जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / अँड्रॉइड, आयफोन युझर्ससाठी व्हॉट्सअ‍ॅप नवीन फीचर्स लॉंच करण्याच्या तयारीत

अँड्रॉइड, आयफोन युझर्ससाठी व्हॉट्सअ‍ॅप नवीन फीचर्स लॉंच करण्याच्या तयारीत

Whatsapp news features

Whatsapp news features

लवकरच व्हॉट्सअ‍ॅप अँड्रॉइड आणि आयओएस युझर्ससाठी आणखी नवीन आणि खास फीचर्स आणण्याच्या तयारीत आहे. ही फीचर्स अँड्रॉइड आणि अ‍ॅपल आयफोन बीटा टेस्टिंग करणाऱ्या युझर्ससाठी रोलआउट केल्याची माहिती समोर आली आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 25 ऑक्टोबर: व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम हे सर्वाधिक लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मानले जातात. यापैकी जगभरात व्हॉट्सअ‍ॅपचा वापर कोट्यवधी युझर्स करतात. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून युझर्स फोटो, व्हिडिओ, ऑडिओ, कंटेंट आदी बाबी शेअर करू शकतात. व्हॉट्सअ‍ॅपला मिळत असलेली पसंती लक्षात घेऊन या अ‍ॅपमध्ये सातत्याने नवनवीन फीचर्स आणली जात आहेत. युझर्सना अ‍ॅप वापरताना सर्वोत्तम अनुभव मिळावा हा यामागचा उद्देश आहे. लवकरच व्हॉट्सअ‍ॅप अँड्रॉइड आणि आयओएस युझर्ससाठी आणखी नवीन आणि खास फीचर्स आणण्याच्या तयारीत आहे. ही फीचर्स अँड्रॉइड आणि अ‍ॅपल आयफोन बीटा टेस्टिंग करणाऱ्या युझर्ससाठी रोलआउट केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे लवकरच ही फीचर्स सर्वसामान्य युझर्ससाठी उपलब्ध होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. `टीव्ही नाइन हिंदी`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युझर्सना अधिक चांगला अनुभव मिळावा यासाठी नवनवीन फीचर्स वर काम करत आहे. कंपनी लवकरच अँड्रॉइड, आयफोन आणि डेस्कटॉप अ‍ॅपमध्ये नवीन फीचर्स आणणार असल्याची चर्चा आहे. ही आगामी फीचर्स बीटा टेस्टींग करणाऱ्या युझर्ससाठी रोलआउट करण्यात आली आहेत. हेही वाचा - हे मेसेज पाठवाल तर थेट तुरुंगात जाल! WhatsAppचे नियम तुम्हाला माहिती आहेत का? व्हॉट्सअ‍ॅप आपल्या अ‍ॅपमध्ये युझर्ससाठी एक खास फीचर्स आणण्याच्या तयारीत आहे. या फीचरच्या मदतीने युझर्स मीडिया ऑटो-डाउनलोड सेटिंग्ज मॅनेज करू शकतील. व्हॉट्सअ‍ॅपच्या घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्या WABetaInfo या साइटने दिलेल्या माहितीनुसार, तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप सेटिंग्जमध्ये ऑटो डाउनलोड सेटिंग ऑप्शन दिसत असतील, तर तुम्हाला नवीन फीचर्स मिळत आहेत, असं समजावं. या फीचरच्या मदतीने युझर्स फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स मॅनेज करू शकणार आहेत. व्हॉट्सअ‍ॅप पोल्स हे एक नवं फीचर गेल्या काही कालावधीपासून चर्चेत आहे. कंपनीनं हे फीचर अँड्रॉइड आणि अ‍ॅपल आयफोन बीटा टेस्टिंग करणाऱ्या युझर्ससाठी जारी केलं आहे. यापूर्वी या फीचरच्या माध्यमातून केवळ ग्रुपमध्ये पोल्स क्रिएट करण्याची सुविधा मिळत होती. आता नवीन अपडेट आल्यानंतर युझर्स वन-टू-वन अर्थात पर्सनल चॅटसाठीदेखील पोल्स क्रिएट करू शकतील. ग्रुप पोल्सप्रमाणे पर्सनल चॅटमध्ये क्रिएट पोल्स पर्यायांतर्गत 12 पर्याय जोडता येतील.

    News18लोकमत
    News18लोकमत

    युझर्सना अवतार खूप आवडतात. हे फीचर व्हॉट्सअ‍ॅपमध्ये असतं तर किती बरं झालं असतं, असा विचार तुम्ही करत असाल. तुमचा हा विचार लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. कारण व्हॉट्सअ‍ॅपमध्ये हे फीचर्स जोडलं जाणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप अवतार फीचर कंपनीनं अँड्रॉइड बीटा टेस्टिंग करणाऱ्यांसाठी जारी केलं आहे. सेटिंग्ज मेन्यूमध्ये हे फीचर अवतार नावाने उपलब्ध होणार आहे. या फीचरच्या मदतीने युझर्स अवतार क्रिएट करू शकतील. तुम्ही तुमचा व्हॉट्सअ‍ॅप अवतार क्रिएट केल्यानंतर अ‍ॅप आपोआपच नवा स्टिकर पॅक क्रिएट करेल. त्यानंतर तुम्ही तुमच्या अवताराचा स्टिकर पॅक मित्र आणि कुटुंबीयांसोबत शेअर करू शकाल. तुम्हाला वाटलं तर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप अवतार हाच तुमचा प्रोफाइल फोटो म्हणून सेट करू शकता.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात