मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /तुमच्या फोनमध्ये 5G सिग्नल कधी येईल? तुम्हाला नवीन सिम कार्ड घ्यावं लागेल का? वाचा तुमच्या प्रश्नांची उत्तरं

तुमच्या फोनमध्ये 5G सिग्नल कधी येईल? तुम्हाला नवीन सिम कार्ड घ्यावं लागेल का? वाचा तुमच्या प्रश्नांची उत्तरं

5G Sim Card: तुमच्या फोनला 5G नेटवर्क मिळत आहे का? त्याचे सिग्नल काही लोकांच्या फोनवर येऊ लागले आहेत. तुम्हाला कधीपर्यंत सेवा मिळेल? ही गोष्ट तुम्ही कुठे राहता आणि कोणत्या टेलिकॉम ऑपरेटरची सेवा वापरता यावर अवलंबून असते.

5G Sim Card: तुमच्या फोनला 5G नेटवर्क मिळत आहे का? त्याचे सिग्नल काही लोकांच्या फोनवर येऊ लागले आहेत. तुम्हाला कधीपर्यंत सेवा मिळेल? ही गोष्ट तुम्ही कुठे राहता आणि कोणत्या टेलिकॉम ऑपरेटरची सेवा वापरता यावर अवलंबून असते.

5G Sim Card: तुमच्या फोनला 5G नेटवर्क मिळत आहे का? त्याचे सिग्नल काही लोकांच्या फोनवर येऊ लागले आहेत. तुम्हाला कधीपर्यंत सेवा मिळेल? ही गोष्ट तुम्ही कुठे राहता आणि कोणत्या टेलिकॉम ऑपरेटरची सेवा वापरता यावर अवलंबून असते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 4 ऑक्टोबर: भारतात अधिकृतपणे 5G नेटवर्क लाँच करण्यात आलं आहे. जरी सर्व टेलिकॉम ऑपरेटर अद्याप 5G सेवा देत नसले तरी लोकांच्या फोनमध्ये 5G सिग्नल येत आहेत. असेही अनेक वापरकर्ते आहेत जे त्यांच्या स्मार्टफोनमध्ये 5G सिग्नल येण्याची वाट पाहत असतील. तुमच्या फोनमध्ये 5G सिग्नल कधीपर्यंत येईल, हे अनेक पैलूंवर अवलंबून आहे.

जसे की तुम्ही कोणत्या ऑपरेटरची सेवा वापरता आणि तुम्ही कुठे राहता. सुरुवातीला हे दोन मुद्दे सर्वात महत्त्वाचे आहेत. अनेक यूजर्सच्या फोनमध्ये 5G सिग्नल यायला सुरुवात झाली आहे. त्याच वेळी काही वापरकर्त्यांच्या मनात हे देखील आले असेल की त्यांना यासाठी नवीन 5G सिम कार्ड खरेदी करावे लागेल का? अशाच काही प्रश्नांची उत्तरे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

तुम्हाला 5G सिग्नल कधीपर्यंत मिळेल?

सर्वप्रथम तुम्हाला 5G सिग्नल कधीपर्यंत मिळेल याबद्दल बोलूया. तुम्ही दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे राहत असाल तर तुम्हाला सध्याही 5G सिग्नल मिळेल. तथापि या बाबतीत वेगवेगळ्या ऑपरेटर्सच्या वेगवेगळ्या योजना आहेत. 1 ऑक्टोबर रोजी 5G लाँच होताच, एअरटेल वापरकर्त्यांना 8 शहरांमध्ये 5G सिग्नल मिळू लागले आहेत.

 एअरटेल यूजर्सला मिळू लागले सिग्नल-

एअरटेल 5G सिग्नल वाराणसी, दिल्ली, मुंबई, कोलकाता, सिलीगुडी, बेंगळुरू, चेन्नई आणि हैदराबादमध्ये येत आहे. यामध्ये तुम्हाला सध्या संपूर्ण शहरात सिग्नल मिळणार नाही.

कंपनी हळूहळू ही सेवा सुरू करेल. टेलिकॉम ऑपरेटरने अद्याप त्यांच्या योजनांचा तपशील शेअर केलेला नाही. त्याच वेळी, एअरटेलने मार्च 2024 पर्यंत देशभरात 5G सेवा रोलआउटबद्दल सांगितले आहे.

हेही वाचा: Business Idea: कमी खर्चात सुरू करा ‘हा’ व्यवसाय, सणासुदीत होईल बंपर कमाई

 Jio वापरकर्त्यांना सेवा कधीपर्यंत मिळेल?

देशातील सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर Jio बद्दल बोलायचं झालं तर, कंपनी दिवाळीपर्यंत आपली सेवा लाइव्ह करू शकते. म्हणजेच ऑक्टोबरच्या अखेरीस अनेक शहरांतील Jio वापरकर्त्यांच्या फोनमध्ये 5G सिग्नल येणं सुरू होईल. RIL चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी IMC 2022 मध्ये सांगितले की, पुढील वर्षाच्या अखेरीस म्हणजे डिसेंबर 2023 पर्यंत, Jio 5G सेवा देशभरात आणली जाईल.

यापूर्वी जिओनं माहिती दिली होती की दिवाळीपर्यंत ही सेवा दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये सुरू केली जाईल. कंपनीने अद्याप रिचार्ज प्लॅनची ​​माहिती दिलेली नाही. तथापि मुकेश अंबानी यांनी IMC 2022 मध्ये Jio ची सेवा परवडणारी असेल असे सांगितले होते.

Vi वापरकर्त्यांना प्रतीक्षा करावी लागेल-

Vodafone Idea ने देखील 5G ​​रोलआउटच्या तयारीवर काम सुरू केलं आहे. मात्र कंपनीने लॉन्च डेटबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. यापूर्वी Vi नं सांगितलं होतं की ते त्यांच्या 5G सेवा युजकेसनुसार लाइव्ह करतील. त्याचवेळी ताज्या अहवालानुसार कंपनी पुढील काही वर्षांत आपली सेवा सुरु करेल.

 तुम्हाला नवीन सिम कार्ड खरेदी करावे लागेल का?

सध्या तरी तसं नाही. एअरटेल वापरकर्त्यांना सध्याच्या सिम कार्डवर 5G सिग्नल मिळत आहेत. कंपनीनं आधीच माहिती दिली होती की यूजर्सना नवीन सिम कार्डची गरज भासणार नाही, पण 5G स्मार्टफोन असायला हवा. जिओ वापरकर्त्यांबाबतही असेच घडू शकते.

तथापि जिओनं आपल्या 5G सेवेला Jio True 5G असं नाव दिलं आहे. कंपनी स्टँड अलोन (SA) 5G नेटवर्क तयार करत आहे. यामध्ये यूजर्सना चांगला स्पीड आणि कनेक्टिव्हिटी मिळेल. जिओनं सध्या सिमकार्डबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

First published:
top videos

    Tags: 5G, Airtel, Reliance