मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

बॅडन्यूज! दिवाळीपासून ‘या’ स्मार्टफोनवर चालणार नाही व्हॉट्सअ‍ॅप, काय आहे कारण?

बॅडन्यूज! दिवाळीपासून ‘या’ स्मार्टफोनवर चालणार नाही व्हॉट्सअ‍ॅप, काय आहे कारण?

बॅडन्यूज! दिवाळीपासून ‘या’ स्मार्टफोनवर चालणार नाही व्हॉट्सअ‍ॅप, काय आहे कारण?

बॅडन्यूज! दिवाळीपासून ‘या’ स्मार्टफोनवर चालणार नाही व्हॉट्सअ‍ॅप, काय आहे कारण?

iOS 10 आणि iOS 11 वर चालणाऱ्या iPhones साठी WhatsApp आपला सपोर्ट काढून घेत आहे. म्हणजेच व्हॉट्सअ‍ॅप या प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टीम असणाऱ्या आयफोनवर काम करणार नाही. यासोबतच iPhone 5 आणि iPhone 5C चे वापरकर्ते व्हॉट्सअ‍ॅपची सेवा घेऊ शकणार नाहीत.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 21 ऑक्टोबर: इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅपच्या जगात व्हॉट्सअ‍ॅप हे एक मोठं नाव आहे. जगभरात त्याचे 2 अब्ज मासिक सक्रिय वापरकर्ते आहेत. भारत त्याची सर्वात मोठी बाजारपेठ आहे कारण भारतात व्हॉट्सअ‍ॅपचे 50 कोटीहून अधिक वापरकर्ते आहेत. दोनच दिवसात दिवाळी येणार आहे. या आनंदाच्या सणानिमित्त लोक त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवरून लोकांना शुभेच्छा पाठवतील, फोटो आणि व्हिडिओ शेअर करतील. मात्र या दिवाळीला काही स्मार्टफोन युजर्सना व्हॉट्सअपच्या माध्यमातून दिवाळीच्या शुभेच्छा देता येणार नाहीत. कारण व्हॉट्सअप काही जुन्या स्मार्टफोनवरील सपोर्ट काढून घेणार आहे. iPhone आणि Android च्या काही जुन्या आवृत्त्यांवर WhatsApp काम करणार नाही. दिवाळीच्या दिवशी म्हणजे 24 ऑक्टोबरला व्हॉट्सअॅप जुन्या iOS आणि Android ऑपरेटिंग सिस्टमला सपोर्ट करणार नाही. त्यामुळं ज्यांच्याकडे असे फोन आहेत त्यांना व्हॉट्सअॅपची सेवा मिळणार नाही.

या फोनवर WhatsApp काम करणार नाही-

iOS 10 आणि iOS 11 वर चालणाऱ्या iPhones साठी WhatsApp आपला सपोर्ट काढून घेत आहे. म्हणजेच व्हॉट्सअ‍ॅप या प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारित आयफोनवर काम करणार नाही. यासोबतच iPhone 5 आणि iPhone 5C चे वापरकर्ते व्हॉट्सअ‍ॅपची सेवा वापरू शकणार नाहीत. याबाबत व्हॉट्सअ‍ॅपनं म्हटलं आहे की अशा फोनवर आपली सेवा बंद केली जात आहे कारण भविष्यात काही अपडेट्स येणार आहेत जे अशा फोनवर काम करणार नाहीत.

WhatsApp सध्या त्याच iPhone वर चालतं, जे iOS 12 किंवा नवीन ऑपरेटींग सिस्टमवर चालतील. व्हॉट्सअ‍ॅप नेहमी आपल्या वापरकर्त्यांना नवीन आवृत्तीचा अवलंब करण्याचा सल्ला देतं जेणेकरून नवीन वैशिष्ट्ये उपलब्ध होऊ शकतील आणि हे अ‍ॅप स्मार्टफोनवर सुरळीतपणे चालू शकेल.

हेही वाचा: एक हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत मिळतायत ‘हे’ ब्रँडेड हेडफोन्स, पाहा ऑफर्स

या अँड्रॉइड फोनवरून व्हॉट्सअ‍ॅप काढून टाकले जाईल-

आयफोनप्रमाणेच काही अँड्रॉईड फोनवर व्हॉट्सअ‍ॅप काम करणार नाही. कंपनीनं म्हटलं आहे की, 4.1 किंवा त्यापेक्षा जुन्या आवृत्तीवर चालणाऱ्या अँड्रॉईड फोनला व्हॉट्सअ‍ॅप सेवेचा लाभ मिळणार नाही. म्हणजेच अशा फोनवरून मेसेज पाठवता येणार नाही किंवा कॉल किंवा व्हिडिओ कॉलही करता येणार नाही. यासाठी यूजरला त्याच्या फोनची ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करावी लागेल. हे काम अवघड असलं तरी त्यापेक्षा चांगला नवीन फोन विकत घेण्याचा पर्याय असेल.

व्हॉट्सअ‍ॅपनं काय म्हटलं?

मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचं म्हणणं आहे की लोक अजूनही काही जुने डिव्हाईस आणि सॉफ्टवेअर वापरत आहेत. त्यांची संख्या खूप कमी आहे. या जुन्या डिव्हाइसला नवीन सुरक्षा अपडेट करता येत नाही. तसेच असे फोन अपडेटेड व्हॉट्सअ‍ॅपला सपोर्ट करत नाहीत. त्यामुळं त्यांची सेवा बंद करण्यात येत आहे. कंपनीनं सांगितले की, ज्या फोनवर व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट बंद होणार आहे, त्यांना याची पूर्वकल्पना दिली जाईल, कारण ते त्यांचा फोन अपग्रेड करू शकतील. जेणेकरून त्यांना व्हॉट्सअॅपचा सपोर्ट मिळू शकेल.  WhatsApp kaiOS 2.5.0 आणि नवीन आवृत्त्यांवर कार्य करते. या प्रकारची ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या फोनमध्ये Jio Phone आणि Jio Phone 2 यांचा समावेश होतो.

First published:

Tags: Whatsapp, Whatsapp News, WhatsApp user