जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / व्हॉट्सअ‍ॅपवर खास मित्रानं ब्लॉक केलंय; `ही` ट्रिक वापरून तुम्हीच स्वतःला करू शकता अनब्लॉक

व्हॉट्सअ‍ॅपवर खास मित्रानं ब्लॉक केलंय; `ही` ट्रिक वापरून तुम्हीच स्वतःला करू शकता अनब्लॉक

व्हॉट्सअ‍ॅपवर खास मित्रानं ब्लॉक केलंय; `ही` ट्रिक वापरून तुम्हीच स्वतःला करू शकता अनब्लॉक

WhatsApp Tips And Tricks: जर कोणी तुम्हाला रागाच्या भरात व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केले असेल, तर या छान युक्तीने तुम्ही स्वतःला अनब्लॉक करू शकता आणि गैरसमज दूर करू शकता.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 27 एप्रिल : सध्याच्या काळात व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) हा सर्वाधिक वापरला जाणारा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media Platform) आहे. मित्र, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, व्यावसायिक किंवा ऑफिसमधल्या सहकाऱ्यांशी कनेक्ट राहण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर प्रामुख्याने केला जातो. व्हॉट्सअ‍ॅपनेदेखील युजर्ससाठी अनेक फीचर्स दिली आहेत. या फीचर्सच्या माध्यमातून तुम्ही संबंधित व्यक्तीशी फोटो, व्हिडिओ, ऑडिओ क्लिप आदी गोष्टी अगदी सहज शेअर करू शकता. एखाद्यावेळी व्हॉट्सअ‍ॅपवर जोडीदाराशी किंवा खास मित्रमैत्रिणीशी चॅट करताना मतभेद, वाद-विवाद होतात. अशावेळी समोरील व्यक्ती तुम्हाला ब्लॉक (Block) करू शकते. ब्लॉक केल्याने तुमचा चॅटिंगच्या माध्यमातून सुरू असलेला संवाद थांबतो. परंतु, ब्लॉक केल्यानंतरही तुम्ही संबंधित व्यक्तीशी संवाद साधू शकता. तसंच स्वतःला अनब्लॉक (Unblock) करू शकता. यासाठी खास ट्रिक्सचा वापर करता येतो. `झी न्यूज हिंदी`ने या विषयीची माहिती दिली आहे. एखाद्या खास मित्रमैत्रिणीनं किंवा जोडीदारानं तुम्हाला मतभेद, वाद-विवाद झाल्यानं व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लॉक केलं तर काळजी करण्याची गरज नाही. काही सोप्या ट्रिक्सचा वापर करून तुम्ही स्वतःला अनब्लॉक करू शकता. तसंच ब्लॉक केलेलं असतानाही संबंधित व्यक्तीची समजूत काढण्यासाठी चॅट करू शकता. यासाठी तुम्हाला एका गोष्टीची मदत घ्यावी लागेल. तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राला व्हॉट्सअ‍ॅपवर एक ग्रुप (WhatsApp Group) तयार करायला सांगावा. या ग्रुपमध्ये जर तुम्हाला ब्लॉक केलेली व्यक्ती सहभागी झाली तर, तुम्ही केलेले मेसेज त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतील. या माध्यमातून तुम्ही त्या व्यक्तीची समजूत काढण्यात यशस्वी झालात तर कदाचित ती व्यक्ती तुम्हाला अनब्लॉकही करू शकेल. सावधान! WhatsApp च्या माध्यमातून केली जातीये आर्थिक फसवणूक; पेमेंट करताना या गोष्टी लक्षात ठेवाच दुसऱ्या एका पद्धतीनुसार, संबंधित व्यक्तीनं तुम्हाला खरंच ब्लॉक केलं आहे की नाही, हे तपासण्यासाठी तुम्ही एखादा मेसेज पाठवला पाहिजे. जर तुमच्याकडून मेसेज सेंड झाला आणि समोरच्या व्यक्तीकडे डबल टिक झाल्या नसतील तर त्या व्यक्तीनं तुम्हाला ब्लॉक केलं आहे, असं समजावं. जोडीदार किंवा मित्र-मैत्रिणीची समजूत काढता यावी यासाठी तुम्हाला तुमचं व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट (WhatsApp Account) डिलीट करावं लागेल. त्यानंतर पुन्हा व्हॉट्सअ‍ॅप इन्स्टॉल (Install) करून साइनअप करावं लागेल. या प्रक्रियेमुळे तुम्ही आपोआप अनब्लॉक व्हाल. परंतु, समोरील व्यक्तीशी बोलणं अगदी गरजेचं असेल तरच व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट डिलीट करा. कारण यामुळे तुमचा बॅकअप जाऊ शकतो. व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट डिलीट करण्यासाठी खास ट्रिकचा वापर करता येतो. त्यानुसार सर्वप्रथम तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा. त्यानंतर `सेटिंग्ज`या ऑप्शनमध्ये जाऊन अकाउंटवर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला `डिलीट माय अकाउंट` असं लिहिलेलं दिसेल. त्यावर क्लिक करा. येथे तुम्हाला देशाच्या कोडसह तुमचा मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. ही स्टेप पूर्ण झाल्यावर `डिलीट माय अकाउंट`वर क्लिक करा. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप पुन्हा ओपन करून अकाउंट तयार करा. अकाउंट सुरू झाल्यावर ज्या व्यक्तीनं तुम्हाला ब्लॉक केलं होतं.त्या व्यक्तीशी तुम्हाला पुन्हा चॅटच्या माध्यमातून संवाद साधता येईल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात