सूरत, 07 जुलै : चीनमध्ये एका लिफ्टमुळे (lift) 71 जणांना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचं वृत्त जुलैमध्येच आलं होतं आणि कोरोनाच्या या काळात आता लिफ्ट वापरण्याचीही भीती वाटू लागली आहे. लिफ्टमधील बटणांना कित्येक लोकांनी स्पर्श केलेला असू शकतो हे आपल्याला माहिती नाही. त्यापैकी कुणाला कोरोनाव्हायरस असू शकतो हेदेखील आपल्याला माहिती नाही. त्यामुळे लिफ्टच्या (Elevator) या बटणांना स्पर्श करायची भीती हल्ली प्रत्येकाला वाटते.
कुणी टूथपिकने, कुणी एखाद्या वस्तूने लिफ्टचं बटण दाबतात. तर काही ठिकाणी लिफ्टमध्ये पेडल्सची सुविधा देण्यात आली आहे, जेणेकरून पायांनी लिफ्ट ऑपरेट करता येईल. मात्र आता एका भारतीयाने यावर उत्तम असा मार्ग काढला आहे. गुजरातच्या सॉफ्टवेअर इंजिनीअरने लिफ्टच्या बटणांना स्पर्श न करता किंवा कोणतीही वस्तू न वापरता बटण दाबण्याची सोय केली आहे.
टेकमॅक्स सोल्युशन कंपनीने संस्थापक भाविन आहिर स्वत: तेरा मजली इमारतीच्या बाराव्या मजल्यावर राहतात. जिथं कित्येक लोक लिफ्टचा वापर करतात. त्यांनाही लिफ्टमधील बटण दाबताना नेहमी भीती वाटायची आणि त्यामुळे यावर काहीतरी तोडगा काढायला हवा हा विचार त्यांनी केला आणि त्यांनी स्पर्शलेस (Sparshless) विकसित केलं आहे.
हे वाचा - अवघ्या काही रुपयात मिळणार कोरोना लस; पुणे सीरम इन्स्टिट्युटने जाहीर केली किंमत
स्पर्शलेस ही अशी प्रणाली आहे, जी लिफ्टमध्ये असलेल्या बटणांसह जोडलेली आहे. फक्त या बटणांकडे बोट न्यायचं त्यांना स्पर्श करण्याची गरज नाही. 10 ते 15 मिलीमीटर अंतरापर्यंत बोट धरलं तरी लिफ्टला सिग्नल मिळेल. म्हणजे तुम्हाला ज्या मजल्यावर जायचं आहे, त्या मजल्याच्या क्रमांकांच्या बटणासमोर बोट न्या तुम्ही त्या मजल्यावर पोहोचणार. लिफ्टच्या बाहेरील आणि आतील बटणांसाठी अशीच सोय आहे.
भारतातील 15 बिल्डिंगमध्ये ही सिस्टम बसवण्यात आली आहे. एलेव्हेटर कन्सलटंट असलेले सुमित कटारिया यांची पत्नी सुशीला डॉक्टर आहे. कोरोना रुग्णांवर त्या उपचार करत आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या दुमजली घरातील पर्सनल एलेव्हेटरमध्ये ही प्रणाली बसवली आहे आणि ही प्रणाली खूपच चांगलं काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
हे वाचा - 6 कोरोना लशी ट्रायलच्या शेवटच्या टप्प्यात; कोणती ठरेल यशस्वी WHO ने दिली माहिती
स्पर्शलेससाठी कुवेत, यूएई आणि ब्राझीलमधूनदेखील चौकशी केली जात असल्याचं अहिर यांनी सांगितलं. या वर्षापर्यंत 1500 युनिटची विक्री होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus