मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /व्हॉट्सअ‍ॅपचं येणार नवं फीचर, स्टेटस होणार आणखी भन्नाट

व्हॉट्सअ‍ॅपचं येणार नवं फीचर, स्टेटस होणार आणखी भन्नाट

युझर्सना सर्वोत्तम अनुभव मिळावा यासाठी मेटा कंपनी या अ‍ॅपमध्ये सातत्याने नवीन अपडेट आणि फीचर्स आणते. या वर्षी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये एक महत्त्वाचं अपडेट येणार आहे.

युझर्सना सर्वोत्तम अनुभव मिळावा यासाठी मेटा कंपनी या अ‍ॅपमध्ये सातत्याने नवीन अपडेट आणि फीचर्स आणते. या वर्षी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये एक महत्त्वाचं अपडेट येणार आहे.

युझर्सना सर्वोत्तम अनुभव मिळावा यासाठी मेटा कंपनी या अ‍ॅपमध्ये सातत्याने नवीन अपडेट आणि फीचर्स आणते. या वर्षी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये एक महत्त्वाचं अपडेट येणार आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 19 जानेवारी : व्हॉट्सअ‍ॅप हे एक लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. मित्र, नातेवाईक, कुटुंबीय, तसंच सहकाऱ्यांसोबत कनेक्ट राहण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा प्राधान्याने वापर होतो. व्हॉट्सअ‍ॅप युझर्ससाठी सातत्याने नवनवीन अपडेट्स आणि फीचर्स लाँच करत असतं. व्हॉट्सअ‍ॅपमधलं स्टेटस हे फीचर खूप लोकप्रिय आहे. बहुतांश जण स्टेटसवर रोज फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात. या फीचरच्या अनुषंगाने एक नवीन अपडेट आहे. व्हॉट्सअ‍ॅप आता स्टेटससाठी एक सुविधा देणार आहे. आता व्हॉट्सअ‍ॅपच्या स्टेटसवर फोटो, व्हिडिओसोबत तुमचा आवाज म्हणजेच व्हॉइस नोटही ठेवता येणार आहे.

    व्हॉट्सअ‍ॅपवर दोन दशलक्षहून अधिक अ‍ॅक्टिव्ह युझर्स आहेत. सर्वसामान्यांमध्ये हे अ‍ॅप इतकं प्रसिद्ध आहे की ते प्रत्येक व्यक्तीच्या फोनमध्ये पाहायला मिळतं. कुटुंबातील लहानसहान गोष्टी असोत अथवा कॉर्पोरेट जगतातल्या मोठ्या बैठका किंवा शासकीय परिपत्रकं, सगळं काही व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून इकडे तिकडे पाठवलं जातं. युझर्सना सर्वोत्तम अनुभव मिळावा यासाठी मेटा कंपनी या अ‍ॅपमध्ये सातत्याने नवीन अपडेट आणि फीचर्स आणते. या वर्षी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये एक महत्त्वाचं अपडेट येणार आहे. लवकरच तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला तुमचा आवाज ठेवता येणार आहे. याचाच अर्थ आता तुम्ही स्टेटसला व्हॉइस नोट ठेवू शकणार आहात.

    हेही वाचा : फोन फ्लाईट मोडमध्ये नसल्यास विमान अपघात होऊ शकतो का? जाणून घ्या सविस्तर माहिती

    इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप असलेलं व्हॉट्सअ‍ॅप मजकूर, फोटो, व्हिडिओ किंवा जीआयएफ स्टेटस म्हणून शेअर करण्याचा पर्याय उपलब्ध करून देते. हे स्टेटस 24 तास सक्रिय राहतं. 24 तासांनंतर हे स्टेटस नाहीसं होतं. ज्या व्यक्ती तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आहेत आणि ज्यांना तुम्ही स्टेटस दाखवू इच्छिता, त्या व्यक्ती तुमचं स्टेटस पाहू शकतात. एक प्रकारे, व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस आपल्याला आपल्या रोजच्या अ‍ॅक्टिव्हिटीज सर्वांसमोर ठेवण्याचा पर्याय देते.

    व्हॉट्सअ‍ॅपशी संबंधित घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्या WABetaInfo या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षापासून व्हॉट्सअ‍ॅप या व्हॉइस नोट फीचरवर काम करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या वर्षी हे फीचर सर्वांसाठी उपलब्ध होऊ शकतं. WABetaInfoने शेअर केलेल्या फोटोनुसार, चॅट विंडोप्रमाणे स्टेटस कॉलममध्ये व्हॉइस नोटचा नवा ऑप्शन दिसेल. या ऑप्शनचा वापर करून तुम्ही तुमचा आवाज स्टेटस म्हणून ठेवू शकाल. युझर्स केवळ 30 सेकंदांपर्यंत आपला आवाज रेकॉर्ड करू शकतील आणि याच कालावधीचा ऑडिओ स्टेटस ठेवू शकतील. ही व्हॉइस नोट एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असेल आणि ज्यांना तुम्ही तुमचं स्टेटस दाखवू इच्छिता केवळ त्यांनाच ते दिसेल. सध्या हे फीचर मोजक्या बीटा युझर्ससाठी जारी करण्यात आलं आहे. लवकरच ते सर्व युझर्ससाठी उपलब्ध होणार आहे.

    First published:

    Tags: Whatsapp