जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / WhatsApp यूजर्स सावधान! तुमची हेरगिरी तर केली जात नाही ना?

WhatsApp यूजर्स सावधान! तुमची हेरगिरी तर केली जात नाही ना?

WhatsApp यूजर्स सावधान! तुमची हेरगिरी तर केली जात नाही ना?

WhatsApp यूजर्स सावधान! तुमची हेरगिरी तर केली जात नाही ना?

WhatsApp Tips And Tricks: तुम्ही व्हॉट्सअॅप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयोगी पडू शकते. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून कोणी तुमची हेरगिरी करत आहे की नाही हे तुम्ही चुटकीसरशी शोधू शकता.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 23 नोव्हेंबर: व्हॉट्सअ‍ॅप हे आपल्या जीवनात ऑनलाइन चॅटसाठी एक उत्तम संवाद साधन बनलं आहे. हे अ‍ॅप जगभरात खूप लोकप्रिय झालं आहे. काळासोबत व्हॉट्सअॅपच्या चॅटिंगच्या पद्धतीतही बदल होताना दिसत आहेत. कंपनीनं व्हॉट्सअ‍ॅप ऑनलाइन आणि मल्टी-डिव्हाइस सपोर्ट सेवा बऱ्याच काळापासून ऑफर केली आहे. वापरकर्त्यांना ही वैशिष्ट्ये खूप उपयुक्त वाटत आहेत. पण एक भीतीही आहे. ही भीती म्हणजे कोणी आपली हेरगिरी करत आहे का? व्हॉट्सअ‍ॅपपवर तुमचे मेसेज कोणी वाचत आहे की नाही हे कसं ओळखायचं? मल्टी-डिव्हाइस सपोर्ट फीचर जितकं फायदेशीर तितकंच धोकादायक: तुमचे मित्र, कुटुंब किंवा इतर कोणत्याही जवळच्या मित्रासाठी तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप कम्युनिकेशनचं निरीक्षण करणं अगदी सोपं आहे. त्यांना फक्त कोणत्या ना कोणत्या मार्गानं तुमचा फोन थोड्या वेळासाठी घ्यायचा आहे. हॅकिंगची शक्यता नेहमीच नसते. व्हॉट्सअ‍ॅप वेब किंवा मल्टी-डिव्हाइस सपोर्ट फीचरमुळं कोणीही तुमची चॅट हॅक न करता पाहू शकतो. कोणीही संदेश पाहू शकतो- या फीचर्सच्या मदतीनं तुम्ही अनेक उपकरणांवर व्हॉट्सअ‍ॅप वापरू शकता. व्हॉट्सअ‍ॅप वेब वापरण्यासाठी, मुख्य डिव्हाइस इंटरनेटशी कनेक्ट केलेला असणं आवश्यक आहे, परंतु मल्टी-डिव्हाइस समर्थन वैशिष्ट्य वापरताना हे आवश्यक नाही. जर एखाद्यानं एकदा तुमचं व्हॉट्सअ‍ॅप  कनेक्ट केलं तर पुढील वेळीपासून तो कोणत्याही परवानगीशिवाय तुमचं व्हॉट्सअ‍ॅप वापरू शकतो. हेही वाचा:  Netflix अकाउंट तुमचं अन् मजा दुसरं कुणीतरी घेतंय? असं करा Remove तुमचे संदेश इतरांनी वाचले आहेत की नाही हे कसं तपासायचं? - तुमचं व्हॉट्सअ‍ॅप उघडा. - अ‍ॅपच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात उपलब्ध असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा. - Linked Device या पर्यायावर क्लिक करा. - पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तुमचे व्हॉट्सअ‍ॅप  लॉग इन असलेल्या डिव्हाइसेसची सूची मिळेल.\

News18लोकमत
News18लोकमत

कसं वाचावं? अतिरिक्त सिक्युरिटी फीचरचा वापर करून तुम्ही या गोष्टींपासून स्वत:चा बचाव करू शकता. दुसरा मार्ग म्हणजे लिंक्ड डिव्‍हाइस ऑप्शनवर क्‍लिक केल्‍यानंतर तुम्‍हाला तुमच्‍या व्हॉट्सअॅपवर लॉग इन असलेल्‍या डिव्‍हाइसेसची सूची मिळेल. तिथूनही तुम्ही लॉग आउट करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात