मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /दिवाळीनंतर 'या' आयफोन्समध्ये व्हॉट्सअ‍ॅप होणार बंद

दिवाळीनंतर 'या' आयफोन्समध्ये व्हॉट्सअ‍ॅप होणार बंद

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

मेटा कंपनीच्या मालकीचं असलेलं व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युझर्सना सतत काही तरी नवीन देण्याचा प्रयत्न करत असतं.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई : कल्पना करा, एक दिवस अचानक तुमच्या मोबाइलमधलं व्हॉट्सअ‍ॅप बंद पडलं! अ‍ॅप अपडेट करूनही ते सुरू होत नाही, तर तुम्ही काय कराल? व्हॉट्सअ‍ॅपची प्रचंड सवय झालेली असल्यामुळे ते बंद पडल्यानंतर तुम्हीच नक्कीच वैतागून जाल. व्हॉट्सअ‍ॅप मेसेंजर ही मेसेजेसची देवाण-घेवाण करण्यासाठी सर्वांत जास्त प्रमाणात वापरली जाणारी सेवा आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीनं फक्त टेक्स्ट मेसेजेसच नाही, तर ऑडिओ, व्हिडिओ आणि फोटोजचीही अगदी सहजपणे देवाणघेवाण करते येते. अलीकडच्या काळात व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करून पैसेही पाठवणं शक्य झालं आहे.

    मेटा कंपनीच्या मालकीचं असलेलं व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युझर्सना सतत काही तरी नवीन देण्याचा प्रयत्न करत असतं. या वेळी मात्र दिवाळीच्या काळात काही युझर्स नाराज होण्याची शक्यता आहे.

    दिवाळीनंतर आयफोनच्या काही मॉडेल्समध्ये व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट बंद होणार आहे.

    आयफोनच्या काही ठरावीक मॉडेल्समध्ये व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट बंद होणार आहे. त्यामुळे सर्वच युझर्सनी काळजी करण्याची गरज नाही. कंपनी iPhone 5C, iPhone 5 हे फोन्स आणि iOS 10, iOS 11 या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणाऱ्या iPhones मध्ये व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट बंद करत आहे.

    तुमचा आयफोन iOS 10, iOS 11 या जुन्या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करत असेल, तर तुम्ही ते अपडेट करून व्हॉट्सअ‍ॅपचा वापर सुरू ठेवू शकता. त्यासाठी तुम्हाला लेटेस्ट iOS 16 किंवा iOS 15 मध्ये अपडेट करावं लागेल; मात्र iPhone 5C आणि iPhone 5 युझर्स नवीन आयओएस व्हर्जनमध्ये अपडेट करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप कायमचं बंद होईल.

    याशिवाय, iPhone 5S, iPhone 6 आणि iPhone 6S या आयफोनच्या जुन्या मॉडेल्समध्येही व्हॉट्सअ‍ॅप वापरता येऊ शकतं. त्यासाठी फोनचं iOS व्हर्जन अपडेट करावं लागेल. फोनच्या जनरल सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही हे अपडेट चेक करू शकता. इतर आयफोन युझर्सनी काळजी करण्याची गरज नाही. कारण, आयफोनच्या इतर मॉडेल्समध्ये आधीपासूनच नवीन iOS व्हर्जन वापरण्यात आलं आहे.

    iPhone 5C आणि iPhone 5 युझर्सना व्हॉट्सअ‍ॅप बंद होण्याचं नोटिफिकेशन दिली जात आहे. तुमच्याकडे हे फोन असतील तर ते बदलण्याची वेळ आली आहे.

    First published:

    Tags: Iphone, Marathi news, Tech news, Whatsaap