वोडाफोनचे 5 बेस्ट plan, अनलिमिटेड कॉलिंगसोबत वर्षभर मिळणार ZEE5 चं सब्स्क्रिप्शन

वोडाफोनचे 5 बेस्ट plan, अनलिमिटेड कॉलिंगसोबत वर्षभर मिळणार ZEE5 चं सब्स्क्रिप्शन

वोडाफोन-आयडिया कंपनीने 355, 405, 595, 795, 2595 रुपयांचे बेस्ट प्लॅन आणले आहेत.

  • Share this:

मुंबई, 20 सप्टेंबर: airtel आणि jio ला टक्कर देण्यासाठी आता वोडाफोन-आयडिया कंपनीने नव्या रुपात धमाकेदार प्लॅन आणले आहेत. ग्राहकांना घरी बसून काम करणं अधिक सोपं जावं आणि त्यासोबत मनोरंजनाचा खजिना त्यांच्या मोबाईलवर अगदी सहज उपलब्ध व्हावा यासाठी कंपनीने खास जिओ आणि एअरटेलपेक्षा वेगळे आणि जास्त सेवा देणारे प्लॅन लाँच केले आहेत.

वोडाफोन आणि आयडिया कंपनीच्या या 5 बेस्टमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि दिवसाला 100 SMS मिळणार आहेत. पण याशिवाय आणखीन कोणत्या सेवा मिळणार आणि कोणता प्लॅन सर्वात बेस्ट आहे जो आपल्याला निवडता येईल यासाठी आधी काय प्लॅन आणि त्याची वैधता किती असेल हे जाणून घेऊया.

हे वाचा-सांगा कसं जगायचं? गुजरातमध्ये शेतकऱ्याने भुईमुंगाच्या पिकाला लावली आग, VIDEO

वोडाफोन-आयडिया कंपनीने 355, 405, 595, 795, 2595 रुपयांचे बेस्ट प्लॅन आणले आहेत. 405 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगसोबत 100 SMS आणि 90 GB डेटासह वर्षभरासाठी ZEE 5 अॅपचं सब्स्क्रिप्शन मिळणार आहे. या प्लॅनची वैधता केवळ 28 दिवस असेल.

595 च्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगसोबत दर दिवसाला 2GB डेटा मिळणार आहे. याची वैधता 56 दिवस असेल. 795 प्लॅन 84 दिवसांचा असणार आहे. यामध्ये फ्री कॉलिंगसोबत 2 GB डेटा दररोज वापरायला मिळणार आहे. 2595 या प्लॅनमध्ये ग्राहकांना वर्षभराची वैधता मिळणार आहे. 2 GB डेटा दरदिवशी, फ्री कॉलिंग आणि 100 SMS मिळणार आहेत.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 20, 2020, 12:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading