मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

क्या बात है! आता WhatsApp चॅटिंग होणार अजूनच भन्नाट; लवकरच येणार हे 5 नवे फीचर्स

क्या बात है! आता WhatsApp चॅटिंग होणार अजूनच भन्नाट; लवकरच येणार हे 5 नवे फीचर्स

आम्ही तुम्हाला अशाच काही भन्नाट फीचर्सबद्दल सांगणार आहोत.

आम्ही तुम्हाला अशाच काही भन्नाट फीचर्सबद्दल सांगणार आहोत.

आम्ही तुम्हाला अशाच काही भन्नाट फीचर्सबद्दल सांगणार आहोत.

नवी दिल्ली, 18 जून : व्हॉटसअप (WhatsApp) हे सर्वाधिक पसंती असलेले मेसेजिंग अॅप आहे. प्रायव्हसीच्या अनुषंगाने गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. परंतु, सध्या हे अप्लिकेशन त्याच्या आगामी नाविन्यपूर्ण फिचर्समुळे चर्चेत आले आहे. व्हॉटसअप सध्या काही फिचर्सवर काम करत आहे आणि हे भन्नाट फीचर्स  लवकरच आयओएस आणि अण्ड्राईड फोन्सवर सुरु होण्याची शक्यता आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही भन्नाट फीचर्सबद्दल सांगणार आहोत.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, Disappearing हे मेसेज फिचर आता अधिक विस्तारित करण्यात येणार असून त्याला आला व्ह्यू वन्स (View Once) असा ऑप्शन जोडला जाणार आहे. याबाबत मार्क झुकेरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी सांगितले की व्हॉटसअप लवकरच व्ह्यू वन्स हे नवे फिचर आणणार आहे. या फिचरच्या मदतीने युजर जो फोटो किंवा व्हिडीओ शेअर करेल तो केवळ एकदाच बघता येणार आहे. तसेच कंपनी आता व्हॉटसअपच्या वेब व्हर्जनलाही कॉलिंग फिचर (Calling Feature) देऊ शकते. कंपनीचे प्रमुख विल काथकार्ट यांनी नुकतेच मल्टी डिव्हाईस सपोर्टबाबत सुतोवाच केले असून, लवकरच हे देखील फिचर युजरला उपलब्ध होऊ शकते.

हे वाचा - WhatsApp चॅट डिलीट करण्याची गरज नाही; असे Hide करा तुमचे सिक्रेट मेसेज

व्ह्यू वन्स फिचर (View Once Feature)

टीव्ही 9 च्या वृत्तानुसार, झुकरबर्ग यांनी सांगितले की व्हॉटसअप लवकरच व्ह्यू वन्स हे फिचर लॉन्च करेल. हे फिचर इन्स्टासारखेच आहे. या फिचरच्या मदतीने युजर जो फोटो किंवा व्हिडीओ शेअर करेल तो फोटो किंवा व्हिडीओ अन्य युजरला केवळ एकदाच पाहता येईल. याचाच अर्थ जर तुम्ही एखाद्या अन्य युजर फोटो पाठवला आणि तो त्या युजरने पाहिला कि त्यानंतर लगेचच तो फोटो Disappear होईल. हे फिचर आपोआप सुरु होणार नाही. यासाठी तुम्हाकला मोड ऑन करावा लागेल.

मल्टी डिव्हाईस सपोर्ट (Multi Device Support)

व्हॉटसअप गेल्या काही महिन्यांपासून हे फिचर टेस्टींग करीत आहे. लवकरच हे फिचर लॉन्च होण्याची शक्यता आहे. वाबिटाइन्फोच्या वृत्तानुसार, याचे बिटा व्हर्जन लोकांसाठी येत्या 1 ते 2 महिन्यात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. हे फिचर एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड (End To End Encrypted) असेल.

मिस्ड ग्रुप कॉल (Missed Group Call)

व्हॉटसअप या देखील फिचरवर काम करत आहे. जर तुम्ही चुकून ग्रुप कॉल मिस केला तर तुम्ही तो पुन्हा जॉईन करु शकता. याचाच अर्थ जर एखादी व्यक्ती तुम्हाला व्हिडीओ कॉल जॉईन करण्यासाठी Invite पाठवले असेल आणि तुम्ही तो जॉईन केला नसले तर काही कालावधीनंतरही तुम्हाला तो जॉईन करता येईल.

व्हॉटसअप रिड लॅटर (WhatsApp Read Later)

कंपनीचे रिड लॅटर या फिचरवर देखील काम सुरु आहे. वाबिटाइन्फोच्या वृत्तानुसार, हे फिचर यापूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या अर्काईव्ह चॅट या फिचरला रिप्लेस करेल. सध्या जर तुम्ही कोणाचे चॅट अर्काइव्ह केले तर तसे चॅट वर दिसते. परंतु नव्या रिड लॅटर फिचरमुळे तुम्हाला असे दिसणार नाही.

हे वाचा - ऑनलाईन फ्रॉड झाल्यास इथे करा तक्रार, गृह मंत्रालयाकडून Helpline नंबर जारी

डिसअपिअर (Disappear) मोड

कंपनी Disappear मोडचा विस्तार करीत आहे. वाबिटाइन्फोच्या वृत्तानुसार, फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी यास दुजोरा दिला आहे. व्हॉटसअप लवकरच या मोडचा विस्तार करणार असून यामुळे युजरला प्रत्येक चॅट थ्रेडस Disappearing मेसेज इनेबल करण्याची परवानगी मिळेल. सध्या Disappearing फिचर्स प्रत्येक चॅटसाठी मॅन्युअली सुरु करावे लागते. एकदा इनेबल केल्यानंतर मेसेज काही वेळानंतर डिलीट होतो. नव्याने या फिचरचा विस्तार होत असला तरी त्यासाठी युजरला टाईमर मिळेल का याबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही.

First published:

Tags: Delhi, Whatsapp