मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /विकणार आहात तुमचा Smartphone?,मग करा आधी 'हे' काम; नाहीतर मोजावी लागेल मोठी किंमत

विकणार आहात तुमचा Smartphone?,मग करा आधी 'हे' काम; नाहीतर मोजावी लागेल मोठी किंमत

फोन सतत हँग होत असल्याने अनेक युझर्स फोन Factory Reset करणं हा सर्वांत योग्य पर्याय समजतात. काही जण फोन एक्स्चेंजमध्ये देण्यापूर्वी फॅक्टरी रिसेट हा पर्याय निवडतात.

नवी दिल्ली, 30 एप्रिल: फोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. अलीकडे स्मार्टफोन (Smartphone) वापरण्याचं प्रमाणदेखील वाढलं आहे. स्मार्टफोनच्या सतत वापराने फोन हँग होणं ही नॉर्मल गोष्ट आहे. फोन सतत हँग होत असल्याने अनेक युझर्स फोन Factory Reset करणं हा सर्वांत योग्य पर्याय समजतात. काही जण फोन एक्स्चेंजमध्ये देण्यापूर्वी फॅक्टरी रिसेट हा पर्याय निवडतात. परंतु फॅक्टरी रिसेटमध्ये फोनचा सर्व डेटा डिलीट होतो, त्यामुळे युजर्सनी फोन फॅक्टरी रिसेट करण्यापूर्वी काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अन्यथा फोनमधील सर्व डेटा डिलीट होण्याची भीती असते.

तुम्ही तुमचा फोन फॅक्टरी रिसेट केल्यास तुमच्या फोनवरचा सर्व डेटा आणि अ‍ॅप्स डिलीट (Data and Apps) होतील आणि तुमचा फोन अगदी नवीन होईल. त्यामुळे हे करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या फोनचा महत्त्वाचा डेटा आणि फाइल्सचा बॅकअप घ्यावा. अँड्रॉइड स्मार्टफोन फॅक्टरी रिसेट कसा करायचा, त्याची माहिती घेऊ या. 'झी न्यूज'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

Factory Reset म्हणजे काय?

फॅक्टरी रिसेट म्हणजे, तुमचा फोन फॅक्टरीमधून तुमच्यापर्यंत येताना होता तसाच होतो. या रिसेट पद्धतीत तुमच्या फोनचा संपूर्ण डेटा फोटो, अ‍ॅप्स, पासवर्ड्स आणि इतर डेटा डिलीट होतो.

रिसेट करण्यापूर्वी डेटा कसा घ्याल?

फोन फॅक्टरी रिसेट कराल, त्याआधी फोनमधल्या महत्त्वाच्या डेटाचा बॅकअप घेणं गरजेचं आहे. स्मार्टफोनमधून आपल्या डेटाचा बॅकअप घेण्यासाठी मेमरी कार्ड, क्लाउड सर्व्हिस किंवा फोन लॅपटॉपशी (Laptop) कनेक्ट करून तुमच्या महत्त्वाच्या डेटाचा बॅकअप घेऊ शकता.

फॅक्टरी रिसेट करताना काय काळजी घ्यावी?

फोन रिसेट करण्यापूर्वी तुमचा स्मार्टफोन पूर्ण चार्ज झाला आहे, याची खात्री करून घ्या आणि रिसेट करताना फोन चार्जिंगला लावून ठेवा. आता तुमच्या स्मार्टफोनवरची सेटिंग्ज उघडा आणि त्यात 'सिस्टीम' ऑप्शन सिलेक्ट करा. त्यातला 'रिसेट' ऑप्शन निवडा आणि नंतर 'इरेज ऑल डेटा' (फॅक्टरी रिसेट) या पर्यायावर क्लिक करा. तुमचा पासवर्ड मागितल्यास तो टाका आणि त्यानंतर तो फोन आपोआप फॅक्टरी रिसेट होईल.

रिकव्हरी मोडसह फोन फॅक्टरी रिसेट कसा करायचा?

तुम्हाला तुमचा स्मार्टफोन रिकव्हरी मोड (Recovery Mode) वापरून फॅक्टरी रिसेट करायचा असेल, तर तेही करता येईल. यासाठी सर्वांत आधी तुमचा स्मार्टफोन स्विच ऑफ करा आणि नंतर स्क्रीन स्टार्ट होईपर्यंत पॉवर आणि व्हॉल्यूम बटणं एकदम दाबत राहा. तुम्हाला तुमच्या डोळ्यांसमोर स्टार्ट शब्द असलेला स्क्रीन दिसेल. त्यावर पॉवर, व्हॉल्यूम आणि नेव्हिगेशन इन्स्ट्रक्शन दाखवल्या जात असतील. त्या वेळी तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी पॉवर बटण वापरावं लागेल आणि नेव्हिगेट करण्यासाठी व्हॉल्यूम बटण वापरावं लागेल.

शिवसेना vs मनसे: राज ठाकरेंच्या सभेपूर्वी औरंगाबादमध्ये पोस्टर War

आता तुमच्या स्क्रीनवर जेव्हापर्यंत 'रिकव्हरी मोड' ऑप्शन दिसत नाही, तोपर्यंत व्हॉल्यूम डाउन बटण दाबत राहा. पॉवर बटणच्या मदतीने तुम्ही रिकव्हरी मोड निवडताच, तुमचा स्मार्टफोन आपोआप रिस्टार्ट होईल. त्यानंतर पॉवर बटण आणि व्हॉल्यूम अप बटण एकत्र दाबा. नंतर व्हॉल्यूम बटण वापरून 'वाइप डेटा' किंवा 'फॅक्टरी रिसेट' पर्याय निवडा आणि कन्फर्म करा. अशा प्रकारे तुमचा फोन फॅक्टरी रिसेट होईल. त्यानंतर तुम्ही फोनची सिस्टम रीबूट करू शकता.

Factory Reset केल्याने तुमच्या फोनच्या इंटर्नल स्टोरेजवर निगेटिव्ह परिणाम होतो. त्यामुळे जेव्हा अगदीच गरजेचं असेल, त्याच वेळी फॅक्टरी रिसेट करा. अन्यथा फोन हँग झाल्यास, बॅकग्राउंडमध्ये रन होणारी, वापरात नसलेली अ‍ॅप्स डिलीट करू शकता.

First published:

Tags: Mobile, Smartphone