मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

आता Whatsapp वर मेसेज करणं आणखी मजेशीर, कंपनीकडून नवीन App लाँच

आता Whatsapp वर मेसेज करणं आणखी मजेशीर, कंपनीकडून नवीन App लाँच

आता Whatsapp वर मेसेज करणं आणखी मजेशीर, कंपनीकडून नवीन App लाँच

आता Whatsapp वर मेसेज करणं आणखी मजेशीर, कंपनीकडून नवीन App लाँच

Whatsapp Windows Native App: व्हॉट्सअ‍ॅपकडे विंडोजसाठी अगदी नवीन स्टँडअलोन अ‍ॅप आहे. याचा अर्थ असा की व्हॉट्सअ‍ॅप डेस्कटॉप युजर्सना संदेश पाठवण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी आणि सिंक करण्यासाठी स्मार्टफोनला लिंक करण्याची आवश्यकता लागणार नाही.

पुढे वाचा ...
    मुंबई, 18 ऑगस्ट: व्हॉट्सअ‍ॅपकडे विंडोजसाठी अगदी नवीन स्टँडअलोन अ‍ॅप आहे. याचा अर्थ असा की व्हॉट्सअ‍ॅप डेस्कटॉप युजर्सना संदेश पाठवण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी आणि सिंक करण्यासाठी स्मार्टफोनला लिंक करण्याची आवश्यकता लागणार नाही. सध्या व्हॉट्सअ‍ॅप डेस्कटॉप युजर्सना व्हॉट्सअ‍ॅपची वेब-आधारित आवृत्ती डाउनलोड करावी लागते किंवा इंटरनेट ब्राउझरद्वारे व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करावा लागतो. परंतु हे नवं अ‍ॅपफोन अ‍ॅपवर अवलंबून न राहता स्टँडअलोन अ‍ॅप म्हणून काम करते. व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन नेटिव्ह अ‍ॅप (Whatsapp Windows Native App) अधिक विश्वासार्ह आणि अधिक वेगवान असेल.  हे तुमच्या डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टमसाठी डिझाइन केलेले आणि ऑप्टिमाइझ केलेलं आहे.या अ‍ॅपच्या माध्यमातून वापरकर्त्यांना त्यांचा फोन ऑफलाइन असताना देखील संदेश प्राप्त करता येतील. अ‍ॅप डाउनलोड कसं करायचं? अपडेटेड FAQ वेबपेजनुसार, नवीन डेस्कटॉप अ‍ॅप विंडोजवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. हे मायक्रोसॉफ्ट अ‍ॅप स्टोअरवरून डाउनलोड केलं जाऊ शकतं. कसे जोडायचे ते पाहूया... - तुमच्या फोनवर WhatsApp उघडा. - येथे Android वरील More पर्यायावर किंवा iPhone वर Settings वर टॅप करा. - त्यानंतर Linked Devices वर टॅप करा. - तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप डेस्कटॉप अ‍ॅपवर दिसणार्‍या QR कोडकडे तुमच्या फोनचा कॅमेरा पॉइंट करा. हेही वाचा- स्मार्टफोनमधला डाटा कम्प्युटरवर ट्रान्सफर करायचा आहे? शून्य मिनिटांत होईल काम व्हॉट्सअ‍ॅप डेस्कटॉप अ‍ॅप, मॅक ऑपरेटिंग सिस्टमसाठी अजून विकासाधीन आहे. इच्छुक लोक लवकर एक्सेससाठी WhatsApp बीटा प्रोग्राम डाउनलोड करू शकतात. नवीन अ‍ॅप क्लिनर इंटरफेस ऑफर करतं आणि सध्याच्या अ‍ॅपपसारखंच दिसतं. अ‍ॅपमध्ये येणारा एकमेव मोठा बदल म्हणजे WhatsApp सूचना आणि संदेश प्राप्त करण्यासाठी तुमचा फोन इंटरनेटशी कनेक्ट करण्याची आवश्यकता नाही. या महिन्याच्या सुरुवातीला व्हॉट्सअ‍ॅपने मेसेज डिलीट करण्याची मुदत वाढवली होती. सध्या यूजर्स असे मेसेज 68 मिनिटांत डिलीट करू शकतात. नवीन अपडेटसह, व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांकडे त्यांचे संदेश हटवण्यासाठी 2 दिवस 12 तासांचा कालावधी मिळेल. वापरकर्ते केवळ स्वतःसाठी संदेश हटवू शकतात किंवा प्रत्येकासाठी संदेश हटवण्याची विनंती करू शकतात.
    First published:

    Tags: Whatsapp, Whatsapp New Feature, Whatsapp News

    पुढील बातम्या