मुंबई, 25 ऑक्टोबर: अलीकडच्या काळात बहुतांश लोक विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रीय असतात. त्यातही व्हॉट्सअॅप आता आपल्या जीवनाचा अविभाज्य झालाय, असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. आज जवळजवळ प्रत्येकजण व्हॉट्सअॅप वापरतो. या इन्स्टंट मेसेजिंग अॅपचा वापर फक्त वैयक्तिक चॅट आणि कॉलपुरता मर्यादित राहिला नाही. आता विविध कार्यालयांची कामं देखील ग्रुप तयार करुन चालू आहेत. हे एक व्यवसाय व्यासपीठ देखील बनलं आहे. एकंदरीत असं म्हटले जाऊ शकतं की ते आज संवाद साधण्याचं सर्वात मोठे माध्यम बनलं आहे. परंतु या व्यासपीठावर आपण संदेश, फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना काळजी घेणं गरजेचं आहे. आपण कायद्याच्या उल्लंघन तर करत नाही ना, याची माहिती असणं गरजेचं आहे. आपल्या एका चुकीमुळं आपल्याला थेट तुरुंगाची हवा खावी लागू शकते. व्हॉटस्अॅप वापराचे काही नियम आहेतरी त्याबद्दल क्वचितच लोकांना माहिती आहे.व्हॉट्सअॅपवर केलेली एक चूक आपल्याला तुरूंगात कशी पाठवू शकते याबद्दल आम्ही आज सांगणार आहोत. चाइल्ड पोर्नोग्राफी (Child Pornography): जर आपण चुकून व्हॉट्सअॅपवर बाल अश्लीलतेशी संबंधित फोटो किंवा व्हिडिओ सामायिक केले असतील तर आपल्याला तुरूंगाची हवा खावी लागेल. या कायद्याच्या उल्लंघनामुळे दिल्ली पोलिसांनी अलीकडील काळात बर्याच लोकांना अटक केली आहे. तर चुकूनसुद्धा व्हॉट्सअॅपवर बाल अश्लीलतेशी संबंधित कंटेट शेअर करू नका. हेही वाचा: तुमचाही Gmail होतो ओव्हरफ्लो? महत्त्वाचे मेल चुकण्याची भिती? या टिप्स करा फॉलो सामाजिक तेढ किंवा भेदभाव वाढविणाऱ्या पोस्ट/व्हिडिओ: समाजामध्ये तेढ निर्माण करतील असे कोणतेही व्हिडिओ, फोटो आणि संदेश व्हायरल केले असल्यास किंवा या व्यासपीठावर पाठविल्यास आपण कायद्याचं उल्लंघन करीत आहात. आपल्याकडे असा कोणताही व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर असल्यास तो फॉरवर्ड करण्याऐवजी तो त्वरित हटवा. समाजामध्ये तेढ निर्माण करणारे संदेश, व्हिडिओ आणि फोटो शेअर केल्याबद्दल तुम्हाला तुरूंगात टाकले जाऊ शकते.
बनावट बातम्या सामायिक करणं- व्हॉट्सअॅपच्या बनावट बातम्यांविषयीचे धोरणही कठोर आहे. या व्यतिरिक्त फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर तातडीनं कार्यवाही करत असते. बनावट बातम्यांमुळे समाज आणि देशात हिंसाचार किंवा भेदभाव यासारख्या गोष्टींमुळे तो कायदेशीर गुन्हा ठरेल. या परिस्थितीत आपण व्हॉट्सअॅपवर फेक न्यूज पसरविल्यास आपल्याला तुरूंगात जावं लागू शकतं. म्हणूनच हे महत्वाचं आहे की व्हॉट्सअॅपवर प्रत्येक बातमी त्वरित शेअर करू नका. प्रथम ती योग्य आहे की चूक आहे ते तपासून पाहा.