मुंबई, 20 जून : सर्वात सोपं आणि संवाद साधण्याचं माध्यम म्हणजे Whatsapp. याचा वापर अगदी कामापासून ते प्रेमाची ग्वाही देण्यापर्यंत सगळेच करतात. प्रत्येकाच्या फोनमध्ये जवळपास हे अॅप आहे. मेसेज करताना सर्वात पहिल्यांदा आपण बघतो ते युझरचं लास्ट सीन (last seen) शुक्रवारी रात्रीपासून व्हॉट्सअॅपवर एखाद्याचे लास्ट सीन (last seen) दिसत नसेल तर आपण अनइन्टॉल करण्याची गरज नाही. ही समस्या तुम्हालाच नाही जगभरातील कोट्यवधी युझर्सना आली आहे. शुक्रवारी संध्याकाळपासूनच ही समस्या जाणवत असल्याचं अनेकांनी ट्वीट करून माहिती दिली. त्यानंतर कंपनीकडून काही तांत्रिक अडचणी असल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे ग्राहकांना बराचवेळ last Seen दिसणं किंवा प्रायव्हसी सेटिंगमध्ये बदल करण्यासाठी अडथळा निर्माण झाला होता. प्रायव्हसी सेटिंगध्ये बदल करता येत नसल्यानं युझर्सना मोठा त्रास सहन करावा लागला.
There isn't a fix now for last seen at and the online status. It's taking a long time, please be patient.
— WABetaInfo (@WABetaInfo) June 19, 2020
We need to wait for a server-side fix from @WhatsApp.
The good news is that you can still use WhatsApp without the last seen and the online status thing. #whatsappdown https://t.co/HkHMOv0hT4
‘WABetaInfoने यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली आहे. Whatsappचं लास्ट सीन दिसत नसेल तर घाबरून ते अनइन्टॉल करून नका. असं केलं तर पुन्हा लॉगइन करण्यात अधिक समस्या येतील. अॅपमधील असणारा हा प्रॉब्लेम आम्ही तातडीनं सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यानंतर काही वेळ ही समस्या युझर्सना येऊ शकते.’ सर्व्हरमध्ये आलेल्या बगमुळे ही समस्या निर्माण झाल्याचं WABetaInfoने सांगितलं आहे. संपादन- क्रांती कानेटकर