Home /News /technology /

WhatsApp Payment बाबत NPCI घेतला मोठा निर्णय; जास्तीत जास्त युझर्सना होणार फायदा

WhatsApp Payment बाबत NPCI घेतला मोठा निर्णय; जास्तीत जास्त युझर्सना होणार फायदा

WhatsApp युझर्सची संख्या वाढली आहे. ते लक्षात घेत 'नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'ने (NPCI) व्हॉट्सअॅप पेमेंट सर्व्हिसबाबत (WhatsApp Payment Service) एक निर्णय घेतला आहे.

मुंबई, 27 नोव्हेंबर : 'नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'ने (NPCI) व्हॉट्सअॅपच्या पेमेंट सर्व्हिसच्या (WhatsApp Payment Service) युझर्सच्या संख्येची मर्यादा दोन कोटींवरून चार कोटींपर्यंत वाढवली आहे. एनपीसीआयने उचललेल्या या पावलामुळे डिजिटल पेमेंट व्यवसायातल्या स्पर्धेत निरंतर वाढ होत आहे. मनीकंट्रोलने या महिन्याच्या सुरुवातीला आणि सर्वांत आधी हे सांगितलं होतं, की व्हॉट्सअॅप आपल्या डिजिटल पेमेंट युझर्सच्या संख्येच्या मर्यादेत वाढ करण्याच्या प्रयत्नात आहे आणि त्यासाठी व्हॉट्सअॅपने दाखल केलेला अर्ज एनपीसीआयच्या विचाराधीन आहे. मनीकंट्रोलने हेही सांगितलं होतं, की एनपीसीआय ही मर्यादा वाढ टप्प्याटप्प्याने करील, जेणेकरून पेमेंट सिस्टीममध्ये अचानक दबाव वाढणार नाही. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआय ही संस्था देशातली रिटेल पेमेंट्स आणि सेटलमेंट सिस्टीमचं व्यवस्थापन करते. NPCIने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात व्हॉट्सअॅपला पेमेंट सेवा सुरू करण्याची परवानगी दिली होती; मात्र व्हॉट्सअॅप ही सेवा जास्तीत जास्त दोन कोटी ग्राहकांनाच देऊ शकेल, असं बंधनही घालण्यात आलं होतं. पूर्वाश्रमीचं फेसबुक आणि आताच्या मेटा कंपनीच्या मालकीच्या असलेल्या व्हॉट्सअॅपच्या युझर्सची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे या कंपनीला पेमेंट सर्व्हिसची परवानगी मिळाल्यानंतर डिजिटल पेमेंट सेवा क्षेत्रात बऱ्याच हालचाली घडतील, अशी अपेक्षा होती; प्रत्यक्षात मात्र तसं काही झालं नाही. हे वाचा - Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस आता व्हॉट्सअॅपने आपल्या पेमेंट सर्व्हिसच्या विस्तारावर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. व्हॉट्सअॅप पेमेंटच्या युझर्सच्या मर्यादेत वाढ झाल्यामुळे (Google Pay) गुगल पे, फोन पे (Phone Pe), पेटीएम (PayTM) आणि जिओ पे (Jio Pay) आदींना स्पर्धा होईल. कारण व्हॉट्सअॅप पेमेंटचा वापर करण्यासाठी ग्राहकांना वेगळं अॅप इन्स्टॉल करावं लागणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहक व्हॉट्सअॅप पेमेंट सर्व्हिस वापरतील, असा होरा आहे. व्हॉट्सअॅपची मेसेंजर सर्व्हिस देशभरात 40 कोटी युझर्स वापरतात. त्यामुळे व्हॉट्सअॅपच्या पेमेंट सर्व्हिसच्या युझर्सच्या संख्येत अचानक वाढ झाली, तर NPCIच्या यंत्रणेवर अचानक ताण वाढू शकतो. म्हणून ही संख्या टप्प्याटप्प्याने वाढवत नेण्याचा NPCI चा विचार आहे. हे वाचा - End-to-end encryption म्हणजे काय? वाचा कसे सुरक्षित राहतात WhatsApp Chats मनीकंट्रोलने या संदर्भात व्हॉट्सअॅप कंपनीशी संपर्क साधून अधिक माहिती विचारली आहे; मात्र अद्याप कंपनीकडून त्याचं उत्तर आलेलं नाही. तसंच, NPCIनेही या वृत्तावर कोणतीही टिप्पणी केलेली नाही.
First published:

Tags: Online payments, Techonology, Whatsapp, Whatsapp pay

पुढील बातम्या