नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर: व्हॉट्सअॅप हे लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. जगभरात मेसेजिंगसाठी व्हॉट्सअॅपचा सर्वाधिक वापर केला जातो. जगभरात त्याचे 2 अब्ज मंथली अॅक्टिव्ह युजर्स आहेत. भारतदेखील व्हॉट्सअॅपची सर्वात मोठी बाजारपेठ आहे, कारण भारतात त्याचे 50 कोटींपेक्षा जास्त युजर्स आहेत. आता दिवाळी आलीये, त्यामुळे लोक त्यांच्या व्हॉट्सअॅपवरून नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींना शुभेच्छा पाठवतील. यामध्ये मेसेज, फोटो आणि व्हिडिओ शेअरिंगचा समावेश असेल. मात्र दिवाळीपासून सर्वांनाच ही सुविधा मिळणार नाही. त्याचं कारण म्हणजे आयफोन आणि अँड्रॉइडच्या जुन्या व्हर्जनवर व्हॉट्सअॅप काम करणार नाही. दिवाळीच्या दिवशी म्हणजे 24 ऑक्टोबरला व्हॉट्सअॅप जुन्या iOS आणि Android ऑपरेटिंग सिस्टमला सपोर्ट करणार नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे असे फोन आहेत त्यांना व्हॉट्सअॅपची सेवा मिळणार नाही. यासंदर्भात टीव्ही 9 हिंदीने वृत्त दिलंय. कोणत्या फोनवर व्हॉट्सअॅप चालणार नाही? जे आयफोन iOS 10 आणि iOS 11 वर चालतात, त्यातून व्हॉट्सअॅप आपला सपोर्ट काढून घेत आहे. म्हणजेच व्हॉट्सअॅप या प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टीमसह आयफोनवर काम करणार नाही. यासोबतच आयफोन 5 आणि iPhone 5C च्या युजर्सनाही व्हॉट्सअॅपची सेवा मिळणार नाही. व्हॉट्सअॅपमध्ये भविष्यात काही अपडेट्स येणार असून ते अशा फोनवर सपोर्ट करणार नाहीत, त्यामुळे या फोनसाठी व्हॉट्सअॅप त्यांची सेवा बंद करत आहे, असं कंपनीने म्हटलंय. हेही वाचा - स्वस्तातल्या स्मार्टफोनसाठी गुगलनं लॉंच केली अँड्रॉइड गो 13 एडिशन व्हॉट्सअॅप सध्या त्याच आयफोनवर चालतं ज्यामध्ये iOS 12 किंवा त्यापेक्षा नवीन व्हर्जन आहे. व्हॉट्सअॅप नेहमी आपल्या युजर्सना नवीन व्हर्जन वापरण्याचा सल्ला देतं, जेणेकरून त्यांना सर्व नवनवीन फीचर्स वापरता येतील आणि हे अॅप स्मार्टफोनवर सहजपणे चालू शकेल. या अँड्रॉइड फोनमध्ये व्हॉट्सअॅप सपोर्ट करणार नाही आयफोनप्रमाणेच काही अँड्रॉईड फोनवर व्हॉट्सअॅप काम करणार नाही. कंपनीने म्हटलंय की, 4.1 किंवा त्यापेक्षा जुन्या व्हर्जनवर चालणाऱ्या अँड्रॉईड फोनला व्हॉट्सअॅप सेवेचा लाभ मिळणार नाही. म्हणजेच अशा फोनवरून मेसेज पाठवता येणार नाहीत, कॉल किंवा व्हिडिओ कॉलही करता येणार नाही. यासाठी युजरना आपल्या फोनची ऑपरेटिंग सिस्टिम अपडेट करावी लागेल. हे काम अवघड असून, त्यापेक्षा चांगला नवीन फोन विकत घेणं हा योग्य पर्याय ठरू शकतो. व्हॉट्सअॅपने काय म्हटलंय? मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचं म्हणणं आहे, की लोक अजूनही काही जुनी डिव्हाईस आणि सॉफ्टवेअर वापरत आहेत. या जुन्या फोनमध्ये लेसेस्ट सिक्युरिटी अपडेट्स येत नाहीत. तसंच, असे फोन अपडेटेड व्हॉट्सअॅपला सपोर्ट करत नाहीत, त्यामुळे ही सेवा बंद करण्यात येत आहे. ज्या फोनवर व्हॉट्सअॅप बंद केले जाईल, त्यासंदर्भात युजर्सना मेसेज पाठवून त्यांचे फोन अपग्रेड करण्याची आठवण करून दिली जाईल. जेणेकरून व्हॉट्सअॅप फोनवर चालणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टिमला सपोर्ट करू शकेल. व्हॉट्सअॅप kaiOS 2.5.0 आणि नवीन व्हर्जनवर काम करते. अशी ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या फोनमध्ये जिओ फोन व जिओ फोन 2 यांचा समावेश आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.