मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Netflix अकाउंट तुमचं अन् मजा दुसरं कुणीतरी घेतंय? असं करा Remove

Netflix अकाउंट तुमचं अन् मजा दुसरं कुणीतरी घेतंय? असं करा Remove

तुमच्या Netflix अकाउंची मजा दुसरंच कुणी घेतंय का? असं करा Remove

तुमच्या Netflix अकाउंची मजा दुसरंच कुणी घेतंय का? असं करा Remove

Netflix Trick: आज आम्ही तुम्हाला अशा एका ट्रिकबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या परवानगीशिवाय तुमचं Netflix खातं कोण वापरत आहे हे तपासू शकता. ते खातं कसं हटवायचं ते देखील आम्ही सांगणार आहोत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 21 नोव्हेंबर: कोविडनंतर ओटीटी कंटेटची क्रेझ वाढली आहे. लोक सिनेमा हॉलमध्ये जाण्याऐवजी OTT कंटेंट पाहण्यास प्राधान्य देत आहेत. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरही चित्रपट सुरू होत आहेत. तुम्हाला Netflix बद्दल माहिती असेलच. जर तुमचं नेटफ्लिक्स खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. आज आम्ही तुम्हाला एका ट्रिकबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या परवानगीशिवाय तुमचं Netflix खातं कोण वापरत आहे हे तपासू शकता. ते खाते कसं रिमूव्ह करायचं हेदेखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कोणीतरी गुप्तपणे तुमचं Netflix खातं चालवत आहे का?

सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर नेटफ्लिक्स वेबसाइट उघडावी लागेल आणि त्यानंतर तुमचा आयडी किंवा फोन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावं लागेल. यानंतर तेथे दिलेल्या प्रोफाइलपैकी एकावर जावं लागेल.

हेही वाचा: हे भारीय! WhatsApp व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करणं खूपच सोपं, वापरा ही सोपी ट्रिक

तुमचं नेटफ्लिक्स अकाउंट कोण वापरतंय?

कोणतीही प्रोफाईल उघडल्यानंतर, तुम्हाला बाजूला दिलेल्या मेनूमध्ये जावं लागेल आणि नंतर खाली दिलेला अकाउंट हा पर्याय निवडा लागेल आणि नंतर अकाउंट सेटिंग्ज वर जा. येथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील, त्यापैकी एक 'Recent device streaming activity' असेल. तुम्ही हा पर्याय निवडताच तुमच्या डिव्हाईसमध्ये कोणी लॉग इन केलं, कुठून आणि कोणत्या वेळी सर्व खाती तुमच्यासमोर येतील.

नको असलेली लॉगिन अशी करा रिमूव्ह:

तुम्ही ओळखत नसलेली आणि तुम्ही ठेवू इच्छित नसलेली खाती तुम्ही काढून टाकू शकता. यासाठी पुन्हा Account पर्यायावर जा, त्यानंतर अकाउंट सेटिंग्जवर जा आणि मेनूमध्ये दिलेल्या 'सर्व डिव्हाइसेसमधून साइन आउट करा' या पर्यायावर क्लिक करा. अशा प्रकारे तुम्ही नको असलेल्या खात्यांपासून मुक्त होऊ शकाल आणि पुन्हा लॉग इन करून तुमचं खातं वापरू शकाल. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पासवर्ड देखील बदलू शकता.

First published:

Tags: Netflix, Tech news