मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

स्मार्टफोनमधला डाटा कम्प्युटरवर ट्रान्सफर करायचा आहे? शून्य मिनिटांत होईल काम

स्मार्टफोनमधला डाटा कम्प्युटरवर ट्रान्सफर करायचा आहे? शून्य मिनिटांत होईल काम

तुम्हालाही तुमचा वैयक्तिक डेटा फोनवरून लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर ट्रान्सफर करायचा असेल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

तुम्हालाही तुमचा वैयक्तिक डेटा फोनवरून लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर ट्रान्सफर करायचा असेल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

तुम्हालाही तुमचा वैयक्तिक डेटा फोनवरून लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर ट्रान्सफर करायचा असेल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

मुंबई, 17 ऑगस्ट : गेल्या काही वर्षांत स्मार्टफोनचा (Smartphone) वापर वाढला आहे. बँकिंग, पेमेंटसारखी सर्व प्रकारची महत्त्वाची कामं स्मार्टफोनच्या मदतीनं करणं सोपं झालं आहे. काळानुरूप स्मार्टफोनमध्ये बदल होत आहे. सध्याच्या काळात स्मार्टफोन खरेदी करताना ग्राहक कॅमेरा, स्क्रिन, प्रोसेसर आदी गोष्टींसोबत स्टोरेज (Storage) हा घटकही विचारात घेतात. पूर्वी 2GB, 4GB आणि 8GB स्टोरेज असलेले स्मार्टफोन होते. पण आता युजर्सना 32GB, 64GB स्टोरेजही कमी वाटू लागलं आहे. सध्या 512GB पर्यंत स्टोरेज असलेले स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत. या स्मार्टफोनची किंमत जास्त असल्याने ते सर्वांनाच परवडतात असं नाही. त्यामुळे स्मार्टफोनमधील जुना डाटा (Data) कुठे आणि कसा ट्रान्सफर (Transfer) करायचा असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. यासाठी लॅपटॉप (Laptop) आणि कम्प्युटर (Computer) हे सर्वोत्तम पर्याय आहेत. स्मार्टफोनमधला डाटा लॅपटॉप आणि कम्प्युटरवर ट्रान्सफर करून साठवण्याकरिता विशिष्ट गोष्टींचा वापर करता येतो. `अमर उजाला`ने या विषयी माहिती दिली आहे.

स्मार्टफोनमध्ये असलेला जुना डाटा लॅपटॉप आणि कम्प्युटरमध्ये ट्रान्सफर करून स्टोअर करता येतो. यासाठी यूएसबी, क्लाउड स्टोरेजसारख्या गोष्टींचा वापर करता येतो. सध्याच्या काळात प्रत्येक युजर मोबाईलवर इंटरनेटचा वापर करतो. त्यामुळे फोनमधील डाटा ऑनलाइन क्लाउड ड्राईव्हमध्ये स्टोअर करता येऊ शकतो. हा डाटा तुम्हाला केव्हाही अ‍ॅक्सेस (Access) करता येतो. अनेक मोबाईल कंपन्या युजर्सना ऑनलाइन डाटा सिंक (Online Data Sync) करण्याचा ऑप्शन उपलब्ध करून देत आहेत. तसंच जुना डाटा ट्रान्सफर करून स्टोअर करण्यासाठी तुम्ही गुगल ड्राइव्ह, गुगल फोटो या सेवांचाही वापर करू शकता. गुगल ड्राइव्ह किंवा गुगल फोटोवर डाटा स्टोअर करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जीमेलवरून (Gmail) साइनअप करावं लागेल. त्यानंतर केवळ एका क्लिकवर तुम्ही हा डाटा केव्हाही अ‍ॅक्सेस करू शकता. तसंच तुम्ही स्मार्टफोनमधला ऑटोमॅटिक डाटा बॅकअप हा पर्याय निवडू शकता. यामुळे तुमच्या फोनमधला डाटा ऑनलाइन ड्राइव्हमध्ये सेव्ह होतो.

Smartphone Tips: स्मार्टफोन वापरताना कधीही करू नका या चुका; हातातच होईल ब्लास्ट

ओटीजीच्या (OTG) मदतीनं तुम्ही स्मार्टफोनमधला डाटा ट्रान्सफर करू शकता. ओटीजीमुळे डाटा लवकर ट्रान्सफर होतो. मात्र, यासाठी तुमच्याकडे ओटीजी अ‍ॅडॉप्टर असणं गरजेचं आहे. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ओटीजी अ‍ॅडॉप्टरच्या (Adoptor) मदतीनं फोनला पेन ड्राइव्ह जोडावा लागेल. त्यानंतर फोनमधल्या सेटिंग्जमधून ओटीजी ऑप्शन एनेबल करावा लागेल. त्यानंतर तुम्ही फोनमधला डाटा पेन ड्राइव्हवर ट्रान्सफर करू शकता. हा पेन ड्राइव्ह (Pen drive) नंतर लॅपटॉप किंवा कम्प्युटरला जोडून डाटा सुरक्षित ठेवू शकता.

यूएसबीच्या (USB) मदतीनंदेखील तुम्ही स्मार्टफोनमधला डाटा अगदी सहजपणे लॅपटॉपमध्ये ट्रान्सफर करू शकता. यासाठी तुमच्याकडे डाटा केबल (Data Cable) असणं आवश्यक आहे. तुम्ही मोबाईल चार्जरची केबल डाटा केबल म्हणून वापरू शकता. यासाठी सर्वप्रथम तुमचा फोन आणि लॅपटॉप यूएसबी केबलने एकमेकांशी कनेक्ट करणं आवश्यक आहे. यानंतर तुमच्या स्मार्टफोनवर एक नोटिफिकेशन येईल. त्यानंतर तुम्ही फाइल ट्रान्सफर हा ऑप्शन सिलेक्ट करावा. या ऑप्शननंतर फाईल सिलेक्ट करावी आणि लॅपटॉपच्या स्टोरेजमध्ये सेंट करावी. या तिन्ही पर्यायांच्या माध्यमातून तुम्ही स्मार्टफोनमधला जुना डाटा सुरक्षित स्टोअर करून ठेवू शकता.

First published:

Tags: Mobile, Smartphone