WhatsApp ओपन न करताच समजेल कोण ऑनलाईन आहे; जाणून घ्या ही सोपी ट्रिक
तसेच आणखी एक फिचर येणार आहे ते म्हणजे युजर्सना त्यांच्या सोयीनुसार व्हॉईस मेसेजेसची प्लेबॅक गती बदलता येणार आहे. सध्या बीटामध्ये असलेले हे फिचर आयओएस युजर्ससाठी विकसित केले जात आहे. अनेकदा मेसेज टाईप करायला पुरेसा वेळ नसतो अथवा कंटाळा येतो, यामुळे अशा युजर्सना आता टाईप न करताही मेसेज पाठवता येणार आहे. गेल्याच महिन्यात व्हॉट्सऍपनं आपल्या डेस्कटॉप ऍपसाठी (Desktop App) व्हॉईस (Voice) आणि व्हिडिओ कॉलिंग (Video Calling) ही फीचर्स दाखल केली होती. डेस्कटॉप ऍपवरील व्हिडिओ कॉलिंग फिचर पोर्ट्रेट आणि लँडस्केप ओरिएन्टशनसाठी योग्य ठरेल, असंही व्हॉट्सऍपने स्पष्ट केलं होतं. व्हिडिओ कॉलिंग दरम्यान, व्हिडिओ डेस्कटॉपच्या स्क्रीनवरील रीसायजेबल स्टँडअलोन विंडोमध्ये दिसून येतो आणि तो अगदी टॉपवर असतो, त्यामुळे युजर्सना आपलं चॅट न दिसण्याची भीती उरत नाही. सध्या व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग केवळ वन टू वन चॅटसाठी उपलब्ध आहे, नंतर ते ग्रुप चॅटमध्ये उपलब्ध होईल. अँड्रॉइड आणि आयओएस युजर्सना व्हॉट्सअॅपवर एकाच व्हॉईस किंवा व्हिडिओ कॉल दरम्यान आठ जणांचा समावेश करता येईल.मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Technology, Whats app news