मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /एक हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत मिळतायत ‘हे’ ब्रँडेड हेडफोन्स, पाहा ऑफर्स

एक हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत मिळतायत ‘हे’ ब्रँडेड हेडफोन्स, पाहा ऑफर्स

एक हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत मिळतायत ‘हे’ ब्रँडेड हेडफोन्स, पाहा ऑफर्स

एक हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत मिळतायत ‘हे’ ब्रँडेड हेडफोन्स, पाहा ऑफर्स

Best Earbuds under 1000 rupees: तुम्ही हेडफोन किंवा इअरफोन घेण्याच्या विचारात असाल तर हा सेल तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. सेलमध्ये एकापेक्षा एक सरस ब्रँड्सचे इअरफोन एक हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत मिळत आहेत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 17 ऑक्टोबर: नवरात्र व दसरा सण गेले, आता दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सणांमुळे ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर सेल सुरू आहेत. त्या सेलमध्ये कपडे, सजावटीच्या वस्तूंसह इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसेसवर जबरदस्त ऑफर्स सुरू आहेत. तुम्ही हेडफोन किंवा इअरफोन घेण्याच्या विचारात असाल तर हा सेल तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. सेलमध्ये एकापेक्षा एक सरस ब्रँड्सचे इअरफोन एक हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत मिळत आहेत. यामध्ये Boat, PTron, Miviच्या प्रोडक्ट्सचा समावेश आहे. अमेझॉनवर निवडक बँकांच्या कार्डवर 10 टक्के स्पेशल सूटदेखील मिळत आहे.

    पाच स्वस्तात मस्त ब्रँडेड हेडफोन्स:

    1. Mivi Duopods A25 TWS Earbuds: Mivi चे ब्लूटूथ ट्रू वायरलेस इअरबड्स फक्त 799 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. त्याची खरी किंमत 2,999 रुपये आहे. युजर्स या डिव्हाइसवर 1,250 रुपयांपर्यंत ICICI बँक क्रेडिट कार्डसह 10 टक्के सूट देखील मिळवू शकतात. हे इअरबड्स व्हॉइस असिस्टंट सपोर्ट, टच कंट्रोल्स आणि एकूण 40 तासांच्या प्लेबॅक टाइमसह येतात.

    2. PTron Bassbuds Duo TWS Earbuds: PTron च्या ट्रू वायरलेस इअरबड्सची किंमत 2,599 रुपये आहे. पण युजर्स डिस्काउंटमध्ये ते फक्त 599 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. याशिवाय युजर्सना ICICI बँक क्रेडिट कार्ड वापरण्यावर 1,250 रुपयांपर्यंत 10 टक्के सूट मिळेल. हे डिव्हाईस ब्लूटूथ v5.1 10M वायरलेस कनेक्टिव्हिटीसह येते. चार्जिंग केससह युजर्स ते 32 तास वापरू शकतात.

    हेही वाचा:दिवाळीनिमित्त कमी पैशात आयफोन खरेदी करायची संधी, ‘या’ मॉडेलवर मिळतीये 17000 रुपयांची सूट

    3. boAt Airdopes 121v2 TWS Earbuds: बोटचे ट्रू वायरलेस इअरबड्स चांगल्या डिस्काउंटसह मिळत आहेत. युजर्स अमेझॉनवरून 2,999 रुपयांऐवजी केवळ 999 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. हे डिव्हाईस 8mm ड्रायव्हर्स, बॅटरी इंडिकेटर, मल्टिफंक्शन कंट्रोलसह येतं. बोटच्या इअरबड्ससह युजर्स 14 तासांपर्यंत प्लेबॅक टाईम एंजॉय करू शकतात.

    4. boAt Rockerz 370 Bluetooth Headphone:boAt Rockerz 370 Bluetooth हेडफोनची मूळ किंमत 2,499 आहे. हे डिव्हाईस अमेझॉनवर फक्त 799 रुपयांमध्ये मिळत आहे. हा हेडफोन ब्लूटूथ v5.0 कनेक्टिव्हिटीसह येतो. हा हेडफोन 12 तासांचा प्लेटाइम देतो, असा कंपनीचा दावा आहे. तसेच हेडफोन 300mAh बॅटरी पॉवरला सपोर्ट करतो.

    5. boAt BassHeads 900 Wired Headphone: अमेझॉनवर हेडफोन 1,000 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. बोटचे वायर्ड हेडफोन फक्त 599 रुपयांना उपलब्ध आहेत. त्याची खरी किंमत 2,490 रुपये आहे. युजर्स या हेडफोनवर मोठ्या डिस्काउंटचा लाभ घेऊ शकतात. यात कॉल आणि प्लेबॅक कंट्रोल, बिल्ट-इन माइक, 40mm ड्रायव्हर्स यांसारखी फीचर्स उपलब्ध आहेत.

    First published: