मुंबई : व्हॉट्सअॅप हे अत्यंत लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. साध्या मेसेजेसपासून फोटो, व्हिडिओ, फाइल्स, लिंक्स, लोकेशन आणि व्हॉइस मेसेजेस असं सारं काही व्हॉट्सअॅपवरून अगदी काही क्षणांमध्ये शेअर करता येतं. शिवाय हे अॅप वापरायला सोपं असल्याने सर्व वयोगटांतल्या व्यक्ती ते वापरू शकतात. त्यामुळेच त्याची लोकप्रियता वाढली आहे आणि ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. व्हॉट्सअॅप अँड्रॉईड युजर्ससाठी नवीन कॉलिंग फीचर आणत आहे. हे फीचर तुम्हाला एका कॉलमध्ये 15 लोकांना जोडण्याची परवानगी देईल. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासह व्हिडिओ कॉल करू शकता. हे फीचर अद्याप सर्व युजर्ससाठी उपलब्ध नाही, परंतु लवकरच सर्वांसाठी उपलब्ध होईल. हे फीचर उपलब्ध झाल्यावर तुम्ही ते तुमच्या व्हॉट्सअॅपमध्ये पाहू शकाल.
पिंक WhatsApp तुम्ही डाऊनलोड करताय का? जरा थांबा कारण तुमच्यासोबतही असं घडू शकतं15 व्यक्ती एका कॉलमध्ये सहभागी होऊ शकतील एप्रिल 2022 मध्ये व्हॉट्सअॅपने ‘ग्रुप कॉलिंग’ नावाचं एक नवीन फीचर आणलं होते. या सुविधेद्वारे एका वेळी जास्तीत जास्त 32 जणांशी एकावेळी बोलण्याची संधी देण्यात आली होती. या पूर्वी, युजर एका वेळी फक्त 7 कॉन्टॅक्ट्सना कॉल करू शकत होते. पण आता या नवीन अपडेटने व्हॉट्सअॅपने ही संख्या 15 पर्यंत वाढवली आहे.
या नवीन फीचरमुळे युजर्सचा कॉल करण्यात जाणारा अधिकचा वेळ वाचेल. हे नवीन फीचर व्हॉट्सअॅप अँड्रॉइड बीटा 2.23.15.14 गुगल प्ले स्टोअर अपडेटसह उपलब्ध करण्यात आलं आहे. हे अपडेट लवकरच इतर युजर्ससाठी रोल आउट केलं जाईल.
WhatsApp पेमेंट करुनही मिळवता येईल इन्शुरन्स, पाहा कोण देतंय ही सुविधा!नवीन फीचर व्हॉट्सअॅपने नवीन अॅनिमेटेड अवतार फीचर आणलं आहे. हे फीचर iOS आणि Android दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध आहे. हे फीचर तुम्हाला अॅनिमेटेड अवतार तयार करण्याची परवानगी देतं, जे तुम्ही तुमच्या चॅटमध्ये वापरू शकता. तुम्ही तुमचा अवतार कपडे, केस आणि तुमच्या आवडीच्या इतर अॅक्सेसरीजनी सजवू शकता. हे एक उत्तम फीचर आहे जे तुमचं चॅट तुमच्यासाठी अधिक मनोरंजक बनवेल. तुम्ही तुमचे अवतार तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करू शकता आणि बोलू शकता. लोकांशी संपर्क साधण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. मित्र आणि कुटुंबियांशी जोडलं राहण्यासाठी सोशल मीडिया खूप मदत करतो त्यात ही अप महत्त्वाची भूमिका बजावतात.