मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Whats app मध्ये कम्युनिटी फीचरची एंट्री, 32 युजर्ससोबत व्हिडिओ कॉलिंग, 1024 लोकांचा ग्रुप

Whats app मध्ये कम्युनिटी फीचरची एंट्री, 32 युजर्ससोबत व्हिडिओ कॉलिंग, 1024 लोकांचा ग्रुप

whatsaap

whatsaap

व्हॉट्सअॅप कम्युनिटीजच्या मदतीने वापरकर्ते एकाच वेळी अनेक ग्रुपशी कनेक्ट होऊ शकतात. याशिवाय व्हॉट्सअॅपमध्ये आज आणखी तीन नवीन फिचर्स दाखल करण्यात आले आहेत. आता यूजर्स व्हिडिओ कॉलद्वारे एकाच वेळी 32 लोकांशी कनेक्ट होऊ शकतील.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 03 नोव्हेंबर : व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. ज्या फिचरचे वापरकर्ते कित्येक दिवसांपासून वाट पाहत होते ते फिचर कंपनीने रोलआउट करण्यास सुरुवात केली आहे. व्हॉट्सअॅपच्या या नवीन फीचरचे नाव कम्युनिटीज (Communities) असे आहे. व्हॉट्सअॅप कम्युनिटीजच्या जागतिक रोलआउटची घोषणा मार्क झुकरबर्गने (Mark Zuckerberg) स्वत: केली. येत्या काही महिन्यांत हे फिचर व्हॉट्सअॅपच्या सर्व वापरकर्त्यांपर्यंत पोहोचेल. व्हॉट्सअॅप कम्युनिटीजच्या मदतीने वापरकर्ते एकाच वेळी अनेक ग्रुपशी कनेक्ट होऊ शकतात. याशिवाय व्हॉट्सअॅपमध्ये आज आणखी तीन नवीन फिचर्स दाखल करण्यात आले आहेत. आता यूजर्स व्हिडिओ कॉलद्वारे एकाच वेळी 32 लोकांशी कनेक्ट होऊ शकतील. त्याचबरोबर आता ग्रुपमधील 1024 यूजर्ससोबत चॅटिंग करता येणार आहे. यासोबतच कंपनीने व्हॉट्सअॅपमध्ये पोल क्रिएटिंग फीचरही आणलं आहे.

कम्युनिकेशन ऑर्गनाइज करण्यासाठी अधिक टूल्स -

व्हॉट्सअॅपकडून मिळालेल्या माहितीनुसार, कम्युनिटी फिचरचा सर्वाधिक फायदा अशा वापरकर्त्यांना होईल ज्यांचे एकमेकांशी घट्ट नातेसंबंध आहेत. म्हणजे, शाळा-कॉलेजचे ग्रुप आणि व्यवसायासाठी ग्रुप वापरणाऱ्यांना याचा अधिक फायदा होईस. व्हॉट्सअॅपच्या नवीन फीचरमुळे त्यांना त्यांचे कम्युनिकेशन व्यवस्थित करण्यासाठी आणखी टूल्स मिळतील. शाळकरी मुलांचे पालक, स्थानिक क्लब आणि अगदी लहान कामाची ठिकाणेही त्यांच्या संभाषणासाठी आणि दैनंदिन कामांसाठी WhatsApp ग्रुप वापरतात. या ग्रुपना त्यांच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी सोशल मीडियापासून वेगळ्या पद्धतींची आवश्यकता होती. विशेष म्हणजे व्हॉट्सअॅप येत्या काही दिवसांत अशा ग्रुपच्या चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी आणखी अनेक अपडेट्स आणणार आहे.

अॅडमिनला नवीन टूल्स मिळतील -

कम्युनिटीज तयार करण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी अॅडमिन जबाबदार असेल. कोणते गट कम्युनिटीजचा भाग असतील आणि कोणते नाही हे निवडण्याचा अधिकार त्याच्याकडे असेल. यासाठी तो नवीन ग्रुप तयार करू शकतो किंवा आधीपासून अस्तित्वात असलेले ग्रुप एकमेकांशी जोडू शकतात. ॲडमिनला ग्रुप किंवा मेंबर काढून टाकण्याचाही अधिकार असेल. याशिवाय ग्रुप अॅडमिन सर्व सदस्यांसाठी आक्षेपार्ह चॅट आणि मीडिया हटवू शकतात.

View this post on Instagram

A post shared by Mark Zuckerberg (@zuck)

वापरकर्त्यांना मिळेल जास्त कंट्रोल -

नवीन फीचरमध्ये अॅडमिनला नवीन टूल्स देण्यासोबतच यूजर्ससाठीही खूप काही आहे. व्हॉट्सअॅपच्या मते, वापरकर्ते ग्रुपमध्ये त्यांचे संभाषण सहज कंट्रोल करू शकतात. व्हॉट्सअॅपच्या सध्याच्या सेटिंग्जमध्ये, वापरकर्ते त्यांना ग्रुपमध्ये कोण जोडू शकते आणि कोणी जोडू नये हे निवडू शकतात. लवकरच व्हॉट्सअॅपमध्ये आणखी एक फीचरदेखील सादर केले जाईल जेणेकरुन यूजरने ग्रुप सोडल्यावर कोणालाही नोटिफिकेशन मिळणार नाही.

कम्युनिटीज बरोबर या फीचर्सची एंट्री -

व्हॉट्सअॅपमध्ये आज आणखी तीन नवीन फिचर्स दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये चॅटमध्ये पोल तयार करण्याव्यतिरिक्त 32 लोकांपर्यंत व्हिडिओ कॉलिंग आणि 1024 वापरकर्त्यांसोबत ग्रुप चॅटचा समावेश आहे. कोणत्याही ग्रुपमध्ये इमोजी रिअॅक्शन, मोठ्या फाइल शेअरिंग आणि अॅडमिन डिलीट यांसारख्या खास फीचर्सचाही वापर करता येईल. ही सर्व टूल खास करून ग्रुपमधील वापरकर्त्यांसाठी अधिक उपयुक्त ठरतील.

First published:

Tags: Whats app news, Whats group admin, Whatsapp New Feature