नवी दिल्ली, 16 डिसेंबर: व्हॉट्सअॅप WhatsApp गेल्या काही दिवसांपासून सातत्याने नवनवे फिचर्स लाँच करत आहे. इन्स्टंट मेसेजिंग अॅप नुकतेच नवे फीचर लाँच करण्यात आले आहे. या फीचरद्वारे वॉइस प्रीव्ह्यूचा (WhatsApp Voice Message Preview Feature) पर्याय मिळेल. यूजर्स व्हॉट्सअॅप वर वॉइस मेसेंज सेंड करण्याआधी ऐकू शकतील. यामुळे योग्य वॉइस मेसेज पाठवण्यासाठी मदत मिळेल. व्हॉट्सअॅपचे वॉइस मेसेजेस फीचर लोकप्रिय आहे. यामुळे वॉइस मेसेंज करण्याची व ऐकण्याची सुविधा मिळते. आतापर्यंत व्हॉट्सअॅपवर वॉइस मेसेज रेकॉर्ड केल्यानंतर पुन्हा ऐकता येत नव्हते.
कसे युज करणार हे नवे फिचर?
वॉइस प्रीव्ह्यू फीचरसाठी तुम्हाला नवे नियम पाळावे लागणार आहेत. यासाठी तुम्हाला WhatsApp वर एखादा व्यक्ती किंवा ग्रुप चॅट ओपन करावे लागेल. ट ओपन केल्यानंतर मायक्रोफोनवर टच करा आणि स्लाइड अप करून हँड्स-फ्री रेकॉर्डिंगला लॉक करा. त्यानंतर तुम्ही वॉइस रेकॉर्ड करू शकता. बोलणे पूर्ण झाल्यानंतर स्टॉपवर टॅप करा. आता तुम्ही प्लेवर टॅप करून रेकॉर्डिंग करू शकता. यूजर्स टाइम स्टँपद्वारे रेकॉर्डिंगच्या कोणताही भाग ऐकू शकतील. रेकॉर्डिंग न आवडल्यास ट्रॅशवर टॅप करून वॉइस मेसेजला डिलीट करता येईल. जर तुम्हाला वॉइस मेसेज योग्य वाटत असल्यास सेंडवर क्लिक करून इतर यूजर्सला पाठवू शकता. हे पहिल्यांदा व्हॉट्सअॅपवर बीटा WABetaInfo व्हर्जनमध्ये वापरण्यात आलं होतं. त्यानंतर आता वेब आणि इतर Whatsapp वर हे फीचर वापरता येणार आहे.