मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /WhatsApp Ban: व्हॉट्सअ‍ॅपकडून 26 लाखांहून अधिक अकाऊंटवर बंदी; तुम्ही ही चूक करत नाही ना?

WhatsApp Ban: व्हॉट्सअ‍ॅपकडून 26 लाखांहून अधिक अकाऊंटवर बंदी; तुम्ही ही चूक करत नाही ना?

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp ने सप्टेंबरमध्ये भारतात 26.85 लाखांहून अधिक खाती ब्लॉक केली आहेत. यापैकी 8.72 लाख खाती वापरकर्त्यांकडून कोणताही रिपोर्ट येण्यापूर्वीच ब्लॉक करण्यात आली होती.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर : गेल्या काही दिवसांपासून अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने आपले निर्बंध कडक केले आहेत. इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp ने सप्टेंबरमध्ये भारतात 26.85 लाखांहून अधिक खाती ब्लॉक केली आहेत. यापैकी 8.72 लाख खाती वापरकर्त्यांकडून कोणताही रिपोर्ट येण्यापूर्वीच ब्लॉक करण्यात आली होती. मेसेजिंग प्लॅटफॉर्मने मंगळवारी ही माहिती दिली. ऑगस्टमध्ये कंपनीने 23.28 लाख खाती गोठवली होती. सप्टेंबरमध्ये बंदी घालण्यात आलेल्या खात्यांची संख्या ऑगस्टच्या तुलनेत 15 टक्क्यांनी अधिक आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या मासिक अनुपालन रिपोर्टमध्ये म्हटले आहे की 1 सप्टेंबर 2022 ते 30 सप्टेंबर 2022 दरम्यान 26,85,000 खाती ब्लॉक करण्यात आली आहेत. यापैकी 8,72,000 खाती युजर्सकडून कोणतीही तक्रार येण्यापूर्वीच ब्लॉक करण्यात आली होती.

ट्विटरकडून 54 हजारांहून अधिक अकाउंट बॅन

26 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर दरम्यान लहान मुलांचे लैंगिक शोषण, पोर्नोग्राफी आणि इतर प्रतिबंधित सामग्रीचा प्रचार करण्यासाठी ट्विटरने भारतात 52,141 खात्यांवर बंदी घातली आहे. मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मने दहशतवादाला प्रोत्साहन देण्याप्रकरणी 1,982 खात्यांवर बंदी घातली आहे. ट्विटरने नवीन IT नियम, 2021 चे पालन करून आपल्या मासिक अहवालात म्हटले आहे की त्यांना भारतातून त्यांच्या तक्रार निवारण यंत्रणेद्वारे एकाच वेळेत 157 तक्रारी प्राप्त झाल्या आणि त्यापैकी 129 URL वर कारवाई केली.

का होतेय कारवाई?

नवीन आणि कठोर माहिती तंत्रज्ञान नियमांनुसार, मोठ्या डिजिटल प्लॅटफॉर्मने दर महिन्याला त्यांचे अनुपालन रिपोर्ट जारी करणे आवश्यक आहे. यामध्ये आलेल्या तक्रारींवर काय कारवाई केली, याचा तपशीलही नमूद करणे आवश्यक आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या ताज्या अहवालानुसार, सप्टेंबरमध्ये कंपनीला 666 तक्रारी प्राप्त झाल्या. मात्र, केवळ 23 तक्रारींवर कारवाई करण्यात आली.

वाचा - दिवाळीनंतर 'या' आयफोन्समध्ये व्हॉट्सअ‍ॅप होणार बंद

तुम्ही देखील तक्रार करू शकता

जर कोणी तुमच्याशी गैरवर्तन केले असेल तर तुम्ही त्यांच्या खात्यांची तक्रार करू शकता. काही प्रसंगी, वापरकर्त्यांना पुरावा म्हणून स्क्रीनशॉट देखील शेअर करावे लागतात. याशिवाय, तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर वापरकर्त्याला सहजपणे ब्लॉक करू शकता.

जेव्हा तुम्ही प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्याला ब्लॉक करता आणि तक्रार करता तेव्हा WhatsApp तुमच्या चॅटचे शेवटचे 5 मेसेज मागते. दुसरीकडे, जर तुम्हाला वापरकर्त्याला ब्लॉक न करत केवळ रिपोर्ट करायचा असेल, तर पाठवणार्‍याच्या मॅसेजवर दीर्घकाळ दाबून ठेवा आणि नंतर तीन बिंदूंवर क्लिक करा. अशा प्रकारे तुम्हाला रिपोर्टचा पर्याय मिळेल.

तर तुमचेही अकाऊंट बॅन होईल

जेव्हा युजर्स नियम आणि शर्तींचे उल्लंघन करत असल्याचे आढळले तेव्हाच WhatsApp अकाउंट बॅन केले जाते. जसे की स्पॅम, घोटाळे असतील किंवा व्हॉट्सअ‍ॅपने वापरकर्त्याची सुरक्षितता धोक्यात आणली तर त्यावर बंदी घातली जाईल. काही खाती त्यांच्या स्वयंचलित प्रणालींमधून चुकून फ्लॅग केली जातात. त्यामुळे, अ‍ॅपच्या अटींचे उल्लंघन न करता तुमचे व्हॉट्सअॅप खाते बंदी किंवा निलंबित करण्यात आले आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही बंदी मागे घेण्याचे आवाहन करू शकता.

First published:

Tags: Twitter, Whatsaap