whaमुंबई, 7 डिसेंबर : व्हॉट्सअॅप आपल्या युजर्सचा अनुभव द्विगुणीत करण्यासाठी नवनवीन फीचर आणत असते. यामध्ये आता आणखी एका वैशिष्ट्याची भर पडणार आहे. मेटा संस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी बुधवारी व्हॉट्सअॅपसाठी नवीन डिजिटल अवतार जाहीर केला. हा पर्याय Bitmojis द्वारे इंस्पायर्ड आहे. आधीपासूनच Facebook आणि Instagram वर हे फीचर उपलब्ध आहे. या वैशिष्ट्याच्या मदतीने, तुम्ही एकतर 36 कस्टमायजेबल स्टिकर्समधून निवडू शकता किंवा तुमच्या प्रोफाइल फोटोसाठी स्वतः अवतार तयार करू शकता. हे अवतार चॅटमध्येही शेअर केले जाऊ शकतात.
मेटाने एक प्रेस रिलीज पाठवून माहिती दिली आहे की बुधवारपासूनच सर्व वापरकर्त्यांना हे नवीन फीचर मिळण्यास सुरुवात होईल. अवतार फीचर फेसबुक मेसेंजर आणि त्याच्या न्यूज फीडसाठी 2019 मध्येच जारी करण्यात आले होते. यानंतर ते अॅपच्या स्टोरीज आणि कमेंट्स विभागात वाढवण्यात आले. या वर्षाच्या सुरुवातीला इन्स्टाग्रामसाठीही अवतार सादर करण्यात आला होता. WABetaInfo नुसार, हे फीचर केवळ iOS आणि Android च्या बीटा वापरकर्त्यांसाठी या वर्षी ऑक्टोबरमध्ये जारी करण्यात आले होते.
व्हॉट्सअॅपची मूळ कंपनी मेटाने तुमचा अवतार हे तुमचे डिजिटल व्हर्जन असल्याचे म्हटले आहे. करोडो कॉम्बिनेशन्समधून ते तयार होऊ शकते. यासाठी, वापरकर्ते वेगवेगळ्या केशरचना, चेहऱ्यावरील वैशिष्ट्ये आणि पोशाख एकत्र करू शकतात.
वाचा - भारीच की! सॅमसंगच्या ‘या’ प्रॉडक्ट्सवर मिळणार 20 वर्षांची वॉरंटी, वाचा सविस्तर
WhatsApp मध्ये हे फीचर कसे अॅक्सेस करावे?
व्हॉट्सअॅपमध्ये अवतार तयार करण्यासाठी, तुमच्याकडे अॅपचे अपडेटेड व्हर्जन असणे आवश्यक आहे. यानंतर तुम्हाला सेटिंगमध्ये जाऊन अवतारवर टॅप करावे लागेल. येथून तुम्ही तुमचा वैयक्तिक अवतार तयार करू शकता. यासाठी तुम्ही वेगवेगळे स्किन टोन, हेअरस्टाइल आणि डोळे-नाक सेट करू शकता. त्यानंतर तुम्हाला Done वर टॅप करावे लागेल.
हे फीचर सर्व वापरकर्त्यांसाठी जारी केले गेले आहे. परंतु, सर्व वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी काही वेळ लागू शकतो. अशा परिस्थितीत तुम्हाला थोडे दिवस वाट पाहावी लागू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Whatsaap