्सी असलेलं मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे, ज्याचा आपल्याला धोका नाही. आता ही चार्जिंग रूम सामान्यांच्या वापरासाठी (Japan Charging room) कधी उपलब्ध होईल याचा अंदाज मात्र आपल्याला नसल्याचे या संशोधकांनी म्हटलं आहे. अशी रूम तयार करण्यासाठी किती खर्च येईल याचाही अंदाज त्यांना नाही. ही टेक्नॉलॉजी एकदम सुरूवातीच्या टप्प्यात आहे यामध्ये पुढे आणखी बरेच बदल होणार असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केलं आहे. जशा इतर टेक्नॉलॉजी कालांतराने सामान्य माणसाला परवडतील इतक्या स्वस्त झाल्या तशीच ही होईल अशी आशा आपण आता करायला काहीच हरकत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.